निराश शेतक-यांचा कैवारी भूषण ऍग्रोचे चंद्र दुबे!

0

शेतकरी आत्महत्या भारताच्या एखाद्या दुस्वप्नासारखी आहे. शेतीप्रधान देश असतानाही शेतक-यांचे परिस्थितीने गांजून मृत्यूला कवटाळणे एका अश्या वेदनेसारखे आहे ज्याचा त्रास त्याच्या कुटूंबासोबत देशाला सहन करावा लागत आहे. बदलते वातावरण आणि आर्थिक तंगीने विवश शेतक-यांची गोष्ट एखाद्या राज्याची किंवा ठिकाणची नाही. मध्यप्रदेश अशा पाच राज्यात पहिल्या स्थानी आहे, जेथे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. उर्वरित चार राज्य कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढ मध्येही शेतकरी चांगल्या स्थितीत नाहीत. ही स्थिती किती भयाण झाली आहे याचा अंदाज वाढत्या आकडेवारीवरून सहज येईल. अशावेळी कुणी त्या थाबवण्याचा प्रयत्न करणे कौतुकास पात्र ठरावे असेच आहे.

असाच काहीसा सकारात्मक प्रयत्न केला आहे आयआयटी खरगपूरचे तंत्रज्ञ अभियंता चंद्र दुबे यांनी. पेश्याने अभियंता असलेल्या दुबे यांनी शेतक-यांच्या मदतीच्या उद्देशाने एक अनोखे मिशन सुरू केले आहे. त्याचे नांव त्यांनीच भूषण ऍग्रो ठेवले. या नव्या मिशननुसार शेतक-यांच्या शेत जमिनीवर वैज्ञानिक पध्दतीने शेती केली जाते. अशाप्रकारे ते मध्यप्रदेशातील शेतक-यांच्या शेतीच्या स्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.

या मिशनबाबत ते विस्ताराने सांगतात की, त्यांनी आय आय़ टी मद्रासमध्ये श्री माधवन जे आयआयटी शेतकरी म्हणून ओळखले जातात त्यांच्या एका कार्यशाळेत भाग घेतला. त्यावेळी चंद्र दुबे माधवन यांच्या विचारांनी खूपच प्रभावित झाले. आणि शेतक-यांसाठी काही करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी माधवन यांचा अभ्यास केला. त्यावेळी दिसून आले की त्यांच्या पध्दतीने शेती केल्यास पिक आणि उत्पादकता यांना दोन वर्षात दुप्पट करता येते. इतकेच नाही तर माधवन यांच्या हरितक्रांतीने ते खास प्रभावित झाले. मध्यप्रदेशात शेतक-यांचे प्रश्न मोठे असल्याने भूषण ऍग्रोने याच राज्यातून सुरुवात करण्याचे ठरवले. मध्यप्रदेशात सागर जिल्ह्यात सुमारे ५६ एकर जमिनीवर शेतक-यांच्या जमिनीवर दोन ते तीन पिके घेण्यावर भूषण ऍग्रो लक्ष केंद्रीत करत आहे. हा व्यवसाय आदर्श शेतक-यांना निश्चीत उत्पन्न मिळवून देणारा आहे. त्यानुसार अग्रीम भुईभाडे देवून शेतक-यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची शाश्वती दिल्यावर जमीन वापरली जाण्यावर भर देण्यात आला. हे भाडे किमान वर्षभराच्या उत्पन्नाच्या रकमेइतके दिले जाते. जर भुषण ऍग्रोव्दारे या जमिनीतून जास्त उत्पन्न आले तर त्याचेही शेतक-यांची सहमती घेऊन वाटप केले जाते.

