आपण किती कोडगे आहात ?

आपण किती कोडगे आहात ?

Thursday May 26, 2016,

4 min Read

जीवनात आपल्या मोठ्या महत्वाकांक्षा काय आहे ? एखादी उत्कट इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण दीर्घकाळापासून वाट पहात असाल ? अनेकांना रिफ्रेश होण्यासाठी दीर्घ सुट्टी हवी असते, आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्याच्या नियोजनासाठी वेळ हवा असतो. या अत्यावशक वाटणाऱ्या गोष्टींची घालमेल अनेकांच्या मनात सुरु असते, मी मात्र एक वेगळीच इच्छा मनी बाळगून आहे किवा तसे करण्यास प्रयत्नशील आहे ती म्हणजे स्वतःची कातडी गेंड्यासारखी जाड करण्याची, अर्थात कोडगे होण्याची. अनेक वर्षांपासून तसे करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, मात्र तसे करणे सोपे नाही, तसे होण्यासाठी अनुवंशिकता आवश्यक असल्याचे मला वाटते एका पिढीजात संवेदनशील मनाला कोडगे वा कठोर करण्यासाठी खूप प्रयत्न, खूप कष्ट उपसावे लागतात.

याप्रमाणेच, आपल्या आयुष्यात इतर गोष्टींही प्राप्त करण्यासाठी गरज पडल्यास कोडगे व्हावे लागते. जे पालक किवा गुरुजन आपल्याला घडवत असताना मवाळ भूमिका घेतात, त्यांच्या भुमिकेचे मी समर्थन करत नाही. तुम्हाला आठवत असेल जर एखादी गोष्ट तुम्हाला करावयास सांगितली आणि तुम्ही ती केली नाही, त्याचे पालन तुम्ही केले नसेल किवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागला नसेल तर तुम्हाला रागावणे किवा शिक्षेला सामोरे जावे लागले असेल नाही का ? “ तु माझं फक्त ऐकून घे,” किवा “मी सांगितलेले ऐकून न ऐकल्यासारखे करू नकोस” आणि “ जरा इकडे लक्ष दे ” यासारखे वाक्य तुमच्या पालकांकडून वा गुरुजनांकडून तुम्हाला ऐकावे लागले असतील आणि ते तुम्हाला ऐकूनच घ्यावे लागले असतील. जे सांगितले जाते त्या गोष्टीचे पालन करायला भाग पडले गेले असेल अन्यथा माफी मागावी लागली असेल की, “मला माफ करा, माझे चुकले...” असे शंभर वेळा वहीत लिहावे लागले असेल किवा न ऐकण्याची शिक्षा म्हणून दरवाज्याच्या बाहेर उभे केले असेल.

image


सुरवातीला मी तर पूर्णतः वरिष्ठांनी सांगितलेले ऐकून घेण्याची सवय लावून घेतली होती. ही ऐकून घेण्याची सवय आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना कमकुवत बनवते असेही मला वाटायचे. त्यांच्या सुरात सूर मिळवण्याची आपल्याला सवयच होऊन जाते. कधी कधी तर काही गोष्टी मोठ्या स्वरात ऐकवल्या जातात की ज्या आपल्या आपल्यालाही ऐकू येत नाही.

मला आठवते, माझ्या स्टार्टअपच्या सुरवातीच्या काळात एका सज्जन व्यक्तीने अचानक केलेल्या असभ्य वर्तणुकीने मला रडवले होते, असो. मी मुद्द्याकडे येते, त्या व्यक्तीने असभ्यपणे केलेला, जिव्हारी लागणारा शेरा मला आठवतो. ते ऐकून मी बाहेर पडले, मला अश्रू आवरणे कठीण झाले. त्या गृहस्थाचे बोलणे खूप अपमानकारक आणि हीन दर्जाचे होते. मला कळत नव्हते की मी काय करू... आणि नेमका त्याचवेळी माझ्या वडिलांचा मला फोन आला. मी फोन घेतला आणि सर्व काही सुरळीत असल्याचा आव आणला. मात्र, त्यांनी बरोबर हेरले की मी कोणत्यातरी अडचणीत आहे म्हणून. “ काय झालं ?” त्यांनी विचारले. माझे गाऱ्हाणे किवा अडचण आई-वडिलांना सांगण्याची मला सवय नाही, त्यादिवशी मात्र घडलेले सर्वकाही मी त्यांना सांगितले. त्यावेळी ते मला काय बोलले असतील तर, “ तु जेव्हा रस्त्यावर उभी असतेस तेव्हा रस्ता पार करणे आणि वर्दळीचा सामना करणे तुला क्रमप्राप्तच आहे, जे तुला जमलेच पाहिजे ”

आता अनेक वर्षानंतर मी खरोखर रस्ता योग्य पद्धतीने पार करायला शिकली आहे का ? कदाचित पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने, पण अद्यापही अधेमध्ये अत्यंत त्रासदायक वाहतुकीचा अर्थात लोकांचा सामना मला करावा लागतो.

ज्यांना कोणाला कोडगे बनायचे आहे, त्यांना मी सर्वप्रथम हे सांगेन की, तुम्ही मूलतः कोडगे किवा निर्दयी नाही यासाठी तुम्ही सर्वप्रथम स्वत:चेच आभार माना. कारण वर्तमान जगतात संवेदनशील असणे देखील उल्लेखनीय मानले जाते, मात्र अनेकवेळा ते अयोग्य आणि कमकुवतपणाचेही मानले जाते, एक मजबूत व्यावसायिक नेता असण्यासाठी असे असणे अपेक्षित नाही. असे असले तरीही माझे मात्र याबाबत दुमत आहे. मला वाटते, 

“आपल्यात असलेली संवेदनशीलताच आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे ”.

“ज्याला खूप रडता येते त्यालाच खूप मोठ्याने हसताही येते.”

त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे, स्वतःच्या संवेदनशीलतेवर प्रेम करा आणि त्याची इतरांनाही जाणीव करून द्या. कितीही ठरवले तरी कोडगे बनणे एकाकी शक्य नाही त्यासाठी नियमित सराव असणे आवश्यक आहे. दररोज, आपल्या सभोवताली वावरणाऱ्या लोकांच्या निर्दयी वागण्याकडे दुर्लक्ष करा. खरं तर त्यांच्यावर प्रेम करा, त्यामुळे आपण अधिकाधिक मजबूत बनतो.

लक्षात ठेवा, प्रत्येक अपमान, प्रत्येक अस्वीकृती आपल्याला मजबूत बनवत असते.

युवर स्टोरीच्या संस्थापिका आणि मुख्य संपादिका श्रद्धा शर्मा यांच्या आणखी काही कहाण्या वाचा :

मला माहित नाही... आणि मला त्या गोष्टीचा पश्चातापही नाही

जे मिळालेलं नाही ना, तेच तुम्हाला पळवेल…

तुमच्या स्टार्टअप कहाणीची हेडलाइन कोण लिहिणार ?