मॅनहटनमध्ये १५०मजली टॉवर बांधण्याचे स्वप्न पाहणारे जिंदादिल उद्यमी डीएसके !

मॅनहटनमध्ये १५०मजली टॉवर बांधण्याचे स्वप्न पाहणारे जिंदादिल उद्यमी डीएसके !

Monday December 12, 2016,

10 min Read

ध्येयवेड्या लोकांनी जगात अनेक पराक्रम केले आणि जगावेगळी स्वप्ने पाहून ती साकारणारे लोकच या जगात प्रेरणास्थान बनले आहेत. अगदी बालवयापासून मोठी स्वप्ने पाहत ती साकाराणा-या एका ध्येयवेड्याची कहाणी म्हणजे डीएसके यांची जीवनकहाणी आहे. ही पन्नासच्या दशकातील गोष्ट आहे, देशाच्या स्वातंत्र्याला केवळ काही वर्षच झाली होती. त्याकाळात पुण्याच्या कसबा पेठ भागात हा लहान मुलगा आपल्या वेगेळेपणाच्या आवडी-निवडीमुळे इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळा दिसत असे. हा आठ वर्षाचा मुलगा अभ्यास तर मन लावून करत होता, पण फावल्यावेळात तो शेंगा विकणे, हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम, भाजी विकणे अशी कामे करत असे. त्याचे वडील पोलिस हवालदार होते, आईसुध्दा कमावती होती, सुशिक्षित पालकांच्या घरात त्याला तसे काही कमी नव्हते. आई वडिलांनी ही कामे कर असे त्याला कधी सांगितले नाही पण सतत काहीतरी उद्योग करत रहायचा त्याचा पिंड होता. ह सारे आपल्या मित्रांना मदत करण्यासाठी तो करत होता. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालविता यावा, खेळता यावे यासाठी त्यांच्या कामात मदत करण्यासाठी तो हे करत होता. त्याचे घर कसबा पेठेत अशा जागी होते जेथे जास्तकरून हे कष्टकरी लोक राहात होते, ज्यांची मुले त्याचे मित्र होती. गरीबीमुळे या मुलांनाही काही कामे करुन पालकांच्या कामात हातभार लावावा लागे, त्यामुळे लहान वयातच त्यांनी वेगवेगळ्या वस्तू विकून काही पैसे कमविण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या सोबत या मुलानेही वेगवेगळ्या वस्तू विकण्यास सुरुवात केली. उच्चशिक्षित ब्राम्हण घरातील हा मुलगा त्या काळात तुलनेने हलकी समजली जाणारी कामे करत असे. त्याची त्याला लाज वाटत नसे उलट यातून त्याला वाटत असे की, आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडत आहे. त्याच्या या वागण्यामुळे मित्र देखील हैराण होते, मोठी आव्हाने आली तरी त्यांची ती मैत्री अतुट होती. त्यांच्यासाठी तो आदर्श बनला होता. लहान वयातच ही मुले पैसा कमविण्यास शिकली होती. केवळ वयाच्या आठव्या वर्षी ती मुले आठ रुपये महिना कमाऊ लागली होती. हाच मुलगा पुढे जावून मोठा उद्योजक बनला. पुण्यात भाज्या, शेंगा विकणारा हाच मुलगा रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण पर्यटन आणि इतर अनेक क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून प्रतिष्ठीत झाला. गरीब वस्तीत राहून काम करणा-या या मध्यमवर्गीय ब्राम्हण मुलाने मोठेपणी अनेक टाऊनशिप उभारल्या, अनेक कंपन्यांचा मालक झाला. त्यांचे नाव आहे दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके या समुहाचे कर्ताधर्ता डीएस कुलकर्णी! 

