तुमच्या प्रिय व्यक्तीला मानसिक आजार असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा!

तुमच्या प्रिय व्यक्तीला मानसिक आजार असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा!

Thursday June 29, 2017,

3 min Read

ज्यावेळी कुणी मानसिक आजाराचे दुखणाईत असते, कुटूंबिय आणि मित्रपरिवाराला सर्वाधिक सोसावे लागते. त्यासाठी सर्वसमावेशक असे काही उपाय नाहीत, मानसिक आजारग्रस्ता सोबत आपण कसे वागावे याचे काही नियम आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणात ७.५ टक्के भारतीय मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. लहान किंवा मोठ्या प्रमाणात या रूग्णांना तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. डब्ल्यूएचओने भिती व्यक्त केली आहे की, सन २०२० पर्यंत भारतातील या मनोरुग्णांची संख्या वीस टक्के इतकी वाढू शकते. याचा अर्थ असा की, साधारणत: आपणा सर्वानाच हे माहिती असते की कुणाला तरी मानसिक विकार आहेत. ब-याच प्रकरणात त्या संबंधीत व्यक्तीला नाही पण बाजूच्या कुटूंबिय आणि मित्र-परिवारालाच जास्त सहन करावे लागते.


image


बरेचदा गैरसमज आणि जागृतीचा आभाव यामुळे आजूबाजूच्यांच्या मानसिक आजारांशी कसे वागावे ते आम्हाला माहिती असते का? जर खरोखर अशी व्यक्ती घरातील असेल किंवा जवळची मित्र-परिवारातील असेल तर आपल्याला त्याच्याशी वागण्याची सुरूवात कशी करावी हे तरी माहिती असते का? हे महत्वाचे आहे की त्या आजाराबाबतची योग्य ती सारी माहिती घेतली पाहिजे, ज्याने तुमची प्रिय व्यक्ती ग्रस्त आहे. तुम्ही त्यांच्याशी कसे वागावे याची देखील चांगली जाणिव असणे आवश्यक आहे. त्यामुळे समस्या सोडविण्यास मोठीच मदत होणार आहे. असे असले तरी, केवळ स्वत:ला शिकवणे पुरेसे नाही. जी व्यक्ती या आजारपणातून जात आहे तीला किंवा त्यांना समजून घेणेही महत्वाचे आहे.

वास्तव स्विकारा

हे स्वाभाविकच आहे की तुमच्या जवळच्या व्यक्तीला असा आजार झाला हे समजल्यानंतर तुमच्या वागण्यात काही बदल अपेक्षीत आहेत. कदाचित तुम्ही त्यांच्या सोबतच्या भावनिक नात्याचे फेरमुल्यांकन करू लागता. त्यासाठी वेळ लागतो, हे महत्वाचे आहे की जे बदल झाले आहेत ते किंवा होत आहेत ते मान्य करून स्विकारणे आणि त्यासाठी मनाची तयारी करणे योग्य असते.


image


अनुभवी लोकांशी चर्चा करा

अशा बिकटप्रसंगी, रुग्णालयात किंवा सोशल मिडिया माध्यमातून अशा लोकांना मदत करणारे समूह असतात. त्या ठिकाणी जे लोक पूर्वी होते असे तुम्हाला मदत करू शकतात, तेथे तुमच्या नंतर उपचार घेण्यासाठी जे लोक येत असतात ते देखील तुमची मदत करत असतात.

तुमच्या स्थितीबाबत इतरांशी चर्चा करून, जे तुमचे समदु:खी असतात, त्यातूनही तुमच्या आजारा बाबतच्या ब-याच गोष्टी समजू शकतात. नेहमी जास्त माहिती मिळवणे फायद्याचे असते.


image


जबाबदारीची विभागणी

ज्यावेळी अशा कुणा माणसाला आपल्या मदतीची गरज असते, तुम्ही त्यांची पूर्णत: जबाबदारी घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे, पण आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्या व्यक्तीला कुठवर सांभाळून घ्यावे याच्या मर्यादा जपल्या पाहिजेत, त्यामुळे त्या व्यक्तिला आपण इजा तर करत नाहीना हे लक्षात असू द्या. त्यामुळे कुठवर काळजी घ्यावी याची सीमारेषा आखणे महत्वाचे असते. युवर स्टोरीला संध्या मेनन ज्यांनी बायपोलर आजाराचा सामना केला त्यांनी सांगितले की, “ मला काही करायला सांगितले की तिरस्कार येत असे. मला त्याच्या सूचना स्विकारण्यास आवडे, ज्यावेळी मी बरी असेन त्याच वेळी. या प्रकरणावरून, तुमच्याकडे प्रचंड संयम असायला हवा ज्यावेळी तुम्ही अशा व्यक्तींसोबत रहात असता.”

मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांसोबत जबाबदारी घेताना त्या व्यक्तीला उत्साहित वाटले पाहिजे. पण हे केवळ पराकोटीच्या काळजी आणि दयाळूवृत्तीनेच साधता येते.


image


स्वत:ची काळजी घ्या

अनेकदा खासकरून कुटूंबातील ज्येष्टाबाबत, अशा व्यक्तीला मानसिक आजार झाल्याचे समजते त्यावेळी लगेच येणारी प्रतिक्रिया म्हणजे अपराधीपणाची भावना असते. स्वत:ला दोष देत राहणे थांबवले पाहिजे आणि त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना वास्तवात काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे.

हे देखील महत्वाचे असते की, तुम्ही प्रिय व्यक्तीला मदत करण्यास सक्षम आहात याची खात्री बाळगता येते ज्यावेळी तुम्ही स्वत: स्वत:ची काळजी घेत असता. स्वास्थपूर्ण आहार आणि विहार तसे जीवनशैली महत्वाची असते. अशा थेरपी (पध्दती) देखील उपलब्ध आहेत ज्यातून कुटूंबिय आणि मित्र परिवारांना कसे वागावे याचे मार्गदर्शन केले जाते. व्यक्तिगत संबंध जोपासणे, अशा मित्रांची संगत ज्यांना तुमची मदत करणे समजते, किंवा ज्यांना इतरांना मदत करण्याची आवड आहे अश्यांची सोबत असणे महत्वाचे असते.