चंद्र दुबे सांगतात की शेती आधारित या अनोख्या विचारांची सुरूवात भुमीविकास योजनांवर कमीतकमी करण्यात आली. शेतक-यांना करार केंव्हाही संपुष्टात आणता येतो. मिशनची ही पध्दत ८०-९०टक्के शेतक-यांना सोबत घेऊन काम करण्याची आहे. मात्र कंपनी अशा श्रीमंत शेतक-यांच्या सोबतही काम करु इच्छिते ज्यांना गुंतवणूक हवी आहे. पाच-दहा टक्के संपन्न शेतकरी आणि ८०-९०टक्के गरीब शेतकरी यांच्यात एक सामंजस्य करार करून कंपनी चालवली जाते.

कंपनीचा हेतू जमिनींचा विकास करण्याबाबत नाही. कंपनी शेतीमधील तंत्र आणि विज्ञान यातील बदलांना महत्व देते. शेतीयोग्य जमिनींना चांगल्या पध्दतीने लागवडीयोग्य बनविणे हाच कंपनीचा मूळ हेतू आहे. दोन वर्षांपर्यत जेव्हा भूषण ऍग्रो शेती विकास करते तेंव्हा शेतक-यांनाही हा दिलासा मिळतो की, भूषण ऍग्रोचा उद्देश पिकांचा विकास करण्यातून होतो जमिनी विकसित करून नाही. भूषण ऍग्रो कंपनी शेतीवर आपले लक्ष केंद्रीत करते.

शेती मध्ये कापणी पासून पेरणी पर्यंत ब-याच उपकरणांची गरज पडते ही उपकरणे विकसित देशांतून उपलब्ध होतात. अशावेळी सामान्य शेतक-यांना ती उपलब्ध होत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन भूषण ऍग्रो या उपकरणाच्या शोध आणि विकासाच्या माध्यमातून आमच्या देशातच ती बनविते. विशेष म्हणजे ही उपकरणे बनविण्यासोबतच कंपनी माधवन यांच्यासोबतही काम करेल. शेतक-यांवरील वाढत्या कर्जांचे ओझे आणि वाढत्या आत्महत्या पाहून भूषण ऍग्रो पिक विम्यावर जास्त जोर देते. ग्रीन टी फूड आणि आय एन आय फार्म्स सारख्या कंपन्या शेतक-यांना भाड्याने पिक अधिगृहित करण्याच्या आदर्श पध्दतींवर प्रयोग करत आहे. त्यांचा उद्देश शेतक-यांना अधिकाधिक फायदा देणे हाच आहे. त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होतो शिवाय त्याचे शेत जास्त दिवस चांगली कमाई करून देते. भूषण ऍग्रोचे लक्ष्य जास्तीत जास्त शेतक-यांना लाभ देणे हे आहे. या उद्देशातून सागर जिल्ह्यात कंपनी पोहोचली आहे. कंपनी लोकांमध्ये चांगल्या परिणामांना घेवून जाते, त्यामुळे शेतक-यांचा त्यांच्यावर सहजच विश्वास वाढतो.

भूषण ऍग्रोचा उद्देश पाच ते सहा वर्षात दहा एकर जमिनीवर काम करण्याचा होता परंतू आता येत्या पाच-सहा वर्षात एक लाख एकर जमिनीवर काम करण्याचा आहे. येत्या काळात कंपनी गुजरातच्या ५-६ गांवात पोहोचणार आहे. सुरूवातीच्या दोन वर्षात कंपनीला शेतक-यांशी करार करण्यात अडचणी होत्या. मात्र त्यानंतर दोघांनीही मिळून कार्याला गती दिली आहे. चंद्र दुबे स्वत:च्या जीवनाची प्रेरणा अर्जेंटिनाच्या गुस्तावो असल्याचे सांगतात. त्यांच्याच मार्गाने ते शेतक-यांसाठी काम करतात. हेच कारण आहे की भूषण ऍग्रो आज भारतात सर्व प्रकारच्या बीज उत्पादनात आघाडीवर आहे. विशेषकरून भाज्यांच्या उत्पादनात कंपनीची वेगळी ओळख आहे. हळदीसारख्या मसाल्यांसाठीही वेगळी योजना आखण्यात आली आहे.

लेखक : ब्रिंदा लक्ष्मी के.

अनुवाद : किशोर आपटे.