चक्क पायाच्या आधाराने मुलांना शिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारी बसंती

चक्क पायाच्या आधाराने मुलांना शिकवून कुटुंबाचा 
उदरनिर्वाह चालविणारी बसंती

Sunday February 07, 2016,

3 min Read

अंधाराला भेदून प्रकाश आपला मार्ग मोकळा करत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक अडचणीचे उत्तर हे ठरलेले असते. गरज आहे ती त्या उत्तरापर्यंत पोहचण्याची किंवा त्याला शोधण्याची. निराशेपोटी बराच वेळा लोक असमाधानी राहून शापित आयुष्य जगायला विवश होतात. पण जे धाडसी आहे ते अडचणींवर मात करण्यास सक्षम असतात व तेच सर्वश्रेष्ठ ठरतात. अशीच एक धडाडी झारखंडच्या बसंती मध्ये आहे, जिने प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःच स्वतःचा आधार बनून आपल्ये ध्येय निश्चित केले.


image


जन्मतःच बसंती दोन्ही हातांनी अपंग होती, यामुळे लहानपणापासूनच तिला सर्वसामान्य आयुष्य जगणे कठीण होते. वाढत्या वयाबरोबरच बसंतीची इच्छाही शाळेत जाण्याची होती पण हात नसल्यामुळे आई – वडिलांनी तिकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान बसंतीच्या हट्टामुळे आई प्रभावतीदेवी यांनी तिला शाळेत पाठवायला सुरवात केली. पण हात नसल्यामुळे ती अभ्यास करू शकत नव्हती दिवसभर शाळेत बसून राहत असे. आपल्या लाचार परिस्थितीवर ती हतबल होती. पण अचानक एक दिवस तिच्या मनात आले की जर आपण आपल्या पायांचा उपयोग हाताप्रमाणे केला तर. यासाठी तिला बराच वेळ लागला पण या छोट्या मुलीने हार नाही मानली. लहानपणापासुनच स्वतःला आत्मनिर्भर करण्याच्या इच्छेने तिने वाटचाल सुरु केली. आपल्या अथक परिश्रमाने आणि दुर्दम्य इच्छा शक्तीने बसंती अभ्यास करतच राहिली. अभ्यासात हुशारीबरोबरच तिचा आत्मविश्वास वाढू लागला.

बसंतीने युवर स्टोरीला सांगितले की, " सन १९९३ मध्ये दहावी पास केल्यानंतर मी शिकवणी घ्यायला लागले. याच दरम्यान माझे वडील जी.माधव सिंह हे आपल्या नोकरीतून निवृत्त झाले. अशातच घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. मग अशा वेळेस शिकवणी घेऊन मी माझा अभ्यास करत असे. दोन्ही गोष्टी चालू होत्या व मी माझा बीए चा अभ्यासक्रम चांगल्या मार्कांनी पूर्ण केला. जोडीने घरखर्च पण चालवत होती. तेव्हा मला वाटले की माझ्या प्रयत्नांनी मी शिक्षक जरूर बनेल. सलग केलेल्या प्रयत्नांनी सन २००५ मध्ये झारखंडच्या सिंदरी मध्ये रोडाबांध मध्य विद्यालयात शिक्षिकेचं काम करण्याची मला संधी मिळाली’’.


image


बसंती वहीवरच नाहीतर, शाळेत फळ्यावर पायांनीच लिहिते. याच बरोबर प्रत्येक दिवशी शाळेत मुलांच्या वह्या तपासणे तसेच त्यांना गृहपाठ देण्याचे काम बसंती आपल्या पायांनीच करते. आपल्या शरीरावरच्या नियंत्रणाने बसंती अगदी सहजपणे फळ्यावर लिहू शकते.

बसंतीने युवर स्टोरीला सांगितले की, "लहानपणीच अभ्यासाच्या सरावादरम्यान मला पायांनी लिहिण्याची सवय झाली होती. पण २००५ मध्ये शाळेत नियुक्त झाल्यानंतर फळ्यावर लिहिणे माझ्यासाठी एक आव्हान होते. तसेच सलग अभ्यास आणि कठीण परिश्रमाने आज मी माझे ध्येय साधू शकली’’.

बसंती पाच बहिणीं मध्ये सर्वात मोठी आहे. इतर बहिणी शारीरिक रूपाने सक्षम आहे. आई प्रभादेवी सांगतात की, "आम्हाला कधीच वाटत नाही की बसंतीला दोन हात नाही. ती घरात पण जोमाने काम करते जसे तिच्या बहिणी करतात. फक्त अभ्यासाच नाही तर घरातील तसेच बाहेरील छोटे मोठे काम बसंती स्वतः करते. आतापर्यंत बसंती कुणावरच आश्रित नाही. तर घर खर्चाची जबाबदारी इतक्या वर्षापासून तिनेच उचलली आहे’’.

बसंतीचे ध्येय आता सरकारी शिक्षक बनण्याचे आहे. यासाठी बसंतीने राज्य सरकारकडे निवेदन केले आहे. युवर स्टोरी बसंतीच्या या जिद्दीला सलाम करते व आशा करते की झारखंडच्या सरकारने बसंतीच्या या हिंमतीचा सम्मान करावा.

आणखी अशा संघर्षात्मक -प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

अशाच काही प्रेरणादायी कथा वाचा :

पोलिओग्रस्त युवकाची ‘तेजस्वी’ कहाणी, योगाने जिंकले हरणारे आयुष्य!

ऐका, बोलण्यास असमर्थ असलेल्या मुलांचा "आवाज"

रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना रोजगाराची संधी देणाऱ्या स्वाती बोंडिया


लेखिका : रुबी सिंग

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close