साहित्यिक आणि सांस्कृतिक विचारधारेला प्रोत्साहित करणारे हैदराबादमधील 'लामकान'

 साहित्यिक आणि सांस्कृतिक  विचारधारेला प्रोत्साहित करणारे हैदराबादमधील 'लामकान'

Saturday April 09, 2016,

6 min Read

हैद्राबादमध्ये बंजारा हिल्स खूपच प्रसिद्ध जागा आहे. काही काळापूर्वी बंजारा लोक येथे वास्तव्यास असतीलही कदाचित .. मात्र आज हे शहरातलं प्रसिध्द आणि सर्वात सुधारित ठिकाण आहे. याच भागात एक असे ठिकाण आहे, जे केवळ साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टींसाठी नव्हे तर, चहा, समोसे, दही वडे, दालखाणे आणि क़ीमा खिचड़ीसाठी तितकच प्रसिद्ध आहे. ज्याला लोक ‘लामकान’या नावाने ओळखतात. लामकान उदार राजकारणी विचारांना प्रोत्साहित करणारे एक वेगळे सांस्कृतिक केंद्र आहे. 

लामकान आपल्या स्थापनेचे सहा वर्ष पूर्ण होण्याचा आनंद व्यक्त करत आहेत. लामकानची जेव्हा स्थापना झाली होती, तेव्हा कदाचितच कुणी विचार केला असेल की, खूपच कमी वेळेत हा देश आणि जगातील या लोकांपर्यंत आपली ओळख बनवेल, जे कला आणि संस्कृती पूर्ण मेहनतीने आणि उदारतेसोबत जगत आहेत. आज जेव्हा सर्व जगात लोकांना आयुष्याच्या शर्यतीत तत्वांची चिंता नाही, लामकान आपल्या तत्वांसोबतच आपली लोकप्रियता वाढवत आहेत. हैद्राबादमध्ये सांस्कृतिक क्रांतीचे दुसरे नाव लामकान म्हटले जाऊ शकते. लामकानची स्थापना करण्यामागे एक सशक्त कहाणी लिहिणा-या अशहर फरहान यांनी स्वतःला यासाठी समर्पित केले आहे.

हैद्राबाद येथील बंजारा हिल्स या भागाला श्रीमंत लोकांचे स्थान मानले जाते. येथे फुटभर जागेसाठीदेखील हजारो रुपये भाडे आकारले जाते. अशातच एक संपूर्ण  ३६०० स्क़्वेअर फुट घर कला आणि संस्कृती प्रेमींना मोफत उपलब्ध करण्यामागे अखेर काय विचार असतील? अशरफ फरहान यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “मी दिल्लीच्या त्रिवेणी सेंटरला जायचो. मुंबई मध्ये पृथ्वी थिएटर मध्ये बसणे मला चांगले वाटत होते, मात्र मी बघत होतो की, हैद्राबादमध्ये असे कोणतेही केंद्र नाही. आणि आश्चर्यकारकपणे ‘लामकान’ला अशा केंद्राच्या रुपात स्थापित केले जाऊ शकेल.” 

image


फरहान सांगतात की, लामकानच्या सुरुवातीच्या पाठीमागे एक दुखद कहाणी आहे. हे घर त्यांचे मामा मुय्यद हसन यांचे आहे. त्यांच्या आजाराच्या अखेरच्या क्षणात माहित पडले की, त्यांना कर्करोग होता. ते फोटोग्राफर होते आणि डॉक्युमेंट्री बनवत होते. त्यांनी लग्न केले नाही आणि फरहान त्यांच्या खूप जवळचे होते. नंतर जेव्हा हा विचार आला की, त्यांच्या घराचे काय करावे, लामकान यांना नवी दिशा मिळाली. फरहान सांगतात की, “मामांच्या घराचे काय करावे, हा विचार आमच्या दुस-या विचाराचे उत्तर होते. आम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतो की, एक अशी जागा असली पाहिजे जेथे लोक आपल्या विचारांना मुक्तपणे व्यक्त करू शकतील. न्युयार्कमध्ये देखील अशाप्रकारचे केंद्र चालू होते. हैद्राबादमध्ये कँफे बंद होत होते. मला आणि माझी पत्नी हुमैरा यांना कँफेमध्ये बसणे खूप आवडायचे. अॅबिडसच्या ओरिएन्टल हॉटेलबाबत मी आपल्या मामा आणि वडिलांकडून खूप ऐकले होते. जेथे कला, साहित्य, राजकारण आणि शिक्षणाशी निगडीत लोक एका जागी जमा होऊन चहा पीत आयुष्य घडवायचे. मी विचार करायचो की, त्याचप्रकारची अशीच एखादी जागा असली पाहिजे, जेथे सामाजिक स्तरावर सर्व प्रकारचे उदार लोक एकत्र गोळा होऊ शकतील. याच विचाराने ‘लामकान’चा जन्म झाला. यात त्या सर्व लोकांची भागीदारी होती, जे या घरात आपली भागीदारी ठेवत होते.” 

