मुलींना स्वसंरक्षणाचे धड़े देण्यासाठी ‘मुक्का मार’ मोहीम

मुलींना स्वसंरक्षणाचे धड़े देण्यासाठी 
‘मुक्का मार’ मोहीम

Sunday April 24, 2016,

4 min Read

‘मुक्का मार’ ही मोहीम काही मारामारी किंवा कुणाला उकसवण्यासाठी नाही तर ही आहे मुलींना छेडणाऱ्या अशा मवाल्यांपासून रक्षण करण्याची जे दिवसाढवळया मुलींना त्रास देतात. जर आपण मुंबईला वर्सोवा बीचवर फिरत असाल आणि पांढऱ्या रेतीमध्ये काही मुली कुंग फु छे प्रशिक्षण घेत असतील तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुली ‘मुक्का मार’ मोहिमेंतर्गत मोफत कुंग फु चे प्रशिक्षण घेतात. विशेष गोष्ट अशी की या मोहिमेची जबाबदारी जाहिरात क्षेत्रात आपले करिअर सुरु करणारी इशिता शर्मा व कुंग फु ट्रेनर अलेक्झांडर फर्नांडीस यांची आहे.

image


‘मुक्का मार’ मोहीम सुरु करण्याअगोदर ‘दिल दोस्ती एक्स्ट्रा’ सारखे सिनेमे ‘डान्स इंडिया डान्स’ या दूरदर्शन कार्यक्रमाची आतिथ्य करणारी इशिता शर्मा यांनी कला सादरीकरणाला वाव देण्यासाठी ‘आमद’ नामक एक संस्था उघडली. जिथे डान्स, मार्शल आर्ट व योगाचे प्रशिक्षण दिले जाते. इशिताने युअर स्टोरीला सांगितले, ‘काही महिन्यांपूर्वी मी निर्भया वर चित्रित एक लघुपट बघितला. तो बघून मी अंतर्बाह्य हादरले व विचार करायला विवश झाले की असे काय करू जे इतर मुलींसोबत असे घडणार नाही.’ त्याच दरम्यान इशिता यांना त्यांच्याबरोबर घडलेली एक घटना अचानक आठवली. इशिता सांगतात की, ‘एकदा त्या आपल्या कार मधून बाहेर चालल्या होत्या तेव्हा सहा मुले तीन बाईक्सवरून टोमणे मारत जात होते चिडून मी त्यांच्यावर ओरडले ज्यामुळे ती मुले पळून गेली.’

image


या घटनेला बराच काळ उलटला, त्यांना नीटसे आठवत नाही. पण त्यांना हे माहित होते की त्या मार्शल आर्टच्या विद्यार्थी होत्या आणि प्रत्येक पंचबरोबर त्यांना एक आवाज काढायचा असतो. जवळजवळ आठ महिने त्या प्रशिक्षण घेत होत्या. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की त्या मुलींना मार्शल आर्ट शिकवतील. इशिता यांना वाटले की बलात्कार व छेडाछेडीच्या मागे समाजातील शिक्षणाचा अभाव व मुलींच्या प्रती पालकांचा अविश्वास कारणीभूत आहे.’ तेव्हा त्यांनी ‘लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ ताईचे, मार्शल आर्ट हिलिंग रिसर्च सेंटर’ चालवणारे अलेक्झांडर फर्नांडीस यांच्यासमोर आपली कल्पना मांडली जी त्यांना आवडली व त्यांनी इशिता सोबत या मोहिमेत भाग घेण्याची तयारी दर्शवली. अलेक्झांडर यांची हीच ओळख नाही तर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

image


‘मुक्का मार’ मोहिमेची सुरुवात करणे इशितासाठी सोपे नव्हते. यासाठी त्यांनी फेसबुक अकाऊंट वरून एक पोस्ट टाकली जी लोकांना बरीच आवडली पण कुणीच पुढे आले नाही. मग इशिताने निश्चय केला की फेसबुकच्या बाहेर जाऊन या मोहिमेला सत्यात परिवर्तीत करायचे. यासाठी त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीत जाऊन लोकांना समजावले की मुलींना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्शल आर्ट शिकणे किती गरजेचे आहे. इशिताची ही गोष्ट त्या भागातील लोकांना आवडली नाही, त्यांचे म्हणणे होते की त्यांना आपल्या मुलींना घराबाहेर पाठवणे आवडत नाही कारण तेथील वातावरण खूप खराब आहे.

