फेसबूकचा पहिल्या क्रमांकाचा वापरकर्ता म्हणून भारताने अमेरिकेला मागे टाकले

फेसबूकचा पहिल्या क्रमांकाचा वापरकर्ता म्हणून भारताने अमेरिकेला मागे टाकले

Wednesday July 19, 2017,

2 min Read

भारताने अमेरिकेला फेसबूकचा पहिल्या क्रमांकाचा वापरकर्ता म्हणून देशातील सर्वाधिक २४१दशलक्ष सक्रीय वापरकर्त्यांसह मागे टाकले आहे, तर अमेरिकेचे वापरकर्ता २४० दशलक्ष राहिले आहेत. श्रेणीतील हा बदल फेसबूकनेच केलेल्या घोषणेनंतर स्पष्ट झाला असून त्यांनी घोषित केले आहे की महिनाभरात जगातील त्यांच्या युजर्सची संख्या दोन अब्जच्या घरात पोहोचली आहे असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

पोर्टलवर याबाबतची आकडेवारी देण्यात आली आहे, त्यानुसार या समूह संपर्कमाध्यमातील सर्वात मोठ्या संस्थेने जाहिरातदारांना ही माहिती दिली आहे. या आकडेवारीत असे दिसते की सक्रीय वापरकर्ता (यूजर्स) भारतात अमेरिकेच्या पेक्षा दुप्पट वेगाने वाढत आहेत. या अहवालानुसार मागील सहा महिन्यात भारतातील युजर्सची संख्या २७ टक्के वाढली असून त्याचवेळी तुलना केली तर ती अमेरिकेत मात्र केवळ १२ टक्केच वाढली होती.


फेसबुक सीईओ, मार्क झुकेरबर्ग, भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी समवेत

फेसबुक सीईओ, मार्क झुकेरबर्ग, भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी समवेत


आश्चर्यकारकपणे, जरी सर्वाधिक लोकांचा पाठिंबा भारतातून मिळत असला तरी, समूह माध्यामांचा भारतातील वापर मात्र संख्यात्मक दृष्ट्या कमीच राहिला आहे. त्यानुसार स्थानिक लोकसंख्येच्या केवळ १९ टक्के लोक समाज माध्यमांवर सक्रीय आहेत ज्यांनी जून महिन्यात फेसबूकचा वापर केला. या आकडेवारीतून फेसबूकच्या वापरकर्त्यांमद्ये लैंगिक असमानता असल्याचेही दिसून आले आहे. भारतात पुरूषांच्या तुलनेत महिला एक तृतियांश वापर करतात असे दिसून आले आहे. या उलट अमेरिकेत ५४टक्के महिला सक्रीयपणे फेसबूकचा वापर करताना दिसतात.

भारतातील सुमारे निम्मे फेसबूक युजर्स हे २५ वयोगटाच्या आतले आहेत.

या वर्षी अलिकडेच ज्यावेळी फेसबूकने त्यांचे उत्पन्न जाहीर केले की, ते चारपट कमाई करत आहेत आणि २०१६मध्ये त्यांच्या उत्पन्नात आणि महसूलांत देखील स्थिर वाढ नोंदविण्यात येत आहे. फेसबूकने जाहीर केले आहे की, ८.८दशलक्ष डॉलर्स इतका महसूल आणि त्यापैकी ३.५६दशलक्ष डॉलर्स निव्वळ नफा आहे.१.२३दशलक्ष लोक दररोज समूह संपर्कमाध्यमांचा वापर करतात, तर १.१५ दशलक्ष लोक मोबाईलवरुन रोज लॉगइन करतात. फेसबूकने अलिकडेच जाहीर केले की, त्यांचे आता महिन्याला दोन अब्ज पेक्षा जास्त युजर्स जगभरात आहेत.