image


‘लामकान’ला लोक वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. सर्वात पहिले तर ही जागा नाटककार, संगीतकार आणि साहित्यकारांसोबत उदार विचारधारेला प्रोत्साहित करणा-यांसाठी मोफत उपलब्ध आहे. नाटककारांना ही सूट आहे की, ते आपल्या प्रेक्षकांकडून १०० रुपयांपर्यंत तिकीट घेऊ शकतील. काही लोक या कॅफेच्या भागाला बघून चहा समोस्याचा आनंद घेण्यासाठी येतात. काही लोक त्याला माहिती तंत्रज्ञानाच्या उपभोक्त्यांचे मनोरंजन केंद्र मानतात. दिवसभर नव्या पिढीचे युवा येथे मोफत वाय फाय ने फायदा करून आपल्या लॅपटॉप सोबत येऊन बसतात. मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी काही लोक संध्याकाळ होताच येथे नाटक बघण्यासाठी जमा होतात. फरहान सांगतात की, भारतीय कला पाश्चात्य कलेपेक्षा खूप वेगळी आहे. येथे कलाकार आपल्या कलेने मैफिली रंगवतात. 

“पश्चिमी देशात अनेक कलाकार मिळून मोठे भवन आणि ऑपेरा हाउस मध्ये कार्यक्रम करतात, मात्र भारतात बरेचदा मर्यादित लोकांच्या मैफिलीतच कलाकारांचे प्रदर्शन भरते. ही संस्कृती दरबार मधून निघून ड्राइंगरूमपर्यंत आली आणि आता ड्राइंगरूममधून देखील लोप पावायच्या मार्गावर होती. अशातच त्या कलाकारांना एक मंच देण्याच्या दृष्टीने देखील लामकानचे नक्षीकाम केले.” 

image


लामकानचे हॉटेलची देखील एक कहाणी आहे. सुरुवातीला येथे केवळ चहा आणि बिस्कीट ठेवण्याची योजना होती, मात्र हळू हळू येथे पूर्ण हॉटेल वसले. आज हे बंजारा हिल्सचे एक लोकप्रिय हॉटेल आहे. फरहान सांगतात की, "एके दिवशी नामपल्लीवर एक मिनार मस्जिदजवळ एक रद्दीवाला बसला होता. तेथे मी पाहिले की, एक इराणी हॉटेलच्या खुर्च्या आणि टेबल पडले होते. इराणी कँफेच्या त्या खुर्च्या आम्ही विकत घेतल्या. सुरुवातीस एका हॉटेलमधून खुर्च्या आम्ही खरेदी केल्या. सुरुवातीस जवळच्या एका हॉटेलमधून थर्मासमध्ये चहा मागवत होते, त्यानंतर मी एका चहा बनविणा-याला ठेवले, मात्र त्याचा देखील काही फायदा झाला नाही. त्यानंतर आम्हाला के. के. यांचे मोलाचे योगदान लाभले, जे सध्याचे लामकान कॅफे चालवितात. येथील जे समोसे लोकप्रिय आहेत, ती देखील के. के. यांचीच कमाल आहे. आमचा विचार होता की, कॅफे हे सर्वसामन्यांच्या आवाक्यात असावे. आज देखील या कॅफेत तुम्ही पन्नास रुपयात पोट भरून जेऊ शकता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, येथे उपयोगात येणारे सर्व धान्य सेंद्रिय आहे."

