एका आयआयटी अभियंत्याने शोधला ‘उपाय’,गरीब मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा!

एका आयआयटी अभियंत्याने शोधला ‘उपाय’,गरीब मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा!

Monday November 16, 2015,

4 min Read

कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी त्या देशात समानता असणे गरजेचे आहे, प्रत्येक वर्ग, जाती, समूहांचे लोक एकमेकांच्या प्रगतीसाठी काम करतील, सहकार्य करतील. कोणत्याही वर्गात इतके अंतर नसावे की त्यातून समाजात दरी पडावी. समाजाच्या याच असमानतेला दूर करण्यासाठी वरूण श्रीवास्तव यांचा प्रयत्न आहे. ते त्यांची समाजसेवी संघटना ‘उपाय’च्या माध्यमातून रस्त्यांवर भिक मागणा-या मुलांना आणि झोपडपट्ट्यात राहणा-या गरीबांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.

image


‘उपाय’चा विचार

वरूण यांनी आयआयटी खडकपूर मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ते संशोधनासाठी माद्रिद (युरोप)मध्ये गेले. आज ते एनटीपीसी महाराष्ट्रमध्ये उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना जेंव्हा ते गरीब मुलांना भिक मागताना आणि वेश्यावस्त्यात सामान विकताना पाहायचे, त्यांना खूप अस्वस्थ वाटायचे, त्यांनी विचार केला की, का नाही गरीब मुलांना शिक्षण द्यावे आणि त्यांचे जीवन सावरण्याचा प्रयत्न करावा? आणि मग गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी सन२०१०मध्ये ‘उपाय’ नावाच्या सेवाभावी संस्थेचा पाया घातला. हळूहळू त्यांचे काही मित्रही त्यात सहभागी झाले. ते सारे गरीब मुलांना झोपडपट्टीत शिकवायला जायला लागले. आज वरूण यांच्यासोबत १२० स्वयंसेवकांची मोठी फौज आहे. त्यात डॉक्टर्स, अभियंते, प्राध्यापक, आणि इतर अनेक व्यावसायिक देखील आहेत. या सा-यांचे उद्दिष्ट मात्र एकच आहे, गरीब मुलांना शिकवणे आणि आपल्या पायावर उभे करणे.

image


‘उपाय’ची सुरूवात

वरूण सांगातात की, “सुरूवातीला आम्हाला खूपच अडचणी आल्या, आम्ही ज्या मुलांना शिकवत होतो ती कधीही शाळेत गेली नव्हती, आणि त्यांना शिकण्यात काहीच रूचीही नव्हती. मग आम्ही त्यांच्यासोबत खेळायचो, त्यांना खाऊ द्यायचो, आणि मग त्यांना शिकण्याकडे कल वाढावा असा प्रयत्न करायचो. सर्वात मोठी अडचण होती त्यामुलांचे आई-वडिल कधीच त्यांनी शाळेत जावे अशा मताचे नव्हते. कारण ही मुले रस्त्यांवर सामान विकून किंवा भिक मागून पैसा मिळवून आणत होती. पण आता शिकण्याच्या नादात त्यांचे हे उत्पन्न बंद होणार होते. त्यामुळे खूपच अडचणी होत्या. पण आम्ही आमच्या सहकार्यांसोबत भिडलो होतो. आम्ही सकाळी नोकरीला जायचो आणि सायंकाळी मुलांना शिकवायचो, सुट्टीच्या दिवशी तर दिवसभर त्यांना शिकवायचो.”

image


‘उपाय’ दोन कार्यक्रम चालवतो, पहिला-‘रिच ऍन्ड टिच’ यामध्ये वरूण आणि त्यांचे मित्र त्याभागात जातात जे मागास राहिले आहेत. जसे की झोपड्या, मजूर वसाहती, किंवा एखाद्या गावातील-खेड्यातील वस्त्या. येथे हे लोक सरकारी इमारती जसे शाळा, आंगणवाड्यांचा वापर करतात किंवा त्यांना काहीच मिळाले नाहीतर ते चक्क तंबूत शाळा भरवतात.

दुसरा कार्यक्रम आहे- ‘फूटपाथ शाळा’ जो विशेषत: रस्त्यावरच्या मुलांना शिकवण्याचा आहे जी तेथेच राहतात-खातात भिक मागतात.

image


‘उपाय’ची पध्दत

‘रिच ऍन्ड टिच’ केंद्रात वर्गानुसार शिकवतात, त्यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांसाठी एक अभ्यासक्रम तयार केला आहे. ज्यात वेगवेगळ्या विषयांच्या व्यतिरिक्त नैतिक शिक्षण यासारख्या विषयांचाही समावेश करण्यात आला आहे. नववी आणि दहावीच्या तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिकवले जाते. वरूण अभिमानाने सांगतात की, अनेक भागातील मुले जी पूर्वी उत्तीर्ण देखील होऊ शकत नसत, या उपक्रमाच्या माध्यमातून आता नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचत आहेत.

