विशेष मुलांची काळजी घेणारी ʻतमाहारʼ

विशेष मुलांची काळजी घेणारी ʻतमाहारʼ

Monday October 26, 2015,

5 min Read

ʻया मुलांची सर्वसामान्य सेवा करण्यात आणि देखभालीत बराच पैसा खर्च केला जातो. यापेक्षा या मुलांना अधिक स्वावलंबी आणि समर्थ बनविण्याची गरज आहे. ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि ते एका सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे स्वतःला स्वतंत्र समजू शकतात.ʼ, असे 'तमाहार' या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका वैशाली पै यांचे मत आहे. येथे ʻया मुलांचाʼ म्हणजे अशा मुलांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना विशेष देखभालीची गरज असते. आपल्या संस्थेद्वारे त्यांनी आतापर्यंत बंगळूरू आणि पाली येथे दोन केंद्र उभारली आहेत, जेथे शारीरिक आणि मानसिकरित्या विकलांग असलेल्या मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. तसेच त्यांच्या परिवाराला देखील मदत करण्यात येते.

ʻआमच्या मते, मुलांना विचार करणे, एखादा विषय आत्मसात करणे आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, अखेरीस ते सर्व लक्षात ठेवणे, याबाबत शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. शारिरीक आणि मानसिकरित्या अपंग असलेल्या मुलांसाठीदेखील हेच योग्य आहे. भले त्यांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असू देत आणि त्यांना विशेष देखभालीची आवश्यकता असू देत. फरक फक्त एवढाच आहे की, या मुलांना अशा पद्धतीने प्रश्न विचारावे लागतात की त्यांना ते समजतील आणि त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागतो. ʼ, असे त्या सांगतात.

image


वैशाली २५ वर्षांपूर्वी जेव्हा मुंबई येथून बंगळूरूला आल्या तेव्हा त्यांनी ʻऑक्युपेशनल थेरपीʼ विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. त्या सांगतात की, ʻमी इंदिरानगरस्थित कर्नाटक येथील गतिमंद मुलांच्या सोसायटीमध्ये (द स्पास्टीक्स सोसायटी ऑफ कर्नाटक) काम करायला लागली. मी तेथून १९ किलोमीटर दूर राहत होते आणि मला तीन-तीन बसेस बदलून कामावर पोहचावे लागत होते. रोजरोजच्या त्या प्रवासात मला अशा मुलांच्या पालकांना, कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळाली जे व्यवस्थित चालू शकत नव्हते किंवा दैनंदिन व्यवहार करू शकत नव्हते. लांबच्या लांब प्रवास करुन ते मोठ्या मुश्किलीने उपचार करण्यासाठी पोहचत होते.ʼ याबाबत बोलताना वैशाली यांचे डोळे भरुन आले होते. तेव्हाच त्यांनी आसपासच्या उपनगरीय आणि ग्रामीण परिसरांच्या सोयीकरता बंगळूरूच्या उत्तर-पश्चिमी परिसरात एक कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनात या कार्यक्रमाची रुपरेखा स्पष्ट होती. ʻमला वाटते की, शहरी क्षेत्रात सात किलोमीटरमध्ये आणि ग्रामीण क्षेत्रात १५ ते २० किलोमीटर परिघात एक केंद्र असणे गरजेचे आहे.ʼ, असे त्या सांगतात.

image


कार्ययोजना :

ʻजेव्हा आम्ही या मुलांसोबत काम करतो, तेव्हा आम्ही त्यांच्या संपूर्ण मेंदूसोबत संवाद करत असतो. टप्प्या टप्प्यात कोणता शब्द किंवा शरीराची हालचाल शिकवत नाहीʼ, असे त्या सांगतात. विविध उपचारांमध्ये नियमित हस्तक्षेप करण्याऐवजी आमच्या शिक्षण पद्धतीत आमचा भर मनोरंजक उपक्रमांवर असतो. ʻखोलीमधील किंवा बाहेरचे खेळ आमच्या अभ्यासक्रमातील महत्वाचा भाग असतात. यापाठीमागे असा विचार असतो की, ही मुले खेळताना दुसऱ्या मुलांच्या हालचालींवरुन जास्त चांगल्या पद्धतीने शिकतात. भलेही शारिरीक अशक्तपणामुळे काही मुले स्वतः त्या खेळाचा भाग होऊ शकत नाहीत. तेव्हा ती दुसऱ्या मुलांना खेळताना बघून आनंदी होतात.ʼ, असे त्या सांगतात.

