‘पिक माय लॉंड्री’-आयआयटी'च्या ३ मित्रांचा अनोखा उपक्रम

‘पिक माय लॉंड्री’-आयआयटी'च्या ३ मित्रांचा अनोखा उपक्रम

Tuesday December 08, 2015,

3 min Read

बऱ्याचदा आपल्याला गोष्टी ‘दिसता तशा नसता’ या म्हणीप्रमाणे दुरून आकर्षक भासणाऱ्या गोष्टी जवळ गेल्यानंतर फार वेगळ्या वाटू लागतात. याचप्रमाणे शहरापासून लांब राहणाऱ्या लोकांना शहरातील झगमगीत जीवनशैलीचे प्रचंड आकर्षण असते. गगनचुंबी इमारती, मोठे शॉपिंग मॉंल, हॉटेल्स, लांबच लांब जाणारे पूल या सगळ्या गोष्टी यंत्रवत वाटतात पण परिस्थिती यापेक्षा वेगळी असते. शहरात छोट्या छोट्या लागणाऱ्या सेवा उपलब्ध होण्यास बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. या सेवा बऱ्याच वेळा अभावानेच मिळतात. अशीच एक सेवा म्हणजे लॉंड्रीची. अजूनही या क्षेत्रात बराच ढिसाळपणा असल्यामुळे लोक त्रस्त आहेत.


image


लोकांच्या समाधानासाठी गौरव अगरवाल, समर सिसोदिया, अंकुर जैन हे तीन युवक पुढे सरसावले व त्यांनी बऱ्याच संशोधनानंतर ‘पिक माय लॉंड्री’ ची संकल्पना जन्माला घातली. दिल्ली आणि गुडगाव स्थित लोकांच्या लॉंड्रीच्या समाधानासाठी ही संकल्पना म्हणजे उत्तम समाधान आहे. गौरव, समीर, अंकुर यांनी आय. आय. टी. मधून इंजिनियरिंग करून एका कॉर्पोरेट संस्थेत काही वर्ष नोकरी केली. पण नोकरीच्या व्यतिरिक्त ते लोकांच्या समस्या निवारण्यासाठी तसेच देशाच्या हितासाठी काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते. गौरव व अंकुर हे ओरिसा तर समीर हा छत्तीसगड मध्ये काम करीत होता . त्यावेळी त्यांना जाणीव झाली की त्यांच्या सारख्या नोकरदार वर्गाला कपड्यांच्या धुलाई पासून ते इस्त्री करणे तसेच ड्रायक्लीनिंग करायला अडचणी येत होत्या. धोबी कपडे तर घेऊन जात असे पण वेळेवर मिळण्याची शाश्वती नसायची. मग या तीन मित्रांनी विचार केला की, कमी लोकसंख्या असणाऱ्या व एकमेकांना ओळखणाऱ्या या शहरात ही परिस्थिती आहे तर मोठ्या शहरांमध्ये प्रश्न किती गंभीर असेल. त्यानंतर या तिघांनी कामावरून काही दिवसांची रजा घेऊन दिल्ली गाठली. तिथे त्यांना कळले की बऱ्याच लोकांना या अडचणीला सामोरे जावे लागते. फेब्रुवारी मध्ये ‘पिक माय लॉंड्री’ च्या यशस्वी चाचणी नंतर मे २०१५ मध्ये त्यांनी आपल्या या कंपनीचे उद्घाटन केले.


image


‘पिक माय लॉंड्री’ ही लोकांच्या लॉंड्रीच्या संदर्भांतील समस्येचे समाधान करुन, कपड्यांची धुलाई, इस्त्री, ड्रायक्लिनिंग इ. कामे करून नियोजित वेळेत घरपोच सेवा देते.

कंपनीचे संचालक गौरव अगरवाल सांगतात की, ‘आमच्या पूर्ण टीमचे व्यवस्थापन व सहाय्यक हे पूर्णपणे धंदेवाईक असल्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण न येऊ देता कपड्यांची डिलिव्हरी वेळेत होते. त्यामुळेच आमच्या कंपनीची सेवा घेण्यास लोक इतरांपेक्षा आमच्या कडे जास्त आकृष्ट होतात.


image


आमच्या कंपनीची ऑर्डर घेण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. आमच्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन, फोन करून, किंवा मोबाईल अॅप द्वारे संपर्क करू शकता.

सुरुवातीला कंपनीचे व्यवस्थापन आम्ही तिघेच बघायचो. लोकांचा फोन घेणे, पत्रक वाटणे, कपडे घरपोच पोहोचविणे किंवा पैशांचा व्यवहार बघणे पण लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि फक्त ६ महिन्यांत त्यांच्या टीममध्ये ३५ सदस्य जोडले गेले. सुरुवातीला हे लोक १५ कपड्यांची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करीत होते ती आता मोठ्या प्रमाणावर वाढून २५०० झाली आहे. आमची कंपनी ही दक्षिण दिल्ली व गुडगाव या भागामध्ये काम करते.


image


सध्या कंपनी डिजिटल मार्केटिंग वर आपले लक्ष केंद्रित करीत आहे. आमच्या उत्तम सेवेमुळे आपोआपच लोकांकडून आमची मौखिक प्रसिद्धी होत आहे.

गौरव सांगतात की, ‘आम्ही आमच्या कामाने लोकांच्या समस्येवर तोडगा काढलाच आहे पण आम्ही सरकारला सेवा कर सुद्धा भरत आहोत ज्याचा देशाला फायदाच होत आहे. भविष्यात आम्ही आमच्या या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचारात आहोत. केवळ नफा कमावणे हा आमचा उद्देश नसून लोकांना आमच्या कामाने समाधान व आनंद मिळाला पाहिजे तसेच देशाला पण आर्थिक फायदा झाला पाहिजे तरच आम्ही स्वतःला यशस्वी झालो असे समजू.

वेबसाईट - http://www.pickmylaundry.in

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे