लहानसे लोखंडाचे काम करणा-याच्या मुलाची कमाल, मायक्रोसॉफ्टने दिली १.२० कोटीची नोकरी !

लहानसे लोखंडाचे काम करणा-याच्या मुलाची कमाल, मायक्रोसॉफ्टने दिली १.२० कोटीची नोकरी !

Saturday February 13, 2016,

4 min Read

काही लोक यश प्राप्त तर करतात. मात्र, असे म्हटले जाते की, त्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातात किंवा सर्व सुविधा मिळतात. परंतु यशस्वी तेच असतात जे अनेक समस्यांचा सामना करूनही आपली वाट शोधतात आणि यशस्वी होऊन आपले लक्ष्य गाठतात. वात्सल्यसिंह चौहान यांनी यशाचा असाच ध्वज फडकवला आहे, ज्याबाबत सामान्य लोक कल्पना देखील करू शकत नाहीत. मायक्रोसॉफ्ट रेडमंड, वॉशिंग्टनने आयआयटी, खडगपूर मध्ये बीटेक कम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षातील विद्यार्थी वात्सल्यसिंह चौहान यांना वार्षिक १.२० कोटी रुपये उत्पनाच्या नोकरीचा प्रस्ताव दिला आहे. आयआयटी मध्ये १ ते २० डिसेंबर पर्यंत झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर पदासाठी त्यांना हे सर्वात मोठे पँकेज मिळाले.

बिहारच्या खगडिया गावातील सामान्य कुटुंबात राहणा-या वात्सल्य यांचे १२वी पर्यंतचे पूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले. एक तर विज्ञान आणि त्यातच हिंदी माध्यम? हिंदी आणि इंग्रजी माध्यम यांच्यात असलेली दरी आजही कायम आहे. वात्सल्य यांना देखील याच फरकाचा सामना करावा लागला. वात्सल्य यांनी १२वीची बोर्ड परीक्षा हिंदीतून दिली आणि ७५टक्के गुण मिळविले. आजच्या घडीला १२वी मध्ये ७५टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी जास्त हुशार मानला जात नाही. मात्र, असे म्हणतात की, ज्यांचे लक्ष्य मोठे असते, त्यांच्यासाठी या गोष्टी फारश्या महत्वाच्या नसतात. वात्सल्य यांनी १२वी सोबतच जेईई ची परीक्षा देखील दिली. यश तर मिळाले, मात्र अव्वल मानांकन मिळाले नाही. हीच ती वेळ होती, ज्याला वात्सल्य यांनी एकदम बदलून टाकले, त्यांनी हे एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि निश्चय केला की, ते चांगल्या मानांकनासोबत आयआयटीमध्ये दाखल होतील आणि पुढील रस्ता निश्चित करतील. वात्सल्य यांनी स्वतः साठी एक लक्ष्य निश्चित केले, तेथे पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.

image


वात्सल्य यांनी आपल्या या प्रयत्नात ‘एलेन करिअर इंस्टीट्यूट’ची मदत घेतली. कोटाच्या या इंस्टीट्यूटमध्ये येऊन त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आयआयटी – जेईई, २०१२मध्ये देशभरातून ३८२वे स्थान प्राप्त करून खडगपूर मध्ये बीटेक कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. वर्ष गेले, मात्र वात्सल्य यांनी स्वतःला पारखणे सुरुच ठेवले. असे म्हणतात की, जेव्हा सर्व प्रयत्न एकत्र असतात, तेव्हा संपूर्ण विश्व देखील त्याला पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असते. डिसेंबर महिन्यात कॅम्पस निवडीसाठी युएसच्या प्रमुख मायक्रोसॉफ्ट रेडमंड कंपनीनं खडगपूर येथे सॉफ्टवेयर इंजिनियर साठी आयआयटी मध्ये पदवीधर विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली. त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत. प्रत्येक परीक्षेत वात्सल्य यांनी आपली प्रतिभा दाखविली आणि त्याचा जो परिणाम आला तो तुमच्या समोर आहे. त्यांना मायक्रोसॉफ्टने १.२०कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न नोकरीचा प्रस्ताव दिला.