image


राज्यात आणि देशात जे प्रभावशाली उद्योगपती आहेत त्यांच्यात या नावाला वेगळे वलय आहे. कारण त्यांचे जीवन शून्यातून विश्व निर्माण करण्याची कहाणी आहे. प्रतिकुल स्थितीला अनुकुल बनविण्याची कामगिरी ज्यांनी केली असे हे व्यक्तिमत्व आहे. यशाचा मंत्र आणि विजयाची प्रेरणा काय असते ते सांगणारी त्यांची ही जीवनकहाणी उद्योग जगात वावरणा-या सा-यांना प्रेरणा देणारी आहे. ही कहाणी सुरु होते, २८जुन १९५०मध्ये कसबापेठ पुणे येथून वडिल पोलिस असल्याने घरात शिस्तीचे वातावरण होते, तर आई शिक्षिका असल्याने तिने प्रामाणिकपणा आणि मेहनत करण्याचे संस्कार दिले. मित्रांच्या प्रेमासाठी त्यांची लहान मोठी कामे करणा-या दीपक यांच्या भोवती त्यांच्या चाहत्यांचा गराडा तयार झाला होता लहान वयातच ही मुले उदरनिर्वाहासाठी मेहनत करण्याचे धडे घेत होती. आई सकाळी उठून शिकवण्या घेत असे दुपारी शाळेत जावून शिकवत असे तर संध्याकाळी घरी येवून शिलाईची कामे करत असे त्यामुळे घरातल्या उद्यमीतेचे धडे बालवयातच मिळत गेले. पुण्याच्या वाडा संस्कृतीत एका छताखाली भाड्याने राहणा-या अनेक सहपरिवारांसोबत यांचाही परिवार होता. त्यामुळे वाड्यात राहणारे सारे भाडेकरू एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत असत. त्यात बायकांच्या एकमेकीशी असलेल्या चर्चा अशाच प्रकारच्या दररोजच्या जीवनाच्या चढ-उतारांबाबत असायच्या, त्यामुळे त्या गोष्टी एकताना दीपक यांना समजत होते की या महिला किती मेहनत करतात आणि घर चालविण्याचा प्रयत्न करत असतात.

image


डीएसके सांगतात की त्याकाळात टीव्ही नव्हताच, रेडिओ मात्र श्रीमंत लोकांकडे असायचा, त्यामुळे रात्री जेवण झाले की, मनोरंजनाच्या कारणाने गप्पा मारणे हा कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यात आजूबाजूच्या गरीबांची दु:ख आणि वेदना यांची चर्चा कानी जात होती. उदरनिर्वाहात मुलांचा हातभार लागावा म्हणून अनेकजण मुलांना शाळेत जावू देत नसत, त्यात दीपक यांचे सवंगडी होते, ते शाळेत यावेत म्हणून त्यांच्या आई वडिलांच्या कामात दीपक देखील हातभार लावायला काम करायला जात असत. त्यासाठी बाजारात आवाज देवून वस्तू विकणे हा फेरिवाल्याचा धंदा देखील ते करायला शिकले. त्यातून त्यांचे दोन फायदे होत होते, घरच्या कामात तसेच मित्रांच्या कामात हातभार लागत होता आणि वेळ वाचला तर मित्रांना सोबत घेवून खेळायला जायला मिळत होते. त्यासाठी ते मित्रांना शेंगा विकणे पासून चणे विकणे पर्यत मदत करत होते. आणि चांगला धंदा व्हावा यासाठी कल्पकतेने काम करत होते. त्यातून त्यांना मित्रांच्या पालकांकडून बक्षीस देखील मिळू लागले होते. त्यातूनच ते वयाच्या आठव्या वर्षीच कमवायला शिकले होते. हा निर्णय त्यांनी स्वत:च घेतला होता घरच्यांनी त्यांना त्यासाठी कधीच जोर जबरदस्ती केली नाही असे ते सांगतात. 

image


साधारणत: मुलांना खेऴण्याच्या वयात ज्या गोष्टी आकर्षित करतात त्याच्या विपरित डीएसके यांचे बालवय होते त्यांना धंदा कल्पकतेने करण्याचे जणु वेड लागले होते. त्यातून त्यांचे मित्र पक्के होत गेले. याच मित्रांच्या कामात हातभार लावावा म्हणून त्यांनी टांगा चालविण्यापासून हॉटेलात भांडी घासण्यापर्यंत काम केले. त्यातून मिळालेल्या कमाईतून त्यांनी आपल्या परिवाराला मदत केली. अशाच प्रकारे दिवाळीत एकदा त्यांचा २२ रुपयांचा धंदा झाला होता ती दिवाळी त्यांनी आनंदाने साजरी केली होती जी आजही ते विसरू शकत नाहीत, त्यांनी वडिलांना ते पैसे दिले तेंव्हा ते देखील भावुक झाले होते आणि भावंडाना कपडे आणि मिठाया मिळाल्या होत्या ते आजही ते विसरले नाहीत. ते सांगतात की वडिलांचा पगार केवळ ४० रुपये होता त्यामुळे ते मुलांना दिवाळीत जास्तीत जास्त पाच रुपयांचे फटाके घेवून देवू शकत होते, पण दिपक यांच्या कमाईने ख-याअर्थाने दिवाळी झाली अणि ते सांगतात की, “ मी वडिलांना ते २२ रुपये दिले तेंव्हा त्याच्या डोळ्यात पाणी पाहिले, ते आनंदांचे आश्रू होते आणि वेदनेचे, कृतज्ञता आणि अभिमानाचे देखील! त्यांची तुलना जगात कशाशीही केली जावू शकत नाही”.

