नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयातर्फे पहिले अवयवदान; सिन्नरच्या ग्रामीण शेतकरी कुटुंबाने ६ गरजूंना दिले जीवनदान!

नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयातर्फे पहिले अवयवदान; सिन्नरच्या ग्रामीण शेतकरी कुटुंबाने ६ गरजूंना दिले जीवनदान!

Thursday September 21, 2017,

2 min Read

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता विद्यालय पांढूर्ली येथे इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या व मुळची शिवडे ता सिन्नर येथील कु. तेजश्री रमेश शेळके हिला १५ सप्टेंबर रोजी फुटबॅालचा सामना पाहत असतांना चक्कर आल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना तेजश्रीच्या मेंदूला रक्तपुरवठा बंद झाल्याचे लक्षात डॉक्टरांच्या निदर्शनास आले थांबलेला रक्तपुरवठा पूर्ववत करणे अशक्य असल्याचे डॉक्टरांच्या पथकाच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांसोबत चर्चा करून त्यांना कल्पना देण्यात आली, शासनाच्या अवयव दान अभियानांतर्गत पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून यावर्षी ग्रामीण भागात अवयव दानाबद्दल विशेष जनजागृती करण्यात आली यामुळे अवयवदानाबद्दल थोडी माहीती असलेल्या कुटुंबियांकडून तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील औपचारिकतेसाठी ऋषिकेश हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मेंदूमृत घोषणा करण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या मेंदूमृत कमिटीने केल्या व ती ब्रेनडेड असल्याचे घोषित केले. ब्रेनडेड घोषित झाल्यानंतर ZTCC पुणे येथे नियमाप्रमाणे कळविण्यात आले. त्यांनी ऋषिकेश रुग्णालयास कळविले की हृदय मुंबई येथे,यकृत पुणे येथे ,१ मूत्रपिंड सोलापूर येथे व नयन नासिक येथेच देण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुंबई येथील फोर्टीज हॉस्पिटल येथील हृदय काढून नेणारी टीम आली व त्यानुसार ग्रीन कॉरीडोर करून हृदय मुंबईमध्ये पाठविले.


फोटो सौजन्य - दैनिक प्रभात

फोटो सौजन्य - दैनिक प्रभात


यकृत पुणे येथील केईएम रुग्णालयात पाठविले. १ मूत्रपिंड सोलापूर येथे व १ मूत्रपिंड नासिक येथील अपोलो रुग्णालयात पाठविले. या सर्व उपक्रमात डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाने सिहांचा वाटा उचलला आहे. संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया पार पडली. त्यांचे ऋषिकेश रुग्णालयाने विशेष कौतुक केले.

या सर्व उपक्रमात ऋषिकेश हॉस्पिटलचे समन्वयक डॉ संजय रकिबे व डॉ प्रितम अहिरराव, आय सी यु युनिट तज्ञ् डॉ किशोर बाफना , ओ टी तंत्रज्ञ् चंद्रकांत हुशार , भूलतज्ञ् डॉ अनिरुध्द चिमोटे ,ना.महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदिप जाधव यांनी मेहनत घेतली.

विशेष म्हणजे सिन्नर येथील एका ग्रामीण शेतकरी कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा आघात झालेला असतांना त्यांनी आपले दुःख बाजूला सारून अवयवदान चळवळीस मदत केली त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. अवयव दानाची चळवळ नाशिक जिल्ह्यात पाय रोवत असून ऋषिकेश हॉस्पिटल व डॉ पवार वैद्यकीय महाविद्यालयाने अवयवदानाचा उपक्रम एकत्रितपणे चालविल्यास ह्या चळवळीस मोठा हातभार लागेल असा विश्वास डॉ भाऊसाहेब मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.