image


अभ्यासक्रम

विशिष्ट गरजा असलेल्या या मुलांच्या बाबतीत एक मोठा प्रश्न म्हणजे कुटुंबातील त्यांची भूमिका. तमाहारमध्ये या मुलांच्या माता आणि इतर नातेवाईकांकरिता एक विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. ʻआम्ही या परिवारांच्या सर्व सदस्यांसोबत चर्चा करतो आणि त्यांनादेखील याबाबत प्रशिक्षण देण्याचा प्रय़त्न करतो. ज्यामुळे वेळ आल्यास त्यांनादेखील आपल्या अपत्यांची परिस्थिती आणि त्यांची समस्या चांगल्या पद्धतीने माहित असावी.ʼ, असे त्या सांगतात. वैशाली म्हणतात की, अपंग लोकांना समाज सहजरित्या स्वीकारू शकतो, असा त्यांना विश्वास आहे. तसेच सामान्य नागरिकांप्रमाणे ते सामाजिक व्यवहार करू शकत नाही, हे समजणे चुकीचे आहे, असे त्या सांगतात. मुलांच्या जीवनात जे लोक त्यांच्या सतत संपर्कात असतात, त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करणे, अत्यंत आवश्यक आहे. वैशाली यांनी सांगितले की, ʻआपले मूल सामान्य व्हावे, असे बऱ्याच लोकांना वाटते. मात्र हा काही पर्याय नाही. त्या लोकांनी चांगल्या पद्धतीने हेच समजून घ्यायला हवे की, त्यांच्या मुलांच्या गरजा या सर्वसामान्य आहेत आणि तेच त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतात.ʼ

टीम

मुलांप्रति प्रेम आणि शिकवण्याची इच्छा या दोन योग्यता सदस्यांमध्ये हव्यात. वैशाली सांगतात की, ʻशैक्षणिक योग्यता असणे, हे उत्तमच. मात्र ती असणे अनिवार्य नाही. शैक्षणिक ज्ञानाच्या तुलनेत कामाप्रति प्रेम, काम करण्याची क्षमता आणि कामाची गुणवत्ता जास्त महत्वपूर्ण आहे. काही खास कामांसाठी म्हणजे योग थेरपी, क्लिनिकल सायकॉलॉजी, संगीत थेरपी, फिजियो थेरपी किंवा ऑरगॅनिक शेती या कामांसाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते.ʼ

image


साध्यता आणि व्यवहार्यता

वैशाली सांगतात की, ʻआम्हाला आमच्या उपचारपद्धतीचे सामर्थ्य आणि गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक कुटुंबाकडून एक निश्चित तसेच किमान शुल्क आकारतो. कारण मोफत सेवा पुरवल्यास उपचारांना गंभीरतेने घेण्यात येणार नाही, असे आम्हाला वाटतेʼ, असे त्या सांगतात.

हे शुल्क परिवाराचे उत्पन्न आणि घरापासून या परिसरातील अंतर यावर अवलंबून असते. सर्व चिकित्सा केंद्र पूर्णपणे नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत. तसेच या केंद्रांमध्ये वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तू वैशाली यांच्या परिवाराकडून दान स्वरुपात प्राप्त झालेली आहे. त्या सांगतात की, हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. मात्र अशक्य नाही. आर्थिक स्वरुपात भलेही हे केंद्र स्वतःच्या पायावर अद्यापही उभे नाही. मात्र नियोजन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे पूर्णपणे स्वतंत्र आहे. ʻयापूर्वीच मी या केंद्राच्या दैनिक आणि काही व्यवस्थापकीय कामातून मुक्त झालेली आहे. ʼ, असे सांगताना वैशाली ʻतमाहार संघटनात्मकरित्या एवढी मजबूत झालेली आहे की, कोणीही प्रमुखपदी असू देत संघटनेचे काम याप्रमाणेच चालत राहिलʼ, हा मुद्दा अधोरेखित करतात.

image


ʻआमचे काम आता सुरू झालेले आहे आणि अजुनही गावे, शहरे आणि मोठ्या शहरांतील वस्त्यांमधील बहुसंख्य लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याचे आव्हानात्मक काम आमच्यासमोर आहे. ʼ, असे त्या सांगतात. कितीतरी व्यक्तिमत्वे अशीच वाया जात आहेत कारण या मुलांना विकसित होण्याची आणि विकसित होऊन समाजोपयोगी सदस्य बनून आपली भूमिका पार पाडण्याची संधीच मिळत नाही, असे वैशाली सांगतात.

विविध तत्वांनी बनलेली संवेदनशील संरचना

या कार्यात असामान्य असे काहीच नाही, असे वैशाली नम्रतापूर्वक सांगतात. ʻहे सांगणे चुकीचे ठरेल की, सर्व मूले एकसारखी असतात किंवा या सर्वांसोबत एकसारख्याच पद्धतीने वागले पाहिजे. मात्र मुले ही मुलेच असतात. मग ती अविकसित तंत्रिका (न्युरो- टिपिकल) यामुळे पिडित असलेली मुले असली तरीही किंवा विशिष्ट देखभालीची आवश्यकता असलेली मुले असली तरीहीʼ, असे वैशाली सांगतात.