महिला अत्याचाराविरोधात आवाज उठविणारी ʻशी इज मीʼ

0

महिलांवरील अत्याचारांच्या घटना आता बऱ्याच प्रमाणात समोर येत आहेत. बसमध्ये प्रवास करताना, वर्दळीच्या ठिकाणी, रस्त्यावरुन चालताना, कार्यालयात महिलांना अनेकदा छेडछाडीचा सामना करावा लागतो. याबाबत ʻशी इज मीʼ (She is me) च्या निर्मात्या यामिनी रमेश सांगतात की, ʻभारतातील अनेक महिलांना जीवनात कधी ना कधी अत्याचारांचा सामना करावा लागला आहे. मी देखील केला आहे. तसेच जी हा लेख वाचत आहे. तिला देखील अत्याचारांचा सामना करावा लागला असेल. माझ्या मते, याबाबतीत उठवलेला प्रत्येक आवाज आणि सकारात्मक बदल जास्त महत्वाचे आहे. यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट माझ्यासाठी जास्त जवळचा आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान मी अनेक लोकांना भेटले. त्यांच्यासोबत जे काही घडले आहे. ते ऐकून मन सुन्न होऊन जाते.ʼ, असे त्या म्हणाल्या.

तरुणपणी यामिनी मुंबईत माध्यमांमध्ये काम करायच्या. त्यांच्याकडे चित्रपट निर्मितीचा कोणताही अनुभव नव्हता. तसेच त्यांना या क्षेत्रात सक्रियदेखील व्हायचे नव्हते. परंतू ʻशी इज मीʼ सारखा चित्रपट बनविणे, हे त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देण्यासारखे होते. ʻहा चित्रपट देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआर येथे महिलांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट मन सुन्न करणारी आहे. या कथा फक्त अरुणा शानबाग, भंवरी देवी, स्कारलेट किलिंग आणि निर्भया यांच्यावरच आधारित नसून, त्या सर्व महिलांवर आधारित आहेत, ज्या अत्याचाराचा सामना करीत आहेत. मी प्रत्येक पिडितेला जेव्हा भेटत होती. तेव्हा मला वाटत होते की, ती मीच आहे.ʼ, असे यामिनी सांगतात.

विद्यार्थीदशेतच यामिनी यांनी या चित्रपटाचे काम सुरू केले होते. त्याकाळी साधने कमी होती. मात्र त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना या कामात मदत केली. त्या सांगतात की, ʻचार लोक माझ्यासोबत काम करत होते. आमच्याकडे दोन डीएसएलआर कॅमेरे होते. आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी थांबत होतो. तसेच चित्रीकरणादरम्यान आम्ही मेट्रो आणि बसने प्रवास करत होतो.ʼ साधनांची कमतरता असतानादेखील यामिनी या चित्रपटाच्या निर्मितीत यशस्वी झाल्या. त्याबाबत उत्साहाने बोलताना यामिनी सांगतात की, ʻआम्हाला या चित्रपटादरम्यान भेटलेली माणसे खुप चांगली होती. त्यामुळे आम्ही या कामात यशस्वी होऊ शकलो. किरण बेदी आणि अर्णब गोस्वामी यांची आम्ही मदत घेतली. आम्ही त्या लोकांशी ई-मेल आणि फोनद्वारे संपर्क केला की ते आम्हाला भेटायला तयार व्हायचे.ʼ चित्रपटादरम्यान आवाजावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करता आले असते, अशी खंत यामिनी यांना वाटते. यामिनी सांगतात की, ʻजर आमच्याकडे माईक असता तर आम्ही चांगल्यापद्धतीने काम करू शकलो असतो. या चित्रपटात आवाज तर ऐकू येतो. मात्र त्यात ती गुणवत्ता नाही. हा माझा पहिला चित्रपट होता आणि मला काही जास्त माहितीदेखील नव्हती. यामुळेच आवाजाच्या बाबतीत काही चुकले असेल.ʼ या चित्रपटाबाबतीत अनेकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक आल्या आहेत. याबाबत बोलताना यामिनी सांगतात की, ʻअनेक लोकांनी चित्रपट पाहिल्यानंतर मला लांबच्या लांब मॅसेज पाठविले. त्यांनी मला त्यांच्या भूमिका समजाविल्या आणि या विषयावर मी चित्रपट निर्मिती केल्याबद्दल माझे आभारदेखील मानले. दुर्दैवाने फार कमी लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. मात्र ज्यांनी पाहिला आहे, त्यांना हा चित्रपट आवडला आहे.ʼ

