ही महिला आणि त्यांचा पती पराठे विकतात, त्यांना पीएचडी करायची आहे म्हणून!

ही महिला आणि त्यांचा पती पराठे विकतात, त्यांना पीएचडी करायची आहे म्हणून!

Friday August 18, 2017,

2 min Read

थिरुवनंतरपूरमच्या टेक्नोपार्कमध्ये एक फूडजॉइंट आहे जेथे एक जोडपे पराठे विकताना दिसते. स्नेहा लिंबगावकर या केरळामधील पीएचडी विद्यार्थीनी आहेत आणि त्यांचे पती प्रेमशंकर मंडल ज्यांनी दिल्लीचे कँग (भारताचे मुख्य लेखापरिक्षक यांचे कार्यालय) मधील आपली नोकरी सोडली आहे आणि त्यांना मदत करत आहेत. हे सारे ते यासाठी करत आहेत की स्नेहा यांना त्यांची स्नातक पदवी परिक्षा निर्विघ्नपणे पार पाडता यावी!


image


मराठी असलेल्या स्नेहा यांची भेट प्रेमशंकर यांच्याशी ऑर्कूटवर झाली जे झारखंडचे आहेत, त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले. त्यांच्या पालकांच्या नकारानंतरही त्यांनी २०१६मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात प्रेमशंकर दिल्लीत शिक्षण घेत होते. तर स्नेहा यांना शिक्षणात विशेष रस आहे त्यामुळे त्यानी स्नातक परिक्षा पीएचडी देण्याचे निश्चित केले. स्नेहा यांच्या निर्णयाला त्यांनी मनापासून साथ दिली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सारे करण्याची तयारी केली.

स्नेहा यांना लवकरच पोस्ट डॉक्टरेट केरळा विद्यापिठातून मिळेल ज्या लवकरच त्यांचे संशोधन पूर्ण करतील. २०१४ मध्ये त्या प्रथम त्यांच्या एम.फिल साठी केरळात आल्या, आणि तेंव्हापासून इथेच रहात आहेत. प्रेमशंकर ज्यांनी सामाजिक सेवा क्षेत्रात पदवी घेतली आहे, स्नेहा यांना स्नातक परिक्षा उत्तिर्ण करता यावी म्हणून नोकरी सोडून केरळात आले. ज्यावेळी स्नेहा यांना फेलोशिप मिळणे बंद झाले त्यावेळी आर्थिक चणचण सुरू झाली, मात्र त्यांनी पराठा विक्री करण्याचे ठरविले आणि अविरतपणे काम आणि शिक्षण सुरूच ठेवले.

स्नेहा यांच्या विद्यापिठाच्या कॅम्पस पासून दहाच मिनिटाच्या अंतरावर हा फूड जॉईंट आहे त्यामुळे त्यांचे काम झाले की त्या देखील येथे येवून काम करतात. येथे पराठा शिवाय ते डोसा, आणि ऑमलेट देखील विकतात. प्रेम सांगतात की यातून मिळणारे पैसे ते शिक्षणासाठी खर्च करत आहेत, त्यातूनच रोजच्या गरजा भागवत आहेत आणि भविष्याची तरतूदही करत आहेत.

स्नेहा यांना शिक्षण पूर्ण करून शास्त्रज्ञ व्हायचे आहे, भविष्यात त्या जर्मनीत जाणार आहेत असे त्यांनी निश्चित केले आहे. जेथे त्यांच्या कार्याच्या कक्षा रूंदावरणार आहेत असे त्यांना वाटते. प्रेमशंकर यांना देखील स्वत:चे रेटॉरेंट सुरू करायचे आहे, एकदा की स्नेहा यांचे स्वप्न पूर्ण झाले की!