लंडन मध्ये बरोबर शिकत असलेल्या दोन मैत्रिणीनी भारतात सुरु केले ‘द कलर्ड ट्रंक ’

लंडन मध्ये बरोबर शिकत असलेल्या दोन मैत्रिणीनी भारतात सुरु केले ‘द कलर्ड ट्रंक ’

Thursday November 26, 2015,

4 min Read

वरळी इथल्या घरातून चालवण्यात येणाऱ्या कार्यालयात गंभीर परिस्थितीतही महत्वपूर्ण विषयावर होणाऱ्या चर्चा वादविवाद घालत, मात्र तरीही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतात. इथे निर्माण होणाऱ्या गोंधळाच्या परिस्थितही सहज मार्ग काढला जातो आणि कंपनीच्या प्रगतीची उद्दिष्टे साध्य केली जातात. प्रफुल्लीत अशा वातावरणातील या कार्यालयाची धुरा सांभाळतात त्रिशला मेहता आणि यशनी कोठारी या दोन जिगरबाज मैत्रिणी. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन नाजूक मुख्य रक्तवाहिन्याप्रमाणेच या दोघीही संपूर्ण कार्यालात उर्जा पुरविण्याचे कार्य अगदी नेटाने करतात. यांचा सळसळणारा उत्साह पाहून कोणालाही वाटेल की, फक्त चांगला वेळ घालवण्यासाठी या दोघी व्यवसाय करत आहेत, मात्र तसे नसून कल्पनेपलीकडे जाऊन आपल्या उद्योगाचा अधिकाधिक विस्तार करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

लंडन कॉलेज ऑफ फॅशन च्या विविध क्षेत्राच्या अभ्यासादरम्यान एकाच खोलीमध्ये राहणारी त्रिशला मेहता आणि यशनी कोठारी ला बघून असे वाटते की त्या एकमेकींसाठीच बनल्या आहेत. एकमेकींच्या संगतीत राहून सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण करणे त्यांना शक्य झाले.

image


जुन्या आठवणी सांगत त्रिशला म्हणते की,’’लंडन मध्ये एक वर्ष यशनीच्या संगतीत राहून आम्ही एकमेकींच्या सवयीशी एकरूप झालो. स्वयंपाक करणे, साफ-सफाई,लाॅड्री आणि रात्री उशिरा पर्यंत चालणाऱ्या गप्पा यामुळे आमचे संबंध अधिक दृढ होत गेले. आमच्यात एक सुसंगतता आणि सामजस्यपणा होता ज्याने आम्ही चांगल्या टीमच्या रुपात काम करून यशस्वी होऊ शकत होतो.’’

पदवीसाठी सुरु असलेल्या संशोधना दरम्यान त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली की बाजारात उत्तम दर्जाचे उत्पादन करणाऱ्या फॅशन डिजाइनरच्या क्षेत्रात विस्तार करण्यास भरपूर संधी आहेत. बाजारात अस्तित्वात असलेले फॅशन डिजाइनर आपल्या विस्तारासाठी काही कारणाने फक्त निवडक आणि आपल्या आवडीच्या समाजाशी संबंधित ग्राहकांपुरतेच मर्यादित आहे. त्रिशला म्हणते की, "मला माझ्या कलाकृतीला एका मोठ्या श्रेणी पर्यंत पोहचवायचे होते, जे केवळ एका डिजिटल व्यासपीठाद्वारे शक्य होते. स्वाभाविकपणे माझ्या कल्पनेला साकारण्यासाठी मी यशनीचे सहकार्य घेतले."

यानंतर कॉफी आणि रात्रीच्या जेवणादरम्यान होणाऱ्या चर्चेनंतर त्यांच्या विचारांना अधिक सकारात्मक बळ मिळाले. त्यांना पूर्ण खात्री आणि विश्वास होता की आपण काहीतरी चांगले करण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. त्या पुढे सांगतात, " आम्हाला वेगळ्या पद्धतीची फॅशन बाजारपेठ स्थापन करायची होती. जी फॅशन दुनियेत अधिराज्य गाजवेल."

यशनी सांगते की , हे काम करण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय हाच होता की, एक पारदर्शक प्रणालीतंत्र विकसित करणे. ज्यामाध्यमातून खरेदी-विक्रीच नव्हे तर, डिजाइनर आणि ग्राहकांनी एकत्रित येऊन, आपसात विचार-विनिमय करून एकमेकांचे रिती-रिवाज आणि आवडी-निवडी जाणून घेणे शक्य होईल. याच हेतूने ‘द कलर्ड ट्रंक (The Colored Trunk) ही संकल्पना साकारण्यात आली. सुरवातीलाच मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आमच्यातला आत्मविश्वास अधिक बळावला आणि आम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला.