image


२१ वर्षाच्या वात्सल्य यांचे पिता चंद्रकांत सिंह खगडिया मध्ये ग्रील आणि शटर बनविण्याचे काम करतात. वात्सल्य यांचे दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यामुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इतके नव्हते की, मुलांचे शिक्षण त्यांच्या मनाप्रमाणे होऊ शकेल. सर्व योग्यता असूनही वात्सल्य यांच्या वडिलांची अशी परिस्थिती नव्हती की, ते आपल्या मुलांना शिक्षणासाठी राजस्थानच्या कोटा येथे पाठवतील. मात्र, असे म्हणतात की, एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा स्वतःहूनच उघडतो. वडिलांचा संघर्ष आणि वात्सल्य यांची प्रतिभा बघून एलेन संचालक राजेश माहेश्वरी यांनी कोटामध्ये मोफत वर्ग, प्रशिक्षण आणि वसतिगृहातील सुविधा देऊन त्यांचे मनोबल वाढविले आणि सांभाळले देखील. त्यामुळे वात्सल्य यांना घरासारखे वातावरण मिळाले. येथे खुल्या सत्रात त्यांना खूप प्रेरणा मिळाली.

आजार असूनही यश मिळविले

वात्सल्य यांनी आपले शिक्षण कोटा येथे सुरु केले. जेव्हा परीक्षेची वेळ आली, तेव्हा वात्सल्य यांना विपरीत परिस्थितींचा सामना करावा लागला. वात्सल्य यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “आयआयटी – जेईई च्या चार दिवसापूर्वी अचानक माझी तब्येत खराब झाली. प्रचंड उन्हाळ्यात मी डोके धुऊन पेपर देण्यासाठी गेलो. पहिला पेपर सोपा होता, मात्र आजारी असल्यामुळे तब्येत अधिक खराब झाली. पुन्हा हिम्मत केली आणि दुसरा पेपर कठीण असूनही त्यात मी अधिक गुण मिळविले. त्याचवेळी मला वाटले की, यावेळी परिणाम चांगला आला पाहिजे.”

त्याआधी ते एआय ईईई मध्ये बिहार आणि झारखंड राज्यात अव्वल आले. भारतीय सांख्यिकी संस्था (आयएसआय) आणि आयआयएसई मध्ये देखील ते पात्र ठरले, मात्र त्यांनी बीटेकसाठी आयआयटीची निवड केली.

गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याची जिद्द

वात्सल्य यांचे म्हणणे आहे की, “सुट्टीत घरी जाऊन गरीब मुलांना शिकविणे मला आवडते. आयआयटी संकुलात देखील मी रिक्षाचालकांच्या काही मुलांना शिकवितो. मी आणि माझ्या अन्य तीन आयआयटी क्षेत्रातील मित्रांनी निश्चित केले की, आम्ही भविष्यात बिहारमध्ये एक वेगळी शाळा उघडणार आहोत. यात आयआयटीचे विद्यार्थी सुट्टीत शाळेत जाऊन चार महिन्यांपर्यंत मुलांना शिकवतील. शिल्लक वेळेत अन्य शिक्षक शिकवतील. सामान्य मुलांकडून कमी शुल्क आकारून आणि गरिबांना मोफत शिक्षण देण्याची ही योजना आहे.”वात्सल्य बिहारमध्ये नक्षलीक्षेत्रात नव्या पिढीला साक्षरतेशी जोडू इच्छितात.

भविष्यात नव्या स्टार्टअप ची योजना

image


वात्सल्य यांचे म्हणणे आहे की, भविष्यात ते आपले स्टार्टअप सुरु करणार आहेत. आयआयटीच्या आपल्या वर्ग मित्रांसोबत एका स्टार्टअपचे आरेखनदेखील केले आहे. हातातल्या रिंगमध्ये लावणारी एक लहानशी डीवाईस तयार केली आहे, ज्यामुळे इंटरनेटमार्फत प्रवेश सोपा होईल. वात्सल्य यांचे भविष्यात मायक्रोसॉफ्ट रेडमंडमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा विचार आहे. संशोधनात आवड असल्यामुळे एडवांस टेक्नोलॉजी वर आधारित आगळावेगळा प्रकल्प करण्याचा विचार आहे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

'स्लम बॉय ते मिलिनेयर मॅन' सरथबाबूंची सत्यकथा

३४ रुपये रोज कमवणारे अग्रवाल आज २० कोटींच्या कंपनीचे मालक

तरूण अभियंत्याच्या दोन यशस्वी आय टी कंपन्यांची कहाणी!

लेखक : रिंपी कुमारी

अनुवाद : किशोर आपटे.

    Share on
    close