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी फार कमी पैसा गुंतवण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे पैसे कमाविण्याची कोणतीही योजना नसल्याचे यामिनी सांगतात. यामिनी यांनी आपले अनुभव जगासमोर आणण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमाची निवड केली. या चित्रपटाद्वारे समाजात बदल घडण्यास सुरुवात झाली आहे. यामिनी याबाबत बोलताना सांगतात की, ʻया चित्रपटाच्या निर्मितीनंतर मी अधिक भावनिक झाली, असे माझे म्हणणे नाही. मी नेहमीच दुसऱ्यांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही करते आहे. मी त्या आईचे दुःखदेखील समजून घेतले आहे, जिच्या मुलीला गर्भधारणा होत नाही म्हणून सासूरवास सहन करावा लागला आहे. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही कधीच विसरू शकत नाही. अशा घटनांमुळे माझा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला.ʼ

यामिनी सांगतात की, ʻहा चित्रपट बनविताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अखेरीस सर्व आमच्या कलाने होत गेले. माझी टीम खुप मदत करणारी होती. हा चित्रपट महिलांक़डे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन काय आहे, ते सांगतो.ʼ या चित्रपटात किरण बेदी म्हणतात की, ʻआपल्याला ʻपुत्र होऊ देतʼ, असा आशीर्वाद देण्यावर आणि घेण्यावर बंदी घातली पाहिजे.ʼ तर कविता कृष्णन सांगतात की, ʻबलात्कारासारखे गुन्हे हे महिलांकरिता शिक्षा ठरतात. फक्त बलात्कारीच नव्हे तर आपला समाजदेखील महिलांना असहाय्य करण्यासाठी जबाबदार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजाच्या विचारसरणीत बदल होईल, अशी मला आशा आहे.ʼ ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. ते सर्व लोक यामिनी यांची स्तुती करत आहेत. अनेक लोक यामिनी यांना याच क्षेत्रात कारकिर्द घडविण्यासाठी सांगत आहेत. मात्र यामिनी यांचे विचार काही वेगळेच आहेत. त्या सांगतात की, ʻविषय़ गंभीर असल्याने या विषयावर चित्रपट निर्मिती करणे गरजेचे होते. मला माझ्या आय़ुष्यात अनेक सार्थक कामे करायची आहेत. मी एकतर या समस्या सोडवेन किंवा मरेपर्यंत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन.ʼ

यामिनी जरी वयाने लहान असल्या तरी त्यांचे विचार प्रगल्भ आहेत. अनेक तरुण आता बदल घडविण्यासाठी पुढे येत आहेत. आरामदायी जीवनशैलीतून बाहेर काढण्यात तसेच आपल्या ध्येयपूर्तीसाठी काम करण्यास यामिनी लोकांना प्रेरीत करतील, अशी अनेकांना आशा आहे. त्या सांगतात की, ʻचित्रपटाने त्यांना समाजाचा दुसरा चेहरा दाखविला. ही एक माहिती नसून वास्तविकता आहे. मी स्वतःला पिडितेच्या जागी ठेऊन पाहते. त्या जागी तुम्हीदेखील असू शकता किंवा तुमचे प्रियजनदेखील असू शकतात. कोणत्याही प्रकारची मदत न मिळणे, अन्याय होणे , अशा प्रकारच्या यातना कोणाला सहन करायला लागू नये. ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होणे आणि विवाहित महिलेला अॅसिड पाजणे, या समाजातील सत्य घटना आहेत. जर तुम्ही हे दुःख आणि अन्याय सहन करू शकत नाही तर त्याविरोधात आवाज उठवा. म्हणजे तुम्हाला पश्चाताप होणार नाही. मला वाटते की, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी असे वातावरण नक्कीच नको असेल आणि हीच गोष्ट तुम्हाला बदल घडविण्यासाठी प्रेरीत करेल.ʼ