image


बालपणात कष्ट केले तरी त्यांना त्या रम्य आठवणी आजही सुखावतात त्यात त्यांना काही कमीपणा वाटत नाही आणि त्या सांगताना त्यांना आनंद मिळतो, त्यासाठी ते स्वत:ला भाग्यवान समजतात. त्यातूनच आपले उद्यमी जीवन घडले याची जाणिव आणि कृतज्ञभाव त्यांच्या मनात आहेत. यातूनच मला धडे मिळाले जे जगात कुठल्याच शाळेत मिळु शकले नसते, मी आजारी पडत नाही, सात त्याने नवी कल्पना घेवून काम करतो त्याचे सारे श्रेय बालपणाच्या या जीवनाला असल्याचे ते सागतात. पैसे नसणे ही गरीबी नाही असे ते मानतात तेही त्यामुळेच ही मुले बालवयातच शाळेतही जाणे आणि वडिलांच्या कामात हातभार लावताना व्यवहारातील जीवनाचे धडेही घेणे शिकली असे ते मानतात. केवळ औपचारिक शिक्षण न घेता ही मुले त्यामुळे आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी काय ते समजायला शिकली हे मोठे काम होते असे ते मानतात. त्यामुळे ते आजच्या केवळ औपचारिक शिक्षण पध्दतीला जाहीरपणे दोषही देतात, व्यावसायिक शिक्षणही त्यापेक्षा महत्वाचे आहे आणि त्याच वयात दिले पाहिजे ज्या वयात हे संस्कार म्हणुन मुले आत्मसात करतील असे ते मानतात. त्यामुळे छडी लागे छम छम. . . या म्हणीचा प्रत्यय त्यांना लहानपणीच घेता आला हे ते त्यांचे भाग्य मानतात. त्यांच्या बालपणी त्यांच्या आईचा प्रभाव जास्त होता हे ते मान्य करतात, तिच्या जीवनाकडे पाहून खूप काही शिकलो असे ते मानतात. तिने कधीही कुठलेही काम हलक्या प्रतिचे न समजता ते मेहनत आणि प्रामाणिकपणाने केले, त्यासाठी अनेकदा अपमानही पचविले.

image


ते सांगतात की सातव्या इयत्तेत असताना ते घरोघरी पेपर टाकत होते, त्यासाठी सकाळी पाचला ते उठत एक दिवस त्यांना उशिर झाला त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्याला अपमान न समजता त्यांनी स्वत:च पेपर विकायचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी निश्चय केला की कुणाचीही नोकरी करणार नाही स्वत:चा व्यवसाय करु. त्यामुळे या सकारात्मक विचारानेच ते उद्यमी झाले असे ते मानतात. मग त्यांनी ब-याच वस्तू विकण्याची कामे केली ते सांगतात, “ त्यावेळी मी अशा वस्तू विकल्या ज्यात कमी पैसे लागत होते. ज्यात मेहनत होती मात्र त्यातून वेगळा आनंद होता”.

