गजाआडच्या जीवनात साकारले रंगांचे नवे विश्व, २२ कैदी चित्रकारांनी चितारल्या दोनशेपेक्षा जास्त चित्रकृती!

0

हे तर स्वाभाविक आहे की कुणीही त्यांच्या शारिरीक, मानसिक कर्मामुळे किंवा परिस्थितीच्या रेट्याने कैदी म्हणून जीवन व्यतीत करण्यास विवश असेल, पण त्यांच्या वैचारीक स्वातंत्र्याला कैद करता येत नाही. त्यांच्या कल्पनेच्या भरारीवर कुणी कोणत्याही प्रकारे पहारा करू शकत नाही. पण हजारो नाही लाखो लोक वेळेआधीच हे समजण्यापूर्वीच निधन पावतात की त्यांच्या या स्वतंत्रतेला कैद करता येत नाही. कदाचित याच जाणिवेतून हैद्रबादच्या कलाकृती आर्ट गॅलरीने चंचलगुडा आणि चेर्लापल्ली तुरुंगातील कैद्यांना कारागृहातच राहून स्वातंत्र्याची अनुभूती दिली आणि त्यांच्या कल्पनाना नवे आकाश, नवी भव्यता, तसेच नवे रचनाविश्व देत गजाआडच्या त्या दुनियेतही रंगाची फुले, बाग–बगिचे आणि सुंदर दुनिया निर्माण करवून घेतली आहे.

कलाकृती आर्ट गॅलरीने असे तर अनेक संस्था आणि कला तसेच संस्कृतीच्या विकास विस्तारासाठी नाती निर्माण केली आहेत, स्नेहबंध निर्माण केले आहेत. पण तुरुंगविभागासोबतच्या या सहकार्यक्रमाला वेगळे महत्वाचे स्थान आहे.

जेंव्हा कुणी कैदी लोकांशी बोलू इच्छितो किंवा भेटू इच्छितो तेंव्हा त्यात साधारण वेगळेपण काही नसते तर दोघांच्या मनात भिती आणि अनोळखी दडपणच असते. या गोष्टी टाळणे सोपी गोष्ट नाही. पण कलाकृती आर्ट गँलरीशी जोडले गेलेले कलाकार सय्यद शेख यांनी या गोष्टी बाजुला करुन कैद्यांच्या वैचारीक विश्वात प्रवेश करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कल्पनेला आकार देण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. त्यांना केवळ चित्रकलाच नाही शिकवली तर नव्या जगात श्वास घेण्यास विश्वास मिळवून दिला आहे.

आर्ट गॅलरीचे संचालक कृष्णाकृती फाउंडेशनचे प्रशांत लाहोटी यांची ही कल्पना आगळी आहे की भले कुण्याही कारणाने त्यांना सजा झाली असेल, ते भोगत आहेत पण त्यांच्या विचारांना कैद होण्यापासून वाचविले पाहिजे. त्यांच्या मुकेपणाला वाचा फोडली पाहिजे. त्यांना नवी भाषा दिली पाहिजे. आणि जेंव्हा याची सुरुवात झाली तेंव्हा त्याचे आगळे परिणाम समोर आले. एक दोन किंवा आठ दहा नाही तर वीस पेक्षा जास्त कैदी चित्रकार झाले. तुरुंगाच्या भिंतीमागे कैद राहूनही रंगाच्या दुनियेत त्यांनी भरारी घेतली. त्यांनी अशा रचनांना आकार दिला, ज्या त्यांना स्वत:लाही माहिती नव्हत्या. चित्रकला संगीत साहित्य इत्यादी क्षेत्रात जेंव्हा रुची निर्माण होते तेंव्हा मन-मष्तिष्क यांना जणू पंख लाभतात. भरा-यांची मग काही संख्या मोजताच येत नाही. इथेही असेच झाले. चेर्लापल्ली आणि चंचलगुडा तुरुंगात कैद्यानी लॅण्डस्केप असो किंवा मग खुले आकाश किंवा सोडून गेलेल्या घरच्यांना किंवा त्यांच्या स्मृतींना किंवा त्या मुर्तींच्या बाबतीत विचार करताना ज्यांच्या डोळे शरीराची ठेवण किंवा चेह-यांवर विचार चितारले असतील. मग ते गौतम बुध्द असतील किंवा गांधी या कैद्यांनी खूपच छान चित्र काढली आहेत. रंगातून आपले विचार प्रसवले आहेत. 

इथे रंग केवळ भौगोलिक किंवा शारीरिक आकारच नाही घेत, परंतू त्यातून गहन अर्थही शोधले जातात. त्यात स्वातंत्र्याच्या भरारीच्या आकांक्षा देखील लपल्याचे दिसून येते.

ते दिवस निघून गेले ज्या काळात तुरुंगात बसून लोकांनी पुस्तके लिहून काढली, महाकाव्य रचली, मोठे आदर्श घालून दिले. आज तुरुंगात जाणे नक्कीच चांगले लक्षण नाही पण भारतीय समाजात आजही तुरुंगाला सुधारगृहाचे स्थान मिळू शकलेले नाही. किंवा असे करण्याचा प्रयत्नही करण्यात आला नाही. असे असूनही चित्रकार सय्यद शेख अभिनंदनास पात्र आहेत. कारण त्यांनी शहरातील या दोन तुरुंगात विचार आणि कल्पना यांचे सुमारे २०० साचे उचलून आणले आहेत.

कलाकृती आर्ट गॅलरी बंजारा हिल्स मध्ये प्रदर्शित या चित्रांबाबत सय्यद म्हणतात की, सहा महिन्यापासून ते चेर्लापल्ली आणि चंचलगुडा तुरुंगात चित्रकलेचे धडे देत आहेत. दोन्ही ठिकाणी सुमारे वीस कैदी त्यांच्या वर्गात येतात. त्यापैकी काही असे आहेत की शिक्षेचा कालावधी संपला की निघून जातील आणि काहींच्या शिक्षा प्रदीर्घ आहेत. तुरुंगात ते जे तणावाचे जीवन जगतात, चित्रकला त्यांना त्यातून काही काळासाठी स्वतंत्रतेचा अनुभव देते. त्यांच्या मनाला शांती देते. ते यातून शांती मिळवण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांचे प्रयत्न बघून असे वाट ते की, त्यांच्यात कलेची अनुभूती अगोदरपासून आहे. जे कुणी सुतारकाम किंवा अन्य पारंपारीक पेशाशी संबंधित आहेत त्यांना रेषांचे ज्ञान आहे आणि ते यात स्वारस्य दाखवून प्रगती करत आहेत. चेर्लापल्ली येथून ४५ आणि चंचलगुडा येथून सुमारे १५० चित्रांना या प्रदर्शनात बियॉंड दि बार मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २९ जून पर्यंत आहे.

सय्यद शेख यांनी हैद्राबाद विद्यापीठातून एमएफएच्या पदवी मिळवल्या आहेत. आपल्या पदवी परिक्षा त्यांनी आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम येथून पूर्ण केल्या आहेत. ते ललितकला परिषद आणि सुकू फेस्टिवल पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भारताशिवाय अन्य देशातही आयोजित केली आहेत. ते कलाकृती आर्ट गॅलरीव्दारा शिष्यवृत्ती मिळवणारे प्रतिभावान विद्यार्थी होते.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अंध व्यक्तींना मिळाला चित्र पाहण्याचा अनोखा अनुभव

जीवनातील अडचणींनाच रंग दिला, कलाविश्वात मिळवले नांव!

रणांगणापासून ते गावातील वस्त्यांपर्यंतचा ‘अनंत’ प्रवास