त्रिशला सांगते की,’’द कलर्ड ट्रंक’’चा पाया रोवण्याआधी लोक आम्हाला उद्योजकतेच्या क्षेत्रात न येण्यासंदर्भात सुचवत होते. आमच्या नेहमीच्या भेटी-गाठीतले लोक आमची एक सुरक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यापार करण्याला मुर्खपणा आणि विचार न करता घेतलेला निर्णय समजत होते.’’

तथापि प्रारंभीच्या काळात बऱ्याच वेळा त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला कारण व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीला राम-राम ठोकला होता. त्यांच्या जवळची मर्यादित बचत हेच त्यांच्या जवळचे प्राथमिक इंधन होते त्यामुळे कामाची सुरवात त्यांना आपल्या घरातूनच करावी लागली.


image


त्रिशला सांगते की, "एक महिला असल्याने आमच्याकडून अपेक्षा केली जाते की आम्ही एक सुरक्षित क्षेत्रात काम करून कोणत्याही परंपरेला तडा न जाऊ देता लग्न बंधनात अडकून घर संसार सांभाळायचा. परंतु आमच्या दोघींनच्या कुटुंबाने आम्हाला पूर्णपणे सहयोग करून आमच्या या धाडसी निर्णयाला पाठिंबा देऊन विश्वास दाखविला.’’

एक खूप जुना समज आहे की, "एक यशस्वी महिला बनण्यासाठी आपल्याला जमावामध्ये ‘पुरुषाची’ भूमिका पार पाडावी लागते. पण त्रिशला आणि यशनी या जुन्या मताला साफ खोटं ठरविण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. द्वेष करणारे द्वेष करत राहिले आणि संशय घेणारे संशय घेत राहिले पण त्यांनी आपल्या दृढ संकल्पाने आणि एकजुटीने सगळ्यांची वाचा बंद केली."

त्रिशला म्हणते की,’’ फॅशन हा महिला केंद्रित उद्योग आहे. आम्हाला आमच्या वयानुसार स्वतःला प्रमाणित करायचे होते कारण लोक फक्त मोठ्या वयाच्या महिलांना गंभीरतेने घेतात. लोक नेहमी आम्हाला कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुपात बघतात की, ज्यांनी आवेशात येऊन एक ब्लॉग तयार केला. लोकांमधला हाच भ्रमनिरास दूर करण्यासाठी आम्हाला अधिक कटू होऊन लोकांना समजावं लागलं की आम्ही फक्त एक यशस्वी व्यवसाय करण्यास प्रयत्नशील आहोत.’’

यशनी म्हणते की,’’ आम्ही आमच्या व्यवसाय वृद्धीसाठी उच्च दर्जाची सेवा पुरवणारी उद्दिष्टे निश्चित केली आहे. या उद्दिष्टांच्या परिपुर्ततेसाठी निश्चितच आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करतो आहे. फक्त चार महिन्यापूर्वी सुरु झालेली ‘’द कलर्ड ट्रंक’’कडे देशभरातल्या १०० पेक्षा अधिक उदयोन्मुख डिजाइनर आणि ब्रांड आहे, ८ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची एक फौज आहे. सध्या आमच्या व्यवसायात १९० टक्के दरमहा वृद्धी होत आहे आणि यांची एक नवीन वेबसाईट २२ ऑक्टोबरला सुरु झाली आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांची मनीषा आहे की येणाऱ्या दिवसात उद्योजक आणि ग्राहक यांना समोर समोर सादर करण्याची प्रयोगात्मक स्पर्धा आयोजित करण्याव्यतिरिक्त एक मोफत डाउनलोड होणारी इन-हाउस फॅशन मॅगझीन लवकरच सुरु करणार आहे.

"आगामी काळात आम्हाला फॅशन आणि डिझायनिंग क्षेत्रात बरयाच नाविन्यपूर्ण गोष्टी विकसित करायच्या आहेत. ज्यामुळे उदयोन्मुख फॅशन डिझायनर्सना अधिकाधिक संधी उपलब्ध होईल."


लेखक : बिन्जल शहा

अनुवाद : किरण ठाकरे