धारावीच्या कन्यांचा करिष्मा, वस्तीच्या समस्या सोडविण्यासाठी बनविला अॅप!

धारावीच्या कन्यांचा करिष्मा, वस्तीच्या समस्या सोडविण्यासाठी बनविला अॅप!

Friday June 24, 2016,

3 min Read


मुंबईतील धारावी, जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी. गेल्या दोन वर्षात इथल्या जीवनमानात बरेच काही घडले आहे. किशोरवयातील मुलींच्या एका गटाने असा एक अॅप तयार केला आहे की, त्यांच्या सामाजिक समस्या त्यामुळे सुटण्यास मदत होत आहे. आठ ते सोळा वयातील या मुली आता धारावी डायरीचा भाग झाल्या आहेत, धारावी नयानगर जवळच सिनेनिर्माता नवनित राजन यांचा झोपडपट्टी सुधारणा प्रकल्प २०१४मध्ये सुरू झाला होता. एमआयटी अॅप इनव्हर्टर या खुल्या विकास उपकरणाचा वापर यासाठी केला जात होता. या मुलींनी अनेक मोबाईल अॅप्स विकसित केले. ज्यातून दैनंदिन समस्या जसे की लैंगिक छळ, पाण्याची उपलब्धता आणि शिक्षण या संबंधी कामे केली जातात.


image


नवनीत प्रथम यामध्ये सहभागी झाले त्यावेळी २०१२मध्ये ते धारावी डायरी नावाच्या माहितीपटाचे काम करत होते. दोन वर्षांनंतर ते सँनफ्रान्सिस्को सोडून मुंबईत दाखल झाले ते अधिक आपुलकीने समाजाचे काम करण्याचे ठरवूनच. त्यांचा उद्देश होता की ही कहाणी आणि तंत्रज्ञान वापरून या मुलींच्या सक्षमीकरणातून त्यांना बदल घडविण्याच्या कामातील शिल्पकार बनवायचे.

image


“ या लहानग्यांना स्वप्ने नव्हती आणि त्याची कल्पनाही नव्हती कारण ते अश्या कठीण स्थितीत जगत होते जेथे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते आणि सामाजिक विषमता होती.” राजन म्हणाले की, “ मी त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की, तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यांना ही स्थिती बदलता येईल आणि आव्हानांचा सामना करता येईल.” नवनीत म्हणाले. मुलींनी काही समस्या शोधून काढल्या आणि नवे अॅप विकसित केले. उदाहरणार्थ ऍन्ड्रॉईड अॅपच्या मदतीने महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर ‘वुमेन फाईट बँक’ हे अॅप एसएमएसच्या माध्यमातून, स्थानीय नकाशे, धोक्याच्या घंटा, आणि तातडीच्या सेवांसाठी दूरध्वनी सेवा यासाठी तयार करण्यात आले. अशी अनेक अॅप तयार होण्याच्या मार्गावर आहेत. पढाई अॅपच्या माध्यमातून भाषांचे धडे आणि इतर शिकवण्या घेऊन मुलींना, ज्या शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला जातो.

image


अनेक मुलीं पाणीटंचाईच्या समस्येशी झुंजतात आणि बाजुलाच दररोज सकाळी सार्वजनिक नळावरून पाणी भरतात. ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी पाणी अॅप तयार केले. त्यातून प्रत्येक घरातील आवश्यक पाण्याचे नियोजन करण्यात आले आणि लोकांच्या ऑनलाइन रांगा लावून त्यांचा क्रमांक आल्यानंतर त्याना कळविण्याची व्यवस्था करण्यात आली.

या प्रयोगातून या मुलींच्या जीवनात अमुलाग्र बदल झाले. चौदा वर्षांची अन्सुजा मढिवाल, हिच्या वडीलांचे रस्ते अपघातात निधन झाल्यानंतर तिच्या आईनेच तिचा सांभाळ केला.नवजीत म्हणाले की ती निराश झाली होती, तिने जगण्याची आशाही सोडली होती ज्यावेळी तिची भेट झाली. पण आज तिच्यात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला आहे.याचे कारण वुमन फाईट बॅकअप. आता अंसुजाला संगणक अभियंता व्हायचे आहे! 

image


या प्रकल्पात बालविज्ञान देखील शिकवले जाते. व्यावहारिक पध्दतीने गणित आणि इंग्लिशदेखील शिकवण्यात येते. उदाहरण द्यायचे झाल्यास येथील मुली छायाचित्रे पाहून नाम, विशेषणे किंवा वाचायला शिकतात. त्यांना आजुबाजूच्या फेकून देण्यात आलेल्या वस्तूंचा फेरवापर कसा करता येतो याची माहिती दिली जाते. त्यात रिमोट कंट्रोल कारपासून सा-या वस्तु असतात. नवनीत यांनी जमा केलेल्या खाजगी निधीतून आतापर्यंत धारावी डायरीचा खर्च भागवला जात होता. त्याच्या मित्रांनी आणि देणगीदारांनी हा पैसा दिला होता. मुलींनीसुध्दा २०१४च्या आंतर राष्ट्रीय टेक्नोव्हेन्शन चँलेंजमध्ये भाग घेतला होता त्यात त्यांना फोन आणि लँपटॉप मिळाले. कोणत्याही प्राथमिक आडकाठी शिवाय अनेकानेक मुली या प्रकल्पात सहभागी होतात. त्यांची संख्या मागील दोन वर्षात १५वरून २००पर्यंत वाढली आहे. त्यात काही मुलेही आहेत. धारावी डायरी झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रमाच्या मदत निधी जमा करण्यासाठीच्या उपक्रमाची माहिती येथे मिळू शकेल.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

उडिसामधील १४ वर्षांच्या मुलीने विकसित केली पाणी शुध्द करण्याची ‘चिपमेथड’!

आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात जीवशास्त्रीय संशोधनासाठी ‘मिनीपीसीआर’

 ‘वेटर’च्या कामापासून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे तुषार मुनोत उभारणार सेवन स्टार हॉटेल

    Share on
    close