योगाविश्वाची माहिती देणारे ʻ Yogatrail.com ʼ युरोपमधील त्रिकूटाचा एक अनोखा उपक्रम

योगाविश्वाची माहिती देणारे ʻ Yogatrail.com ʼ
युरोपमधील त्रिकूटाचा एक अनोखा उपक्रम

Monday October 26, 2015,

6 min Read

युरोपमधील एक दाम्पत्य जगभ्रमंतीवर असताना त्यांची गाठ केरळमधील दाट जंगलात एका योगगुरुशी पडली. त्या वातावरणात काही काळ व्यतित केल्यानंतर उर्वरित जगाच्या संपर्कात राहणे त्यांना कठीण वाटू लागले. योगाचा प्रचार आणि प्रसार जगभर जरी झाला असला तरी माजी भौतिकशास्त्रज्ञ आणि प्रकाशक असलेल्या त्या दाम्पत्याला इतर जगाशी संपर्कात राहणे निरस वाटू लागले होते. एलेक्स जटॉन सांगतात की, ʻआम्हाला ते आत्मसात करायचे होते. मात्र एखाद्या ठिकाणी हॉटेल, रेस्तरॉ, फोन नंबर शोधणे, सहजसोपे आहे. या सर्व गोष्टींकरिता एक व्यासपीठ आहे. मात्र योगाबद्दलचे चांगले वातावरण शोधणे, तेवढेच कठीण आहे. तुम्ही गुगलवर अशा ठिकाणाचा शोध घ्या. तुम्हाला असेच उत्तर मिळेल की, सदर जागा पाच वर्षांपूर्वी बंद झाली आहे. मी जवळपास योगा सोडण्याच्या निर्णयावर आले होते. कारण योगा तज्ज्ञांचा शोध घेऊन त्याच्या संपर्कात जाणे, जवळपास अशक्य होते. ʼ त्यानंतर त्यांनी एका मध्यवर्ती प्रकाशन क्षेत्रात काम सुरू केले. त्यांचे पती एलेक्स क्लेइन सांगतात की, ʻ२०११ साली मी वेब इन्टरप्रेनरशीपच्या वर्गात बसलो होतो. तेथे आम्ही व्यवसाय आणि गुंतवणुकदार असे नाटक करत होतो. यात फक्त एकच स्पष्ट अडचण सोडवण्याची गरज होती, ती म्हणजे योगा अनुभवाची इत्यंभूत माहिती आणि मदतनीस. त्यातुनच जन्माला आली Yogatrail.com.ʼ, असे माजी भौतिकशास्त्रज्ञ आणि एलेक्स जटॉन यांचे पती एलेक्स क्लेईन सांगतात. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सवेन अर्नेस्ट यांना या दांम्पत्याची संकल्पना आवडली आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांच्याशी भागीदारी केली. बीएमडब्ल्यू सारख्या कंपनीच्या संकेतस्थळाची आखणी करणारे सवेन अर्नेस्ट या संकल्पनेत तिसरे भागीदार झाले शिवाय त्यानंतर ते या कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी (सीटीओ - चिफ टेक्निकल ऑफिसर) झाले. त्यामुळे Yogatrail चे स्वप्न आता मूर्त स्वरुप प्राप्त करणार होते.

क्लेईन सांगतात की, ʻपश्चिमेकडे प्रामुख्याने नागरिक योगा कार्यशाळा किंवा योगवर्गाला जातात. कारण त्यांना योगा शिकवणारा गुरू आवडत असतो. मात्र अनेक प्रकरणांमध्ये योगा शिकवणारे शिक्षक हे अंशकालिन असतात. एक योगी म्हणून मला असे वाटते की, योगाशी कायम संबंध ठेवणे तसेच योग गुरुचे अनुकरण करत राहणे, हे नीरस वाटू शकते. तर एक व्यावसायिक म्हणून मला असे वाटते की, तुम्हाला तुमचा व्यवसाय करण्यासाठी आणि तुमच्या अनुयायांच्या कायम संघटितरित्या संपर्कात राहण्यासाठी कोणत्याही अवजारांची आवश्यकता नाहीʼ, असे ते सांगतात. ते म्हणतात की, ʻव्यावसायिक लोक याकडे एक व्यवसाय म्हणूनदेखील पाहत नाहीत. पैसा आणि योगा हे परस्पराविरोधी आहेत. योगा अभ्यासकांची भूमिका ही कंपन्यांबाबतीत संशयी आणि पैशांकडे कल असलेली असते. त्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.ʼ