image


ते बीकॉमच्या वर्गात एमईएस माहविद्यालयात असताना त्यांच्या जीवनात मोठे वळण मिळाले, त्यातून ते उद्यमाकडे वळले, अखेरच्या वर्षात असताना त्यांना किर्लोस्कर यांच्या कारखान्यात जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांना टेलिफोन ऑपरेटरचे काम पाहून ते शिकावे असे वाटले. त्यांनी तेथील अधिकारी सोनपटकी यांना ते बोलून दाखवले. त्यांना सोनपटकी यांनी सायंकाळी चार वाजता बोलाविले. मायक्रोफोन त्यांनी लावला त्यावेळी त्यांना डेटॉलचा उग्र वास आला त्यावेळी मायक्रोफोन अनेकजण वापरताना संसर्ग होवू नये म्हणून त्याला डेटॉलने पुसत असत पण त्यातून निघणारा दुर्गंध सुगंधात कसा बदलता येईल याचा ते विचार करु लागले, त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी त्यांच्या सहकारिणी असलेल्या मुलीसोबत त्यावर विचार सुरू केला. त्यातून टेलिफोन क्लिनींगच्या कल्पनेचा जन्म झाला. त्यासाठी डेटॉलनंतर अत्तरांने फोन पुसण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुंगध आणि शुध्दता दोन्ही मिळू लागली. हळुहळू त्यांच्या या कल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यांनी मग त्यांचा पहिला उद्योग टेलीस्मेल सुरु केला. त्यात मोठ मोठ्या कंपन्या दीपक यांच्या ग्राहक बनल्या. दीपक स्वतंत्र उद्यमी म्हणून नावारुपाला आले. त्यांच्या नवीन स्वप्ने पाहण्याच्या स्वभावाने मग ते नव्यानव्या क्षितिजांना साद घालत राहिले. 

image


टेलिफोनच्या कामानिमित्त ते किर्लोस्कर कंपनीत जात असत त्यावेळी एक घटना झाली, तेथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून एका खुर्चीवर पाटी वाचून आपणही अशीच कंपनी सुरु करावी असा विचार आला त्यावेळी बांधकाम व्यवसायात १९९१मध्ये काळ्या पैशाचा खूप वापर होता असा बोलबाला होता. कुणीही व्यवसायिक पब्लिक लिमिटेड कंपनी चालविण्यास तयार नव्हता. अशा वेळी त्यांनी हे साहस करण्याचे ठरविले. आणि शेअर बाजारात नोंदीत कंपनी म्हणून डीएसकुलकर्णी पब्लिक लिमिटेड कंपनी सुरु केली. या धंद्यात येण्याची कहाणी देखील वेगळीच आहे पुण्यात आपल्या स्टेशनरीच्या व्यवसायासाठी कार्यालय शोधताना त्यांना जाणवले की भाड्याच्या खोलीला रंग लावण्याचे काम स्वत: केले तर ते कमी पैश्यात होते आणि दुस-याला करायला दिले तर जास्त पैसा खर्च होतो त्यातून त्यांनी आधी हाऊसकिपींगच्या व्यवसायात जाण्याचे ठरविले. पेंटाल नावाच्या उद्योगातून त्यांनी रंगकाम करून देण्याचा उद्योग सुरु केला. १९७३मध्येच त्यांनी या व्यवसायात जम बसविला. त्यात त्यांनी मग फर्निचरचे काम देखील करून देण्यास सुरुवात केली. त्यातून मग छत दुरुस्तीची कामे ते करू लागले, आणि हळुहळू देखभाल दुरुस्ती करता करता कमी खर्चात घरे बांधून देण्याचा व्यवसायदेखील त्यांनी सुरु केला. १९८०मध्ये ते बाधकाम व्यावसायिक झाले. ते सांगतात की, मला जाणवले की मी घराच्या दुरुस्तीची सारी कामे करतो, तर पूर्ण घरच का बांधून देवू शकत नाही?” त्याच विचारातून ते व्यावसायिक झाले. त्यांचे हे काम वाढत गेले अनेक गृहप्रकल्प त्यांनी राज्यात उभारले त्यातून त्यांचे चांगले नांव झाले अग्रणी बांधकाम संस्था म्हणून डीएसके यांचे नाव झाले. आणि व्यवस्थापकीय संचालक होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मग त्यांनी इतरही क्षेत्रात भरारी घेतली, माहिती तंत्रज्ञान, यंत्रमानवशास्त्र, ऍनिमेशन, ऑटोमोबाईल्स अशा अनेक क्षेत्रात ते पादाक्रांत करत गेले.

