‘द गोल्डन बर्ड फाऊंडेशन’: गरीबांचा कैवारी!

‘द गोल्डन बर्ड फाऊंडेशन’: गरीबांचा कैवारी!

Saturday October 31, 2015,

3 min Read

आपल्या देशातील अनेक लोक अभावग्रस्त जीवन जगतात. आर्थिक टंचाईमुळे त्यांची अनेक स्वप्न भंग पावतात. कित्येक इच्छा मनात दाबल्या जातात. परंतू जेंव्हा ते जीवनात दोन पावले पुढे सरकतात, तेंव्हा मागे राहिलेल्यांचा अजिबात विचारसुध्दा करत नाहीत. किंवा असं म्हणता येईल की, त्या लोकांबाबत ते विचार करत नाहीत जे आजही त्याच परिस्थितीत आहेत ज्यात पूर्वीकधीतरी हे सुध्दा होते. खूपच कमी लोक आहेत जे असा विचार करतात की, ज्या परिस्थितीत मी होतो ती अन्य कुणाच्या वाट्याला न येवो. इंदूरचे आकाश मिश्रा त्यांच्यापैकीच एक आहेत. आकाश चौदा वर्षांचे असताना संगणक प्रशिक्षण घेऊ इच्छित होते. परंतू गरीबीच्या कारणास्तव त्यांच्या आईला त्यांना हे शिक्षण देता आले नव्हते. याच गोष्टीने त्यांना हा विचार करण्यास प्रवृत्त केले की, कोणाही मुलाच्या पालनपोषणात किंवा शिक्षणात कुटूंब आणि पैसा किती महत्वाचा असू शकतो? या शिवाय आकाश यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि शहिद भगतसिंग यांच्याबाबत जेंव्हा वाचले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, भारतात गरीब आणि गरजू लोकांसाठी काम करणे किती गरजेचे आहे. लोकांचे हे विचारच आमच्या देशाला आधिक सामर्थ्यशाली बनवतात.त्यानंतर आकाश यांच्या मनात गरींबांसाठी काम करण्याची इच्छा दृढ होत गेली. आकाश यांना त्या मुलांसाठी काम करायचे होते, ज्यांना गरीबीच्या कारणास्तव पुढे जाता येत नव्हते. आपली स्वप्ने पूर्ण करता येत नव्हती. त्यामुळेच आकाश यांनी ‘द गोल्डन बर्ड फाऊंडेशन’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

त्याआधी आकाश एका अनाथालयात गेले आणि त्यांनी पाहिले की तेथे जी मुले राहतात, ती किती एकाकी आणि अनामिक आयुष्य जगतात? त्यांना या गोष्टीने गहिवरून आले. त्यांनी ठरवून टाकले की, ते अश्याच मुलांसाठी खूपकाही करतील. स्वयंसेवी संस्था सुरू करण्याच्या आपल्या या स्वप्नांना साकारण्यासाठी देखिल त्यांना खूप संघर्ष करावा लागला. अनेक आव्हांनाचा सामना त्यांनी केला. आकाश यांचे वय केवळ पंधरा वर्षांचे होते. त्यांना माहिती होते की, ते कुणाशी याबाबत बोलतील तर सारे त्यांची मस्करी करतील, आणि गांभिर्याने घेणार नाहीत. याशिवाय अनेक कायदेशीरबाबी होत्या ज्या पंधरा वर्षांच्या मुलाने करणे शक्य नव्हते.

'परम 'सोबत आकाश

'परम 'सोबत आकाश


आकाश यांनी आपली कल्पना काही मित्रांना सांगितली तेंव्हा सा-यांनाच काही ती आवडली नाही. परंतू आकाश यांनी मात्र आता पुरता संकल्प केला होता की, त्यांना हेच काम करायचे होते. असे असले तरी त्यांच्यासमोर आणखी एक समस्या तोंडवासून उभी होती ती म्हणजे पैसा! आकाश यांच्याकडे स्वत:चा रोजगार नव्हता, किंवा गुंतवणूक नव्हती. किंवा त्यांचा परिवारही आर्थिकदृष्ट्या यासाठी समर्थ नव्हता ज्यांनी त्यांना मदत केली असती. आता आकाश यांच्याकडे एकच पर्य़ाय होता की स्वत:च कमवायचे आणि त्या पैशातून स्वयंसेवी संस्था चालवायची!

आकाश यांनी इंटरनेट सेवा देणा-या एका कंपनीत सेल्समनची नोकरी पत्करली, हा खूपच छोटा रोजगार होता. त्यांना घरोघर जावे लागे. आकाश यांच्यासाठी आवश्यक होते की, ते अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्कात राहतील. ते दिल्ली येथील एका वकीलांच्या संपर्कात आले. त्यांनी त्यांना स्वयंसेवी संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक नोंदणी आणि कामकाज करण्याची हमी दिली. आकाश यांच्यासाठी दिल्लीत येणे आणि राहणे खूपच कठीण होते. त्यातच या वकीलांनी अचानक त्यांना मदत करणे थांबविले. आता आकाश यांना पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची होती.

संघर्षाचा रस्ता खूप लांबचा होता. दोन वर्षांनी त्यांनी आपल्या स्वयंसेवी संस्थेची नोंदणी केली आणि आपले पहिले अभियान सुरू केले. त्यांनी इंदूर येथूनच काम करण्याचा निर्णय घेतला. आतापर्य़ंत आकाश याच्या संस्थेने अनेक चांगली कामे पूर्ण केली आहेत. जसे त्यांनी ‘परम’ नावाचा प्रकल्प चालवला, ज्याद्वारे मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय अन्य एक प्रकल्प ‘आर्य’ देखील चालवला ज्यातून महिलांना आर्थिक विकासात हातभार लावण्यासाठी कपडे तयार करून विक्री करता येईल. त्याचबरोबर त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या रक्तदान आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी शिबीराचेही आयोजन केले. त्याचबरोबर पर्यावरणाच्या मुद्द्यावरही काम केले.

भविष्यात आकाश आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी निधी संकलन करू इच्छितात. जेणेकरून समाजातील गरीब गरजूंना आणखी मदत करता येऊ शकेल. आकाश लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करु इच्छितात.