तंत्रकौशल्य विकसित करा : हॉलीवूड दिग्दर्शक सोहन राय यांचे भारतीय सिनेजगताला सांगणे

0

“ हॉलीवूड सोबत स्पर्धा करायची असेल, तर जगातील आघाडीचे सिनेबाजारपेठ असलेल्या भारतीय सिनेजगताने तंत्रकौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण केले पाहिजे. जे सिनेनिर्मिती पासून सिनेमापर्यंत असेल. योगायोगाने भारतीय सिनेउद्योग ज्यामध्ये प्रतिभावान अभिनेते, दिग्दर्शक, आणि तंत्रज्ञ वर्षानुवर्षे तोच तो सिनेनिर्मितीचा परिपाठ घेवून चालत आहेत, अनेक विभागीय भाषिक सिनेमा देखील अनेक दशके मागे राहिले असून बॉलीवूडच्या तूलनेत तंत्रज्ञानात आणि व्यावसायिकतेमध्ये ते कमी पडत असतात. हीच योग्य वेळ आहे की त्यांनी अभिनव संकल्पना आणि वितरणाच्या पध्दती आत्मसात कराव्यात जेणे करून जागतिक दर्शक आकर्षित होतील. उदाहरण द्यायचे झाले तर, अत्याधुनिक कॅमेराज वापरा, स्टुडिओज वापरा, प्रोजेक्टर, साऊंड इक्वीपमेंटस, उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा वापरा ज्यातून उच्च दर्जाचा सिनेमा तयार करता येईल. जागतिक विषय घ्या, व्यापक वितरण यंत्रणा तयार करा इत्यादी. अत्याधुनिक तंत्रकौशल्य विकसित करणे आजच्या काळाची गरज आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा यांची बचतही होईल, असे सोहन राय म्हणाले. जे ‘इंडीवूड फिल्म कार्निवल’चे संचालक आहेत.


ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले की, इंडीवूड फिल्म कार्निवल हा भारतीय सिनेजगताला एकत्र आणण्याचा उपाय आहे आणि सिनेमाशी संबंधित व्यावसायिकांना एकाच छत्राखाली भेटण्याची संधी आहे. “ भारतीय सिनेजगताने शक्य तितक्या तातडीने भाषिक भेद बाजूला करून एक व्हावे” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, ते म्हणाले की, इंडीवूड सिने कार्निवल २०१७ची तिसरी आवृत्ती, ही देशातील सर्वात मोठ्या सिनेसंबंधी घडामोडी पैकी एक आहे, जी रामोजी फिल्म सिटी हैद्राबाद येथे १-४ डिसेंबर २०१७ दरम्यान आयोजित केली आहे. सिने कार्निवलची तिसरी आवृत्ती ही सहभागींच्या दृष्टीने महत्वाची पर्वणी असेल कारण यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामवंतांचा सहभाग असेल. या कार्यक्रमात जागतिक दर्जाच्या नामवंत सिने निर्मात्यांसोबत संवाद साधण्याचा योगही परिसंवादाच्या माध्यमातून जुळून येणार आहे. विस्ताराच्या संधी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम याची रेलचेल असलेल्या या कार्यक्रमासाठी आणि अधिक माहितीसाठी लॉगऑन करा www.indywood.co.in


असित कुमार मोदी, संस्थापक निला टेली फिल्मस्, उत्तम कुमार अध्यक्ष भारतीय जनता पक्ष वसई, लेफ्टनंट कर्नल अनिल बी नायर सीएमडी मल्याळी वृत्तपत्र, आणि सीएमडी थंडरफोर्स श्रीजीत रमेशन प्रसिध्द माहिती कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता या प्रसंगी उपस्थित होते.

प्रतिष्ठेचे समजले जाणारे इंडिवूड मिडिया एक्सलन्स पुरस्कार- मुंबई चाप्टर. ज्यातून मुद्रीत, दृश्य आणि ऑनलाइन अशा सर्व प्रकारच्या माध्यमातील व्यावसायिकांच्या कार्याचा गौरव केला जाणार असून पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. खास आकर्षण पुरस्कार आफ्टरनून चे वितरण विभागातील चैतन्य पदुकोण यांना त्यांच्या सिनेजगतातील उल्लेखनिय कार्यासाठी देण्यात येणार आहे. तर प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार अमित खन्ना आणि अली पिटर जॉन यांना देण्यात येणार आहे.


इंडीवूड मिडिया एक्सलन्स पुरस्कारांचे अन्य मानकरी आहेत : राजीव मसंद (प्रसिध्द सिने पत्रकार), कोमल नाहटा झी सिनेमा,(उत्कृष्ट व्यावसायिक विश्लेषक), अनुपमा चोप्रा एनडी टिव्ही/ हिंदुस्थान टाइम्स (लोकप्रिय पत्रकार),रफिक बगदादी, इकॉनॉमिक टाइम्स,( सन्माननीय पुरस्कार सिनेमाच्या चांगल्या प्रसिध्दी करीता.), भावना मुंजाळ, झी न्यूज, (बेस्ट सेलेब्रिटी ऍन्कर),गीता पौडवाल (व्यावसायिक कार्य), आज तक चे सिध्दार्थ हुसेन ( व्यावसायिक कार्य), बातुल मुक्तिआर (व्यावसायिक कार्य), दिलीप ठाकूर (सिने पत्रकारिता), मुंबई मिररच्या रोश्मिला भट्टाचार्य (सिने पत्रकारिता), अलका सहानी इंडियन एक्सप्रेस (सिने पत्रकारिता), मयंक शेखर The W14.com, चे, करन बाली ( उत्तेजनार्थ ऑनलाइन सिनेप्रसिध्दी करीता), ज्योती वेंकटेश (सिने पत्रकारिता), अनिर्बन लाहिरी (सिने विश्लेषण ऑनलाइन माध्यम), प्रेमलाल कैराली टिव्ही, (व्यावसायिक कार्य), सुकन्या वर्मा ( सिने समिक्षा- मुद्रीत माध्यमे), आणि राजेश कुमार सिंग (सिने समिक्षा ऑनलाइन माध्यमे).