तेरा हजार मुलांनी जीवनात पहिल्यांदाच वापरले पादत्राण!

तेरा हजार मुलांनी जीवनात पहिल्यांदाच वापरले पादत्राण!

Tuesday January 17, 2017,

2 min Read

मुंबईच्या ग्रीनसोल फाऊंडेशनने ऍक्सिस बँकेच्या रिटेल लेंडिंग ऍण्ड पेमेंट विभागाच्या मदतीने १४ डिसेंबर २०१६ रोजी महादान अभियान ‘उडान’ राबविले. लखनौ जिल्ह्यातील शाळांतून १३हजार पादत्राणांच्या जोड्याचे वितरण करण्यात आले. देशात सामाजिक आर्थिक पर्यावरणीय क्षेत्रात काम करताना ग्रीनसोलने तीस हजार पादत्राणे दान केली आहेत ज्यांना पायात एकही पादत्राणांची जोडी नाही अशा वंचितांना हे दान करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३च्या अहवालानुसार १.५ दशलक्ष लोकांना पायात घालायला चपला नाहीत त्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू अनवाणी पायाने फिरल्याने होणा-या रोगांनी होतो.

श्रीयांस भंडारी, ासंस्थापक, ग्रीनसोल ऍण्ड हेरिटेज गर्ल्स स्कूल म्हणाले की, “ अनेक मुले जी या उडान उपक्रमाचा भाग आहेत त्यांनी जीवनात कधीच स्लिपर्स देखील वापरल्या नाहीत. त्यांना चांगल्या दर्जाचे बूट देणे गरजेचे आहेच शिवाय ते रोज त्यांनी वापरावे अशी सवय त्यांना लावणे हे देखील आवश्यक आहे.”


image


“अशा प्रकारच्या विलक्षण उपक्रमात ऍक्सिस बँकेने दहा हजार पादत्राणे देवून मोठे योगदान दिले आहे, तर याशिवाय इतर कंपन्या जसे की सिप्रा, मेक माय ट्रिप, आणि गोक्वि यांनी एकत्रितपणे तीन हजार पादत्राणे दिली आहेत” भांडारी यांनी सांगितले.

संस्थेने अक्षय पात्रा फाऊंडेशन सोबत जे१.५ दशलक्ष मुलांच्या माधान्ह भोजनासाठी स्वयंपाकाची जबाबदारी घेतात, त्यांनी लखनौ जिल्ह्यात ही पादत्राणे वितरीत करण्यासाठी मदत केली. “ बहुतांश मुले अत्यल्प उत्पन्न गटातून बाहेरच्या भागातून येतात, या शिवाय त्यांना व्यक्तिगत कर्ज देखील असते, मुलांच्या शिक्षणाचा आणि पालन पोषणाचा खर्च असतो त्यामुळे चपला, बूट विकत घेणे त्यांना दुय्यम आणि न परवडणारे असते. “ भंडारी यांनी सांगितले.


श्रीयांस भंडारी, संस्थापक,ग्रीनसोल

श्रीयांस भंडारी, संस्थापक,ग्रीनसोल


ऍक्सिस बँकेचे सहायक उपाध्यक्ष रवि काला म्हणाले की, “ऍक्सिस बँकेच्या रिटेल लेंण्डिंग आणि पेमेंटस् विभागाने ६२५ पादत्राणे सिरगामाऊ आणि सारसांडा या लखनौ येथील शाळांना दिल्या आहेत, यांचे वित्रण १२३७५ पादत्राणांच्या जोडीने ८७ शाळांमध्ये आठवडाभरात करण्यात आले.”

“ उडाण या उपक्रमात वंचितांना मदत केली जाते, त्यासाठी ग्रीनसोल त्यांच्या कल्पना इतरांशी वाटून घेतात. त्यात कार्बन फूटप्रिंटच्या क्षेत्रात काम केले जाते, वंचिताना पादत्राणे पुरविली जातात, याशिवाय अकुशल कामगारांना रोजगाराच्या संधी ग्रिनसोल मार्फत दिल्या जातात.” रवि काला सहायक उपाध्यक्ष ऍक्सिस बँक यांनी सांगितले. (सी एस आर च्या सौजन्याने)