दुसरीकडे ‘फूटपाथ शाळां’चा अभ्यासक्रम एकदम वेगळाच आहे. या मुलांना अजिबात लिहिता-वाचता येत नाही. त्यांच्यासाठी तीन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. मुलांना त्यानुसार त्या-त्या वर्गांत घातले जाते. जसे की एखाद्या मुलाला काहीच येत नाही तर, त्याला पहिल्या वर्गात ठेवले जाते. थोडे बहूत जाणणा-यांना वर्ग-२ आहे, त्यापेक्षा चांगल्यांना तिस-या वर्गवारीत घातले जाते.

image


त्यांचे उद्दिष्ट मुलांचा चौफेर विकास व्हावा हे आहे, त्यांच्यात शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांच्या ज्ञानात भर घालावी हा आहे. वरूण सांगतात की, “ प्रथम मुलांना केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी त्यांना अमिष द्यावे लागते, त्यांना खायला द्यावे लागते, काही खेळणी द्यावी लागतात, कपडे द्यावे लागतात ज्यामध्ये खर्च असतो. याशिवाय लहान-मोठे खर्च असतातच त्यासाठी सर्व स्वयंसेवक प्रत्येक महिन्यात काही पैसा जमा करतात आणि त्यातून खर्च भागवतात. याशिवाय काही लोक देणग्याही देतात त्यातून खूपच मदत मिळते. परंतू आमचे स्वत:चे योगदानच जास्त आहे. आम्ही आतापर्यंत सरकारकडे कोणतीही मदत मागितली नाही.” ते सांगतात की, आता ते पालकांच्या ऐवजी मुलांनाच जागृत करण्यावर भर देतात. ते त्यांना पटवून देतात की, शिकणे त्यांना का आवश्यक आहे? त्यासोबतच जे शिकण्यात चांगले आहेत त्यांना शाळेत घालतात. त्यांच्या राहण्याचा,शिक्षणाचा खर्च स्वत: करतात. आतापर्यंत अशी२५ मुले शाळेत गेली आहेत. याशिवाय बाकी मुले जी शिकण्यात मागे पडत आहेत, त्यांचा कौशल्यविकास केला जात आहे, त्यांना लहान-मोठी कामे शिकवली जात आहेत ज्यातून ती अर्थाजन करुन स्वत:च्या पायावर उभी राहतील.

कौशल्यविकास

काही मुले अशी असतात की जी खूपच गरीब असल्याने शिकून झाल्यावरही भिक मागायला जातात, अशावेळी ‘उपाय’ने त्यांना फुलांचे हार बनवायला शिकवले त्यातून काहीतरी काम करून पैसा मिळवावा असे त्यांच्यावर संस्कार केले जातात. त्यातून त्यांचा कौशल्याविकास आणि कमाई दोन्ही साधले जाते. त्याबरोबरच मुलांना मेणबत्ती-अगरबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण आणि अशाच छोट्या-छोट्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिेले जाते. त्यासाठी त्यांना बाजारपेठही मिळवून दिली जाते. त्यासाठी एक ई-पोर्टल अपनासामान डॉट कॉम च्या माध्यमातून मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जातात.

image


‘उपाय’च्या श्रमांना आता फळ मिळते आहे. वाईट सवयी आणि कुसंगतीत गेलेल्या मुलांना नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्रात उपायची जिथे-जिथे केंद्र सुरू आहेत तेथील मुलांत बदल पहायला मिळतो आहे. काही मुले शाळात जाऊ लागली आहेत. त्यांच्यात नैतिक मूल्य वाढीस लागत आहेत. आज ‘उपाय’ महाराष्ट्रा शिवाय उत्तरप्रदेश मध्येही कार्यरत आहे. येत्या काळात वरूण यांना आणखी विस्तार करायचा आहे. ते मानतात की, जर ते अत्यंत गरीब मुलांना जी आज शाळेत जात नाहीत त्यांना शिक्षित करण्यासाठी यश मिळवू शकले तर त्यातून शहर आणि गावांतील गरीब-श्रीमंतामधील दरी कमी होऊ शकेल. वेगळ्या समाजातील दूरावा नाहीसा होईल आणि देशाची प्रगती होईल.