पाच असे प्रश्न जे महिलांना पटत नाहीत मात्र सदैव ऐकावे लागतात!

0

भारत हा गुप्तहेरांनी ( डिटेक्टिव्ह)  भरलेला देश आहे.  येथे डिटेक्टिव्ह गिरी करण्यासाठी कुठल्या वयाचे बंधन नाही अबालवृद्ध सारेचजण आपापल्या पद्धतीने काही अंशी  डिटेक्टिव्ह गिरी करताना आढळतात.  बाजूच्या बडबड्या मावशी पासून तर कुजबुजाट करणा-या शेजा-यांपर्यंत नाना तऱ्हेचे  डिटेक्टिव्ह तुमच्या आजूबाजूला सदैव वावरत असतात. सोशल मिडीयावरही जर तुम्ही तुमच्या बरोबर एखाद्या मुलाचा फोटो शेअर केला तर समोरून अनेक प्रश्न येतील. जसे कि हा तुमचा बॉयफ्रेंड आहे का? त्याबरोबरच एकावर एक फ्री असे एक नाही अनेक प्रश्न विचारले जातात. जरी तुमच्या जीवनात काही गुप्त ठेवायचे असले तरीही.

अशा प्रकारचे असंख्य असंख्य प्रश्न महिला आणि पुरूषांनाही विचारले जातात. त्यातील पाच असे जे सर्वसाधारणपणे सारखेच असतात, आणि ते असे आहेत ज्यांची महिलांना घृणा येते, ते असे आहेत :

तू एकटीच आहेस का?

तर, हा प्रश्न बहुसंख्य महिलांना कंटाळा आणणारा प्रश्न असतो, ज्याची त्यांना सवय झालेली असते, हा बालिश प्रश्न असतो मात्र त्यांचा मनावर परिणाम होत असतो. मग शॉपिंगला जात असा किंवा रात्री बेरात्री एकट्याने जात असा, किंवा सुटीसाठी गेले असा -- सा-यांना चिंता असते तुम्ही एकट्याच कशा !

भारतात जेथे सुरक्षा हा महत्वाचा विषय आहे, महिलांना नेहमी प्रश्न विचारला जातो की त्या काळोख व्हायच्या आधी घरात का जात नाही? पण हे इतक्यातच थांबत नाही, त्यातून महिलांच्या बाबतीत आणखी काही गोष्टी होतात, जसे की त्या एकट्याने प्रवास करत असतील तेंव्हा, एकट्याच रहात असतील तेंव्हा, किंवा एकट्याच खात असतील किंवा खरेदीला गेल्या असतील तेंव्हा.  ज्यावेळी कुणी पुरूष किंवा महिला सांगते की, ते रस्त्याने एकट्याने प्रवासाला जात आहेत, तुम्ही त्यांना प्रतिसाद काय मिळतो पहा. पुरूष जात असेल तर ठिक आहे, लोक सांगतील ‘सांभाळून जा’, मात्र महिला जात असेल तर लगेच विचारणा होते, चेह-यावर त्यांच्या बद्दलचा अविश्वास दाखवत, “ तू एकटीच निघाली आहेस?”

पुढल्या वेळी तुम्हाला असा प्रश्न विचारला तर सांगा महिला देखील स्वत: एकट्या फिरू शकतात, स्वत:च्या हिमतीवर सारे काही करू शकतात.

हा व्यवसाय महिलांना करण्यासारखा नाही.

पत्रकारितेत अनेक तास फिल्डवर काम करावे लागते, कित्येकदा योग्य प्रकारचे प्रसाधनगृह देखील मिळत नाही. त्यामुळे हा महिलांसाठी योग्य व्यवसाय नाही. तेलाच्या जहाजावर काम करण्याचा तर प्रश्नच वेगळा आहे- तुम्ही एकटीच महिला तेथे आहात, जर काळोख झाला तर तुम्ही असुरक्षित होता, हा आवाज कौटुंबिक असतो? ब-याच महिलांना अशा प्रकारच्या प्रश्नाना नेहमी तोंड द्यावे लागते, त्यात कुटूंबाचे कथित हितचिंतक, किंवा पालकही असू शकतात, ज्यांना मुलींचा व्यवसाय महत्वाचा नसतो त्यापेक्षा त्यांनी तो न करणे ते योग्य समजतात.

आमच्या मुलींच्या कारकिर्दीच्या चर्चा आम्ही थांबवू शकत नाही का? आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्राबद्दल अवमानना का थांबवित नाही? ते त्यांचे स्वप्न आहे त्यांना त्यात रमू द्या.

तुला सेटल होण्याची हीच वेळ नाही का?

हा आणखी एक प्रश्न, जो काही प्रमाणात स्फोटक असतो आणि काही वेळा निशब्द करणारा देखील. “ कारण तुझे वय वाढत चालले आहे, आणि चांगला जोडीदार नंतर मिळणार नाही.” बहुतांश तरूण मुली आणि एकट्या महिलांना या प्रश्नाचा कंटाळा येतो, जो त्यांच्या कुटूंबाकडून आणि नातेवाईकांकडून सातत्याने विचारला जातो.

हा असा प्रश्न असतो ज्यावेळी त्या नव्या जॉबच्या मुलाखतीला जात असतात, किंवा नवा उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी कामाच्या ठिकाणी असणारे सहकारी देखील त्यात सहभागी असतात ज्यांना तुम्ही थांबवू शकत नाही. त्यांचा रोख असा असतो की जर महिलांना काही ओळख किंवा यश मिळायचे असेल तर ते लग्न करूनच मिळते, तिला योग्य तो पुरूष मिळाला तरच ती परिपूर्ण होते.

विवाह हा खरच इतका मोठा मैलाचा दगड आहे का? महिलांच्या कारकिर्दीबाबतचे काय? त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षाचे काय? त्यांना काहीच मोल नाही का?

तुला मुले नको आहेत का?

“तुम्हाला मी आनंदी आहे ते पाहवत नाही का?” असे माझे या प्रश्नाला उत्तर असते. आणि हे पुन्हा पुन्हा जवळच्या मित्रांकडून विचारले जाते, किंवा घरच्यांकडून सांगितले जाते की, ‘मला मुले-बाळे नाहीत का?’ खरेतर यात कुणाचा काय संबंध असतो महिलेला हवे तेंव्हा ती मुलाला जन्माला घालेल, हे तिच्या जैविक घड्याळानुसार ठरेल, आणि तुम्ही तिला सारखे सारखे याच ‘भल्याच्या गोष्टीची आठवण’ करून देण्याची गरज नसते.

लग्ना नंतर जोडप्याला ठराविक वर्षात मुल झाले नाही तर, लोक अंदाज लावतात की त्यांना काहीतरी वैद्यकीय अडचण असेल, आणि मग हताश चेह-याने ज्येष्ठ महिलांचे घोळके गायनॉकोलॉजीमधील सल्ले देण्यास सुरूवात करतात. ज्यात चमत्कार होतात, किंवा काही वेळा त्या दत्तक मुल घेण्याचा सल्ला देखील देवून टाकतात, हे चक्र आहे ज्याचा भारतात ब-याचदा महिलांना अनुभव येतो, ही आमची संस्कृतीच आहे ज्यात महिलेला मूल नको असते हे मान्यच नाही होवू शकत? प्रत्येक महिलेला मातृत्वच असायला हवे हा हट्ट असतो, आणि हीच वेळ आहे आपण त्यात सुधारणा करायला हवी.

तू इतर मुली- महिलांसारखी का वागत नाहीस?

हा प्रश्न हळूवारपणे हेच सांगतो की महिला आणि पुरूष यांच्यात अंतर असते आणि महिलांना त्यांच्या मर्यादेत वागायला हवे. शतकानुशतके महिलांना गृहित धरण्यात आले की त्यांनी ठराविक मार्गानेच जावे, आणि ज्यावेळी मागील शतकात या मळलेल्या वाटा मोडण्यात येवू लागल्या, महिलांना त्यांच्या चाकोरीत राहण्याचा सल्ला मिळू लागला.

अगदी व्हिक्टोरियन काळापासून त्याच्या जोखडबंद चौकटीत बदल झाला नाही, जगाच्या अनेक भागातून त्यांच्यावर बंधने घातली जात असतात, मग ती जिन्स घालावी की नाही येथ पासून शाळेत जावे की नाही इथपर्यंत होती. महिलांच्या धुम्रपान, मद्यपान, जुगार खेळणे किंवा मुक्तसंचाराला आजही खालच्या पातळीवरचे समजले जाते.

महिलांना इतकी बंधने कशासाठी? आम्हाला आम्ही जश्या आहोत तश्या सन्मानाने का वागवले जात नाही? आमच्या आचारसंहितेचे जोखड कशासाठी? तुम्ही पुरूष असा किंवा महिला इतरांना विचारणे सोडा, महिलांच्या या प्रश्नाना आवरा आणि त्यांना त्यांची ओळख मिळू द्या. त्यांची उद्दीष्ट्ये गाठू द्या, आणि त्यांच्या लैंगिकतेचा सन्मान होवू द्या.

लेखिका - तन्वी दुबे