image


Yogatrail हे योग्यांसाठी, जे लोक योगविश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी इच्छुक आहेत, अशांसाठी एक समूहसंपर्क स्थळ आहे. सहजसोप्या चार टप्प्यांमध्ये वापरकर्ते आपले प्रोफाईल या संकेतस्थळावर तयार करू शकतात. त्यात त्यांना स्वतःचा हुद्दा म्हणजेच ते विद्यार्थी आहेत की शिक्षक, त्यांचे स्थळ, त्यांना हवी असलेली योगा पद्धती आणि ते आदर करत असलेल्या योगगुरू किंवा योगीची माहिती द्यायची आहे. त्यानंतर सदर संकेतस्थळ तुम्हाला अशा विश्वात घेऊन जाते, जेथे सर्वोत्तम योगा अभ्यास, कार्यक्रम, शिक्षण आणि सेमिनार शोध लागण्याच्या मार्गावर आहेत. एलेक्स क्लेईन सांगतात की, ʻयापूर्वी योगा तज्ज्ञ आपल्या अनुयायांशी संपर्क साधण्याकरिता फेसबूकचा वापर करीत असत. तुम्हाला वाटते की, तुमचे एक फेसबूक पेज आहे, ज्यावर तुम्ही काही पोस्ट करता आणि तुमच्या सर्व अनुयायांपर्यंत ते पोहचते. ते त्या पोस्टबद्दल खुप उत्साह दाखवतात. मात्र सध्याच्या धावपळीच्या युगात, असे कोणीही वागत नाही. जनसंपर्कादरम्यान येणाऱ्या या अडचणीचा आम्ही अभ्यास केला आणि योगा शिकण्यास इच्छुक आणि योगा विश्व यांच्यामधील दरी मिटवण्याचा प्रयत्न करतानाच आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करत आहोत. जेणेकरुन योगा शिकण्यास इच्छूक असलेले नागरिक त्यांचे आवडते योगा अभ्यासक आता काय करत आहेत, त्यांच्या स्टुडियोमध्ये ते आता कशाचे आय़ोजन करणार आहेत, याची माहिती घेऊ शकतात. आम्ही उपलब्ध केलेले व्यासपीठावर तुम्हाला हवी असलेल्या एका विशिष्ट व्यक्तीची माहितीदेखील उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीचे नाव तुम्हाला प्राधान्यक्रमावर द्यायचे आहे, जेणेकरुन त्या व्यक्तीने काही माहिती टाकल्यास संकेतस्थळ तुम्हाला त्याबाबत इशारा देणार आहे.ʼ

image


Yogatrail संकेतस्थळ प्रिमियम मेंबरशीपच्या विक्रीतून पैसे कमविते. क्लेईन सांगतात की, ʻभारतामध्ये हृषिकेश किंवा म्हैसूर याठिकाणी केंद्र असून, तेथे योगाअभ्यासकांना योगातज्ज्ञ बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. योगाअभ्यासातील विद्वानांकडून शिक्षण घेण्यासाठी दूरवरुन येथे नागरिक येतात. यांसारख्या संस्था काही मोफत पॅकेजेसदेखील उपलब्ध करुन देतात, त्यामुळे त्यांच्या ब्रॅंडची प्रसिद्धी जगभर होते. शिवाय योगा शिकण्यासाठी प्रेरीत असलेले लोक एका चांगल्या शिक्षकाच्या संपर्कात येतात ʼ, असे ते सांगतात. आतापर्यंत या संकेतस्थळावर १,००,००० प्रोव्हायडर प्रोफाईल्स आणि जगभरातून जवळपास १० लाख योग्यांचे प्रोफाईल्स आहेत. याशिवाय महिन्याभरात जवळपास लाखो लोक या संकेतस्थळाला भेट देतात, त्यामुळे त्यांच्या संकेतस्थळाच्या विस्तारदर प्रतिमाह २० टक्के एवढा आहे. त्यांचे सर्वाधिक वापरकर्ते म्हणजे ५० टक्के यूएसएमधील आहेत. तर ३० टक्के हे यूके आणि कॅनडामधील आहेत. त्यांचे ध्येय हे अशा एका बाजारपेठेची निर्मिती करणे आहे, जेथे वापरकर्ते प्रशिक्षण वर्ग आणि अभ्यासक्रमाची नोंदणी करू शकतात. ज्यावर ते थोड्याप्रमाणात शुल्क आकारणार आहेत.

