५१ वर्षीय महिलेने स्वत: खणली विहीर, तीन महिन्यात लागले पाणी !

 

0

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील ५१ वर्षीय महिला ज्यांना आता महिला भगिरथ म्हणून ओळखले जाते, गौरी एस नाईक यांनी स्वत: विहीर खणली आणि तीन महिन्यात तीला पाणी लागले. 

रोजंदारीवर काम करणा-या आणि एका अपत्याची माता असलेल्या त्यांनी १५ नारळाची झाडे लावली आहेत, ज्यांची त्या काळजी घेतात. काही केळीची झाडे आहेत, याशिवाय १५० पोफळीची झाडे आहेत जी त्यांच्या घराजवळ लावली आहेत. या झाडांसाठी त्यांना पाणी लागते, जे उपलब्ध नाही. त्यांच्या समोर फक्त विहीर खणणे हाच पर्याय होता. त्यामुळे लोकांना त्याबाबत विचारणा करणे म्हणजे पैसे घालविणे ठरले असते, जे त्यांच्याजवळ अजिबात नव्हते.


त्यामुळे या सा-या स्थितीने त्यांना विहीर खणण्यास प्रवृत्त केले. आणि त्यांनी तीन महिने रोज सहा तास खणण्याचे काम केले. कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता. त्या जमिनीत रोज चार फूट खाली खणत गेल्या, स्वत:च्या हाताने आणि शेवटी त्यांनी तीन महिलांची मदत घेतली, विहीरीतील गाळ काढण्यासाठी. आता विहीर ६० फूट खोल आहे ज्यामध्ये सात फूट पर्यंत पाणी आहे.

विनोदा, धर्मस्थळ ग्रामिण विकास प्रकल्पाच्या अधिकारी म्हणाल्या की, “ ज्यावेळी गौरी बैठकीला आल्या, त्यांनी अंग दुखण्याची तक्रार केली. पण आम्हाला त्यांच्या या खणण्याच्या प्रकाराची माहितीच नव्हती. आम्हाला हे त्याचवेळी समजले ज्यावेळी आम्ही त्यांच्या घरी बघायला गेलो.”

गौरी या प्रकल्पाच्या भाग आहेत, जो वर्षभरापूर्वी सुरू झाला होता. ज्याचा उद्देश महिला सक्षमीकरण हा आहे. या प्रकल्पा अंतर्गत त्यांनी ५००१ स्वयंसहायता बचत गट तयार केले. ज्यांचा उद्देश लोकांना गरीबीतून बाहेर काढणे आणि चांगले जीवन बहाल करणे हा आहे. गौरी या चांगले उदाहरण ठरल्या आहेत, ज्यांनी महिलांच्या शक्तिचा योग्य उपयोग कसा असतो ते दाखवले आहे, महिला कशा सक्षम असतात याचा त्यांनी अन्य महिलांना आदर्श घालून दिला आहे. (थिंक चेंज इंडिया)