image


इशिता सांगतात की झोपडपट्टीत रहाणारे लोक मुलांना शाळेत पाठवण्याचे काम चांगले करत होते. मग इशिता त्या शाळेत गेल्या जिथे या मुली शिकत होत्या, इशिताने तेथील शिक्षकांना विश्वासात घेऊन मुलींच्या पालकांना समजावयाला सांगितले. इशिता यांच्या या कल्पनेने काही मुलींचे पालक आपल्या मुलींना प्रशिक्षणासाठी पाठवायला तयार झाले.

image


या प्रकारे इशिता यांनी फर्नांडीस सरांबरोबर फेब्रुवारी मध्ये ‘मुक्का मार’ मोहिमेची सुरवात केली. यासाठी त्यांनी वर्सोवा बीचवर नाना नाणी चौकाजवळील स्लम भागाची निवड केली. इथे मुलींना मार्शल आर्ट कुंग फु चे मोफत प्रशिक्षण दिले जाते. ही मोहीम इशिता आपली संस्था ‘आमद’ तर्फे चालवतात. यासाठी त्यांनी सरांबरोबर चार सहायक शिक्षक नियुक्त केले. याचा वर्ग शनिवार व रविवार संध्याकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत चालतो. १०-१५ मुलीं पासून सुरवात केलेल्या मोहिमेत आता ५०-६० मुलींचा सहभाग आहे. वर्तमानात ७५ मुली कुंग फु चे प्रशिक्षण घेत आहेत, त्यांची वय ही साधारण ५ ते १५ वर्षाच्या आतील आहे. दोन वर्गात या मुलींना प्रशिक्षण दिले जाते. इशिता सांगतात की त्यांनी वर्सोवाची निवड यासाठी केली की हा भाग झोपडपट्टीच्या अगदी जवळ असून त्यासाठी मुलींना कोणताही खर्च करावा लागू नये तसेच कराटे वर्ग सुरु होण्याच्या वेळेस त्या वेळेत हजर होतील. सुरवातीला मुलींना शिकवण्यात बऱ्याच अडचणी आल्या, पण त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

image


आपल्या अडचणींबद्दल इशिता सांगतात की ज्या मुलींना त्या शिकवतात त्यांच्या पालकांना हे समजावणे अतिशय कठीण होते की स्वरक्षणाच्या प्रशिक्षणाची किती गरज आहे. याशिवाय मुलींच्या पालकांचा आग्रह आणि मागणी असते की कराटे ऐवजी तुम्ही त्यांना डान्स किंवा गाणे शिकवा. हेच एक कारण आहे की ३-४ वर्षानंतर मुलींचा कराटेचा वर्ग ते बंद करतात.

image


आपल्या भविष्यातील योजनेबद्दल इशिता सांगतात की जर कुणाकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली तर मी मुंबईच्या इतर भागात सुद्धा मार्शल आर्ट चे प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहे. वर्सोवाचे हे केंद्र चालवण्याचा खर्च इशिता आपली संस्था ‘आमद’ तर्फे चालवतात. त्यांची इच्छा आहे की ज्या मुलींना त्यांनी कुंग फु चे प्रशिक्षण दिले आहे त्या मुलींनी अन्य भागात जाऊन इतर मुलींना प्रशिक्षित करावे. 

वेबसाइट : www.aamad.co

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

‘बोलत्या पोस्ट’ चा ऑनलाईन वाचन कट्टा !

पंचविशीतली तरूणी उत्तरप्रदेशातल्या आडगावातली कारीगिरी पोहचवतेय राष्ट्रीय नकाशावर...

‘आरटीआय टी स्टॉल’, येथे आहे प्रत्येक समस्येचे समाधान!


लेखिका - गीता बिश्त

अनुवाद - किरण ठाकरे