हरित लवादाने बेलांदुर तलावाच्या सानिध्यातील सर्व उद्योगांना बंदी घातली आहे!

हरित लवादाने बेलांदुर तलावाच्या सानिध्यातील सर्व उद्योगांना बंदी घातली आहे!

Saturday April 22, 2017,

2 min Read

१९ एप्रिल २०१७ रोजी राष्ट्रीय हरित लवादाने बंगळूरूच्या बेलांदूर तलावाच्या परिसरातील सर्व उद्योगांना तात्काळ बंदी घातली आहे. हा त्याचाच परिणाम आहे की, महापालिका क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या औद्योगिक रासायनिक टाकाऊ पदार्थांचे विसर्जन तलावात करता येणार नाही.असे दिसल्यास पाच लाख रूपये दंड आणि शिक्षा केली जाणार आहे.


image


पादचारी येथून जाताना नाक दाबून घेतात कारण बेलांदूर तलावातून दुर्गंध येत असतो. याबाबतच्या वृत्तानुसार हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र आणि न्या. आर एस राठोड यांनी म्हटले आहे की, “ बेलांदूर तलावाच्या सानिध्यात असलेल्या सर्व प्रकारच्या उद्योगांना जे सांडपाणी विसर्जित करतात, प्रक्रिया करून अथवा न करताच त्यांना आदेशित करण्यात येते की त्यांनी उद्योग बंद करावे. संयुक्त पाहणी दलाने पाहणी केल्याशिवाय कोणत्याही उद्योगाला या क्षेत्रात ते चालविण्यास मनाई आहे जर ते प्रदुषणाची पातळी मर्यादा ओलांडून जात असतील. जर कुणी या आदेशाची पायमल्ली करताना आढळून आले तर त्यांना पाच लाख रूपये दंड केला जाईल.

हरित लवादाने कर्नाटक राज्य सरकारला निर्देश दिले आहेत की, प्रदुषण नियंत्रण मंडळ, तलाव विकास प्राधिकरण आणि बंगळूरू सुधार प्राधिकरण यांनी हा तलाव स्वच्छ करण्यासाठी काम सुरू करावे आणि महिनाभरात अहवाल सादर करावा. बंगळुरू मधील २६२ तलांवा मधील सर्वात मोठ्या असलेल्या या तलावात शहरातील ४० टक्के सांडपाणी सोडले जाते. याकडे लक्ष त्यावेळी देण्यात आले ज्यावेळी तलावातील पाण्याला आग लागण्याचा प्रकार समोर आला. आता पर्यंत तलावात तीनदा आगी लागल्या आहेत. त्याचे कारण ज्वलनशील मिथेन वायूचे प्रमाण इतर घातक वायू सोबत वाढत आहे.

हरित लवादाने कर्नाटक सरकारला विचारणा केली की, याबाबत देण्यात येणा-या सूचनांची अंमलबजावणी का होत नाही. आगीच्या घटनाबाबत बेलांदूर तलावाच्या परिसरात गेल्या वर्षीच लवादाने काही सूचना केल्या होत्या. राष्ट्रीय हरित लवादाने विचारणा केली की, “ सरकारी विभागांनी लवादाच्या आदेशांची नाकाबंदी का केली? सांडपाण्याच्या विल्हेवाटी साठी सरकार काय करत आहे. आणि त्यावर सध्या कोणत्या प्रकारे प्रक्रिया केली जाते?

लवादाने आता संबंधित विभागांना सफाई मोहिम घेण्यास सूचना केल्या आहेत की तातडीने तलाव स्वच्छ करावा आणि याची काळजी घ्यावी की उद्योगांचे सांडपाणी त्यात पुन्हा टाकले जाणार नाही. (थिंक चेंज इंडिया)