नेपाळ मधील या प्रसिध्द डॉक्टरांनी लाखभर लोकांना कशी मदत केली... पहा!

नेपाळ मधील या प्रसिध्द डॉक्टरांनी लाखभर लोकांना कशी मदत केली... पहा!

Thursday March 16, 2017,

2 min Read

डॉ. संदूक रूईत हे नेपाळ मधील नेत्रशल्यचिकित्सक आहेत, जे लोकांच्या डोळ्याचे आजार काही मिनिटात दूर करण्यात निष्णात आहेत. आतापर्यंत त्यांनी एक लाख वीस हजारावर लोकांच्या डोळ्यांवर उपचार केले आहेत आणि गरीब तसेच अंध लोकांमध्ये ते देव म्हणून लौकीक प्राप्त करून आहेत. त्यांनी हिमालयन कॅटरॅक्ट प्रकल्पाव्दारे भारताच्या उत्तरेतील राज्ये उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, तसेच पश्चिम बंगाल मध्ये अंधत्वावर मात केली आहे. त्यांनी तीलगंगा नेत्र केंद्राव्दारे नेपाळमध्ये आणि इतरत्र देखील अनेक नेत्रउपचार शिबिरांचे आयोजन केले आहे.


Image source: CNBC

Image source: CNBC


जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात २८५ दशलक्ष लोक असे आहेत, ज्यांना दृष्टीदोष आहेत, त्यात ३९ दशलक्ष लोक पूर्णत: अंध आहेत, आणि २४६ दशलक्ष लोकांची दृष्टी अधू आहे. मोतीबिंदू हे सर्वात मोठे अंध होण्याचे कारण गरीब आणि निम्न मध्यमवर्गिय उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहे.

एखाद्या अंधाला ज्याची आर्थिक पार्श्वभुमी बेताची असते, पुन्हा दृष्टी मिळवणे आणि सामान्यपणे डोळस होणे अशक्य आणि कठीण असते. अशा रूग्णांसाठी डॉ रूईत ‘मसिहा’ असल्याचे सिध्द करतात. केवळ २५ डॉलर्स खर्चातून ते मोतीबिंदूची सुक्ष्म शस्त्रक्रिया करून देतात. त्यात ते दूरच्या अंतरावरचे दूर्गम भागातील रूग्णांचा उपचार करतात. हे लोक त्यांच्याकडे पुन्हा दृष्टी मिळावी अशी अपेक्षा घेवून आलेले असतात. अनेक ग्रामिण जमातींपर्यंत पोहोचण्याचा ते स्वत: देखील नेहमीच प्रयत्न करत असतात.

संदूक साधी शस्त्रक्रिया करतात त्यातून ते रूग्णांच्या डोळ्यात थोडेसे टोचून मोतीबिंदूला बाहेर काढतात आणि त्या जागी कृत्रिम लेन्स बसवितात. या सा-या प्रक्रियेला अवघी पाच मिनिटे त्यांना लागतात असे डॉ रूईत यांनी सांगितले.

रूग्णांच्या डोळ्यावरील पट्टी एकदिवस काढली जाते, आणि त्या क्षणापासून त्याला दृष्टी परत मिळते.अगोदर रूग्णाला धुरकट आणि अंधूक दिसत असते मात्र आता ते स्पष्टपण पाहू शकतात. आता ते ज्या प्रकारची पध्दत वापरतात ती अमेरिकेच्या वैद्यकीय शिक्षणात देखील शिकवली जावू लागली आहे.


Image: CNN

Image: CNN


डॉ.रुईत यांचा जन्म नेपाळच्या दुर्गम भागात १९५५मध्ये झाला आणि त्यांनी भारतात, नेदरलँण्डस आणि अमेरिकेत जावून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. ज्यावेळी ते १७ वर्षांचे होते त्यांच्या बहिणीला बरा होणा-या टयूबरक्यूलायसिस ने गाठले. परंतू संसाधनाच्या अभावे त्यांना उपचार होवू शकले नाहीत आणि त्यातच त्या दगावल्या. संदूक यांच्या जीवनात हा प्रसंग स्वत:ला सिध्द करण्याचा होता त्यानंतर त्यांनी ठरविले की, ते इतरांसाठी जगतील आणि स्वत:साठी नाही.

ते म्हणाले की, “ मला कृतकृत्य झाल्याचे समाधान आहे कारण मी अनेकांच्या जीवनात परिवर्तन आणू शकलो”.

    Share on
    close