बारावी उत्तीर्ण व्यक्तीने केवळ दहा हजारात निर्मित केला एक टन एसी, विजेचा वापर १०पटीने केला कमी!

0

प्रामाणिकपणे आणि योग्य दिशेने करण्यात आलेले प्रत्येक काम यशाचे शिखर गाठतेच. त्यासाठी केवळ खूप प्रयत्न आणि जिद्दीची आवश्यकता आहे. त्या दरम्यान अनेकदा मिळणारे अपयश हे औषधाचे काम करते आणि समजूतदार व्यक्तीला लक्ष्य गाठण्यासाठी प्रेरित करते. अशीच एक कहाणी आहे, राजस्थानच्या सरदारशहर येथील त्रिलोक कटारिया यांची. त्रिलोक कटारिया यांच्यासमोर कमी किंमतीत आणि विजेच्या कमी वापराने चालणारे वातानुकुलित यंत्र (एयरंकडीशनर) बनविण्याचे आव्हान होते. त्यांनी तीन वर्षापर्यंत एसी बनविण्यासाठी मन लावून संशोधन केले. या तीन वर्षात त्रिलोक यांनी जवळपास ८ ते १० लाख रुपये खर्च केले. त्यांच्या जिद्दीला नंतर यश मिळाले आणि त्यांनी १० पटीने कमी वीजेचा वापर करणारा एक टन वजनाच्या एसीची निर्मिती केली. या एसीची निर्मिती करण्यासाठी केवळ १० हजार रुपये खर्च आला आहे. अशातच जर या उत्पादनाला व्यावसायिकरित्या बाजारात दाखल करण्यासाठी बनविला जाईल, तेव्हा विभिन्न खर्चांसोबत त्याची किंमत जास्तीतजास्त १५ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, जी बाजारात उपलब्ध २५ ते ३५ हजार रुपयांच्या एसी पेक्षा खूप कमी आहे.

त्रिलोक यांनी युवर स्टोरीला सांगितले की,

सलग वाढणारी महागाई आणि विजेच्या वाढणा-या भावात प्रत्येक वर्षाला होणा-या वाढीमुळे सामान्य उपभोक्त्याला एसीची आवड असूनही त्याच्या येणा-या विजेच्या खर्चामुळे घाबरतात. याच भीतीला दूर करण्यासाठी आणि सामान्य उपभोक्त्याला एसी ची हवा देण्यासाठी मी हा एसी बनविण्याचे स्वप्न पाहिले होते.

त्रिलोक हे अनेक वर्षांपासून एसी दुरुस्त करण्याचे काम करतात. त्यांनी सांगितले की, ते ज्या घरात एसी दुरुस्त करण्यासाठी जायचे, तेथे सर्व लोक एकच गोष्ट बोलायचे की, एसी लावल्यानंतर विजेचे बिल खूप येते. सारख्या सारख्या याच गोष्टी एकून मी मनातच विजेचे कमी बिल येणा-या एसीची निर्मिती करण्याचा निश्चय केला होता. त्यांनी सांगितले , या एसीची एक विशेष बाब ही देखील आहे की, हा एक इकोफ्रेंडली एसी आहे. बाजारात उपलब्ध एसी मध्ये सामान्यत: आर – २२ वायूचा उपयोग केला जातो, ज्याने ओझोन अवरणाला नुकसान होते, तर त्यांच्या एसी मध्ये हायड्रोकार्बन वायूचा वापर करण्यात आला आहे. या वायूमुळे पर्यावरणाला नुकसान होत नाही.

विजेचा वापर १० पटीने कमी


एसीची निर्मिती करणा-या कंपनीत काम करणा-या एका तांत्रिक अभियंत्याच्या मते, हा एसी अन्य एसीच्या तुलनेत जवळपास ८ ते १० पटीने कमी विजेचा वापर करतो. १० एम्पियर व्यतिरिक्त हा ०.०८ – ०.०९ पर्यंतच आहे. एसीत कम्प्रेशर या पद्धतीने लावण्यात आले आहेत की, हा कमी वॉल्ट मध्ये देखील चालू होतो. एक टन एसी दोन हजार वैट विजेचा वापर करतो. हा एसी २०० वैट विजेचा वापर करतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या स्टेबलाइजरची देखील गरज नाही. म्हणजेच विजेच्या उपलब्धतेत येणा-या चढ-उतारात देखील हा एसी सुरक्षित आहे.

१२ वी उत्तीर्ण आहेत त्रिलोक

नँशनल स्कूल ऑफ ओपन लर्निंग मधून १२वी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्रिलोक कटारिया यांनी राजस्थान मध्ये आयटीआय मधून एसी शी संबंधित अर्धवेळ पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी देहरादून, फरीदाबाद, दिल्ली आणि नोएडा मध्ये एसीची निर्मिती करणा-या कंपनीत काम केले. येथे राहून एसी बनविण्याच्या पद्धती त्याच्याशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या. काम करण्यासोबतच त्यांनी अशा एसीची निर्मिती करणे सुरु केले, जो बाजारात उपलब्ध उत्पादनाच्या तुलनेत खूप चांगला असेल.

पेटंट (स्वामित्व हक्क) मिळवण्याची प्रक्रिया सुरु

त्रिलोक यांनी आपल्या या संशोधनला ला पेटंट करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत याला बाजारात दाखल करण्यात येणार नाही. त्यांच्या या संशोधनाला बाजारात दाखल करण्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क देखील केला आहे. मात्र, सध्या ते त्यासाठी तयार नाहीत.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

सर्वात स्वस्त वॉशिंग मशीन

भर उन्हाळ्यातही वितळणार नाही आईसक्रीम, थंड राहणार पाणी

'इनवोर्फिट' किंमत हिट, पर्यावरणासाठी फिट, गृहिणींमध्ये सुपरहिट

लेखक :अनमोल

अनुवाद : किशोर आपटे.