भारतीय ग्राहकांसाठी सेवा

ʻगेल्या सहा महिन्यांपासून आम्ही भारताबद्दल विचार करायला सुरुवात केली आहे. भारताच्या क्षमतेची आम्हाला पूर्णतः कल्पना आहे. भारतात योगा सर्वात स्वच्छ आणि मूळ स्वरुपात पसंत केला जातो. आतापर्यंत आम्ही भारतात २००० प्रोफाईल्स पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. आम्हाला माहित आहे, तेथे जवळपास लाखो योगी आणि शिक्षक आहेत. जगातील कोणत्याही देशांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. आता आमच्या हे लक्षात आले आहे की, आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांमध्ये भारतीयदेखील आहेत. त्यासाठी आता आम्ही अभ्यास करणे सुरू करणार आहोत.ʼ, असे क्लेईन सांगतात. भारतात वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण देणे, अपेक्षित असल्याची कल्पना या त्रयीला आहे. येथे गटाने शिक्षण घेण्याऐवजी प्रत्येक प्रशिक्षणार्थी वेगवेगळा शिकण्यास प्राधान्य देतो. गटनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या वर्गांमध्ये ३० ते ४० विद्यार्थ्यांना एकत्रित शिक्षण दिले जाते. एका विद्यार्थ्याला शिकवणे किंवा खासगी शिकवण्या घेणे, हे कशाप्रकारे साध्य करता येणार आहे, याचा आम्ही विचार करत असल्याचे क्लेईन सांगतात. भारतातबाबत अजून एक निरीक्षण नोंदवण्यात आले ते म्हणजे, जगाच्या तुलनेत भारतातील लोक मोबाईलचा वापर जास्त करतात. त्यामुळे मोबाईल एप्लीकेशनची निर्मिती करणे, हे प्राधान्यक्रमावर आहे. जेव्हा हे मोबाईल एप्लीकेशन तयार होईल आणि मार्केटमध्ये जाण्यास सज्ज होईल, तेव्हा मार्केटमधील मोठा हिस्सा व्हॉटस एपद्वारे नियंत्रणात येईल. भारतीयांसोबत संपर्क साधण्याचे व्हॉटसएप हे निश्चितच एक प्रभावी माध्यम आहे.

Yogatrail वर मिळतील तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे :

ʻअनेक संकेतस्थळे फाईव्ह स्टार रेटींगच्या माध्यमातून ग्राहकांकडून अभिप्राय घेतात. ते तुम्ही निश्चितच योगासोबत करू शकत नाही. काहींच्या मते घाम गाळणारा योगा हा पाच स्टार योग्य असू शकतो, जो की ज्याला शांत वातावरण हवे आहे, अशा व्यक्तींसाठी शुन्य स्टार प्रमाणे आहे.ʼ, असे जटॉन सांगतात. स्थानिक एप्लीकेशनमध्ये एकाच शहरातील योगाबद्दल विस्तृत माहिती असते. त्यामुळे त्यांच्या एप्लीकेशनला स्थानिक एप्लीकेशनला एक मोठी टक्कर द्यावी लागणार होती. ʻमात्र आमच्या मते, योगासाठी स्थानिक व्यासपीठ निर्माण करणे, पुरेसे नाही. तुम्हाला असे लोक मिळतील, ज्यांना भ्रमंती करणे आवडत असून, त्यातही त्यांची आवड सारखी असू शकते. आणि हेच लोक योगाकडे वळले असतील. भ्रमंती करणाऱ्यांच्या समुदायासाठी व्यासपीठ निर्माण करणे, जेथे त्यांना सर्व माहिती मिळू शकते ʼ Yogatrail च्या मूळ ध्येयाव्यतिरिक्त एकत्रित संपर्कात राहणे, हेदेखील एक ध्येय आहे. ʻफक्त एकदाच वापरण्यात येऊ शकते, असे व्यासपीठ आम्ही निर्माण करत नाही. आमच्या वापरकर्त्यांना योगा विश्वात काय घडामोडी घडत आहेत, हे सारखे समजायला हवे. आमचे शिक्षक आणि विद्यार्थी हेच आमच्या योगाविश्वाचे केंद्रबिंदू आहेत ʼ