एक कुटूंब जे सोबत राहाते, उड्डाण करते: या एव्हीएटर्सनी सोबतच शंभर वर्षाचे उड्डाण केले आहे!

0

ज्यावेळी कॅप्टन जय देव भसीन १९५४मध्ये पहिले पायलट झाले, त्यावेळी कुणालाही जरा देखील वाटले नाही की त्यांचे कुटूंबिय त्यांचा हा वारसा पुढे चालवतील. आज त्यांच्या मुलाचे कुटूंबिय एकत्रितपणे उड्डाणाची शंभर वर्ष साजरी करत आहेत.

भसीन कुटूंबाचे पाच सदस्य, कै. कॅप्टन जयदेव भसीन, त्यांचे पूत्र आणि स्नुषा कॅप्टन रोहित भसीन आणि निवेदीता भसीन, आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी रोहन आणि निहारिका सारे एकत्रित त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चालले आहेत! 


ज्यावेळी निवेदिता यांनी इंडियन एअरलाइन्समध्ये सेवा सुरू केली, त्या तिस-या मला कर्मचारी होत्या. एका वृत्तानुसार त्या म्हणाल्या की, “ उड्डाणामुळे मला जेवढे आठवते तेवढे माझा उत्साह वाढत राहिला,  मी सहा सात वर्षांची असताना पासूनच मी मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले होते आणि माझे वडील पळतच आले आणि माझ्या हाती इंडीयन एअरलाईन्समध्ये रूजू होण्याचे पत्र दिले. तो दिवस मला आजही आठवतो २९ जून १९८४” त्या म्हणाल्या.

वयाच्या विसाव्या वर्षी जेंव्हा त्यांनी उड्डाण सुरू केले, अकरा वर्षांची गौरवशाली कारकिर्द त्यांची वाट पहात होती. वयाच्या २६व्या वर्षी एक वर्षांच्या निवेदिताला सोबत घेवून त्यांनी जगातील सर्वात कमी वयाची (तरूण) वैमानिक म्हणून उड्डाण केले होते.

कॅप्टन रोहित भसीन, निहारिका भसीन, निवेदीता भसीन आणि रोहन सारे एकत्रित (फोटो साभार - हिंदुस्तान टाईम्स)
कॅप्टन रोहित भसीन, निहारिका भसीन, निवेदीता भसीन आणि रोहन सारे एकत्रित (फोटो साभार - हिंदुस्तान टाईम्स)

त्यांच्या अनेक उपलब्धीमध्ये एअरबस ३००च्या कमांडर होण्याचा क्षण आला त्यावेळी ते जगातील सर्वात मोठे विमान होते. आणि त्यांनी ज्यावेळी १९८५मध्ये कोलकाता ते सिलचर असे जगातील पहिले सर्व महिला कर्मचारी असलेले विमान सह वैमानिक म्हणून चालविले तो क्षण आजही त्यांना लक्षात आहे.

निहारिका ज्यांनी त्यांच्या आईला पांढ-या गणवेशात विमान चालवित असताना लहानपणापासून पाहिले आहे त्या देखील चार वर्षापासून इंडिगोचे विमान चालवित आहेत. त्या म्हणतात, ‘लहान मुल म्हणून मी तिला पहात असे ती कशी तयार होवून कामाला जात असे, त्यावेळे पासून मलाही तसे गणवेश घालून जाण्याचे वेध लागले होते. आता मला समजते आहे की ते उड्डाण आणि समन्वय करत दोन मुले सांभाळणे किती कठीण होते.”

रोहन जे दहा वर्षापासून एअर इंडिया सोबत काम करतात  आणि किमान दहा उड्डाणांमध्ये त्यांच्या वडीलांसोबत कॉकपीटमध्ये सहभागी होतात.