या भारतीय दैंनदिन मालिकेला चारशे लाखापेक्षा जागतिक दर्शकांचा पाठींबा का आहे?

या भारतीय दैंनदिन मालिकेला चारशे लाखापेक्षा जागतिक दर्शकांचा पाठींबा का आहे?

Thursday June 15, 2017,

2 min Read

'मै कुछ भी कर सकती हू', जी प्रदर्शित होण्यास २०१४ मध्ये सुरूवात झाली, ज्यात पारंपारीक भारतीय दैनंदिन धारावाहिकेपेक्षा वेगळे काहीतरी आहे. ही एका तरूण भारतीय डॉक्टर महिलेची स्नेहा माथूरची कहाणी आहे, या कहाणीत समाजाच्या लैंगिक विषमभावपूर्ण आणि मानभावीपणे जगण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकला आहे.

स्नेहा आपला मोठ्या प्रतिष्ठेची नोकरी सोडून प्राथपूर गावातल्या लोकांसाठी सेवा कार्य करायला येतात, ही कहाणी मुख्यत्वे सत्य कथांवर आधारित आहे, जी भारताच्या रूढीवादीपणाचे दर्शन घडविते. या मालिकेला मिळालेल्या प्रतिसादाबाबत निर्माता पूनम मुतरेजा म्हणाल्या की, “ आमचा अंदाज असा होता की आम्हाला रोज २५० कॉल्स येतील, पहिल्या दिवशी पहिल्या भागानंतर आम्हाला सात हजार कॉल्स तासाभरात आले. दोन तासांनतर आमचा स्विचबोर्ड कोसळला होता.”


Image: Hindaily

Image: Hindaily


या मालिकेत बाऊ केल्या जाणा-या विषयांवर भाष्य केले जाते, ज्यात बालविवाह, महिलांवरील अन्याय, अत्याचार ज्या लोकांना नेहमी दिसणा-या बाबी आहेत मात्र त्यावर बोलले जात नाही. या मालिकेत पौगंडावस्था, हस्तमैथून, मासिक पाळी या प्रौढांच्या विषयांवर भाष्य केले आहे.

या मालिकेचे दोन हंगाम आणि १७०पेक्षा जास्त भाग पूर्ण झाले आहेत, या धारावाहिकेचे पन्नास देशात चारशे लाखांपेक्षा जास्त दर्शक आहेत. त्यामुळे ही एक व्यापक प्रमाणात पाहिली जाणारी मालिका म्हणून जगात प्रसिध्द पावली आहे. तिस-या हंगामात या मालिकेत काय असेल त्याबाबत सांगताना निर्माती म्हणाल्या, “ जास्तीत जास्त तरूणांपर्यत पोहोचावे हे आमचे ध्येय आहे, कारण लोकसंख्याच्या फुगवट्यात त्यांना लैंगिकतेबाबत, तसेच जनन शास्त्राबाबत जागरूक करणे, त्यांचे हक्क कर्तव्ये आणि अधिकार याची जाणिव देणे, लैंगिक समानता, महिलांवरील अत्याचारात घट होण्याची गरज, आणि मानसिक आरोग्य हे अशी गुंतवणूक करणारे विषय आहेत ज्यात आपण सहसा लक्ष देत नाही. त्यात जागरूकता आणण्याची गरज आहे, माहितीच्या माध्यमातून त्यांच्या याबाबतच्या मतांना वाट मोकळी करून दिली पाहिजे.”

सर्वात आश्वासक बाब म्हणजे ज्यावेळी या मालिकेनंतर सर्वेक्षण केले, लोकांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे आढळले, त्यांच्या मानसिकता आणि दृष्टीकोन यात चांगला बदल झाला आहे. लक्षणीय प्रमाणात पुरूष आणि स्त्रिया जे पूर्वी घरगुती हिसांचाराच्या आणि बालविवाहाच्या बाबतीत वेगळे विचार करत होते त्यांना मालिका पहिल्यानंतर त्यांच्या चुकांची जाणिव होत आहे.