image


शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यानी बरेच मोठे काम केले आहे, त्यांनी अंतर राष्ट्रीय शाळाही सुरु केली. त्याशिवाय क्रीडाशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकत त्यांनी शिवाजियंस फुटबॉल क्लब देखील सुरु केला आहे त्याचे ते मालक आहेत. आज ते कोट्यावधीच्या उलाढाल असलेल्या अनेक उद्यमांचे यशस्वी मालक आहेत. या यशाच्या मागे कोणत्या प्रेरणा आहेत त्याचा खुलासा त्यांनी यु अर स्टोरीच्या खास मुलाखतीमध्ये केला. ते म्हणाले की ग्राहकांच्या खिश्यापेक्षा मनात काय आहे हे मी पहायला शिकलो. ३० वर्षापूर्वी विकलेल्या घराच्या मालकाला त्यामुळे आजही ते फोन करून चहा प्यायला स्वत:हून जातात आणि चर्चा करतात. त्या घराच्या मालकालाच त्या घराचा निर्माता स्वत:हून येतो म्हणून सांगतो त्यावेळी आनंद होतो. त्याच्या त्या भावना शब्दात सांगता न येणा-या असतात असे ते सांगतात. ते सांगतात की, आपल्या संतुष्ट ग्राहकांच्या घरात पुन्हा जाणे म्हणजे लग्नानंतर आपल्या मुलीच्या घरी जावून तिच्या समाधानी जीवनात डोकावण्यासारखे असते, त्या अर्थाने माझे ४० हजार जावई आहेत असे ते मिश्किलपणे सांगतात. स्वत:ची कोट्यावधींचे साम्राज्य हे त्यांची श्रीमंती मानत नाहीत ते म्हणतात की, श्रीमंती पैशाने येत नाही, लोकांच्या समाधान आणि आनंदातून येते” त्यामुळेच त्यांनी महागड्या समजल्या जाणा-या ठिकाणी देखील पैसे मिऴवण्याची संधी असताना ते न करता मध्यमवर्गियांसाठी घरे तयार केली, त्यात त्यांना जे समाधान मिळाले ते पैसा कमाविण्यापेक्षा वेगळे आहे ज्याची तुलना होवू शकत नाही असे ते मानतात. त्यांच्या शिक्षण संस्थेत म्हणूनच कोट्यावधी रुपये किमतीचे अभियंता ते तयार करतात. समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची कोणतीच संधी ते सोडत नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. जीवनात नशीब केवळ पिठात मिठ असते तितकेच असते, असे ते मानतात. त्यांच्या मते मेहनत प्रामाणिकपणा आणि दृढसंकल्प याच ख-या यशाच्या पाय-या असतात. सकारात्मक माणसाच्या यशाला कुणीच थांवबू शकत नाही असे ते सांगतात.

image


आज त्यांनी वयाचे ६५वर्षे पूर्ण केले आहेत, मात्र त्यांचा उत्साह जराही कमी झाला नाही. आजही ते १५-१६ तास कामे करतात त्यात लहानपणी जसा आनंद घेत तसा कल्पक आनंद घेतात. पैश्यासाठी मी कधीच काम केले नाही हे सांगताना ते भावुक होतात, समाजाचे भले व्हावे म्हणून कामे केली असे ते सांगतात, तेच शेवटपर्यंत करत राहणार असा संकल्पही बोलून दाखवितात.

image


में २०१६मध्ये पुणे एक्सप्रेस महामार्गावर मोठ्या अपघातातून ते बचावले आहेत, मात्र त्यांच्या वाहकाचा त्यात मृत्यू झाला. त्याच्या व्यवसायात त्यांचा मुलगा शिरिष आणि पत्नी हेमंती यांनी त्यांना नेहमीच मदत केली आहे. जीवनाकडुन जे घेता आले त्यावर ते कृतार्थ समाधान व्यक्त करतात, आता समाजाला देत राहण्याची त्यांची जबाबदारी आहे असे ते मानतात त्यामुळे त्यांच्या समाजसेवी संस्था आणि उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यांनी मॅनहटन शहरात १५०मजली इमारत उभारावी हे त्यांचे स्वप्न आहे ते अद्याप पूर्ण व्हायचे आहे. राजकीय व्यक्तींबाबत ते सांगतात की, “प्रत्येक राजकारणी मुख्यमंत्री, पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहतो, वकील सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहतो शिक्षक मुख्याध्यापक होण्याचे स्वप्न पाहतो म्हणून एक बांधकाम व्यावसायिक या नात्याने या व्यवसायाची काशी असलेल्या मॅनहटन मध्ये मलाही १५० मजली इमारत उभी करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.”

पुण्यात सराफा दुकान सुरू करण्याचा आपला मनोदयही त्यांनी बोलून दाखविला, त्यात पुणेरी पध्दतीने धोतर-कुर्ता परिधान करून मी काम करेन असे ते म्हणतात, त्यांच्या बोलण्यात ते खरे पुणेकर असल्याचे सातत्याने ते प्रतिबिंबित करत राहतात.