फरहान यांच्यानुसार, एक खुला वैचारिक मंच ही लामकानची खरी ओळख आहे. त्यांना वाटते की, कला आणि संस्कृती मार्फत त्या मुक्त विचारांना प्रोत्साहित करेल, जेथे प्रत्येकजण स्वतःचे म्हणणे मांडू शकेल. त्यासाठी कॅफे खूप गरजेचे आहे. ते वियानाच्या एका कॅफेचा उल्लेख करताना सांगतात की, वियाना मध्ये एक कॅफे आजही आहे. १९०६पासून १९१०पर्यंत आईन स्टाइन, लेनिन, फ्राइड यांसारख्या वैज्ञानिक आणि चिंतक येथे जमा होत होते.

image


फरहान मुळचे कंप्युटर इंजिनियर आणि उद्योजक तर आहेतच, मात्र प्रख्यात कहाणीकार जिलानी बानू आणि मागच्या पिढीच्या ज्ञानी लोकांमध्ये आपली ओळख बनविणारे शायर आणि लेखक प्रा. अनवर मुअज्जम यांच्या घरी जन्म झाल्यामुळे ते साहित्य आणि कलेची मोठी विरासत ठेवतात. कदाचित या वारशाने त्यांना लामकान सारख्या जागी हैदराबादला देण्यासाठी प्रेरित केले. ते सांगतात की,"घरचे वातावरण नेहमी पासूनच खूपच संस्कारी राहिलेले आहे. असे असूनही मी लिहित नाही, मात्र वाचत असतो. चार पाच वर्षापूर्वी मी इंडस्ट्री मधून स्वतःला निवृत्त केले. मी सांस्कृतिक गोष्टींना महत्व देतो. येथे केवळ राजकारण नसावे तर, लोकांनी एकत्र बसून येथे विचार विनिमय करावे".

लामकानची स्थापना करणे, सहज सोपे नव्हते. पाच वर्षात याचा प्रभाव जितका पसरायला हवा, तितका होऊ शकला नाही. त्याबाबत फरहान सांगतात की, लामकानच्या आत तर ठीक आहे, मात्र त्याचा प्रभाव आम्ही बाहेरपर्यंत घेऊन जाऊ इच्छितो. ज्यात अधिक यश मिळू शकले नाही. ते हैद्राबादमध्ये सोशल डेमोक्रेटिक विचारांना प्रोत्साहित करण्याचा विचार करत आहेत. मात्र लामकानच्या काही भौगोलिक मर्यादादेखील आहेत, ज्यामुळे त्याचा प्रभाव अधिक लांबपर्यंत जाऊ शकला नाही. फरहान सांगतात की, "लामकान बंजारा हिल्समध्ये असल्यामुळे जुन्या शहरापासून लांब आहे. हे अशोक नगर आणि मुशिराबाद सारख्या मध्य भागासोबतच विद्यापीठापासून लांब आहे. शहरात काही अन्य स्थळं देखील आहेत, मात्र ते स्वतंत्र विचारांना स्थान देण्यापासून थोडे बिचकतात, असे लोक आमच्याकडे येतात. त्यांचा आवाज आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. ज्या आवाजाला दुसरीकडे दाबण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना संधी देणे आमच्यासाठी आव्हानात्मक कार्यक्रम आहे."

आपल्या भविष्यातील कार्यक्रमांबाबत फरहान सांगतात की, आठवडाभराच्या कार्यक्रमांना इंटरनेटवर टाकण्याची योजना आहे. कार्यक्रमांची संख्या वाढत आहे. त्याला सुव्यवस्थित करायचे आहे. काही लोक सल्ला देतात की, कमीत कमी आणि चांगले कार्यक्रम करा, मात्र हे आमच्या तत्वाच्या विरुद्ध आहे. जो पहिला येईल, त्यालाच जागा मिळेल. हैद्राबाद मध्ये सरकारी सभागृहात आपल्या बुकिंगला सरकारी कार्यक्रमांसाठी कधीही रद्द केले जाऊ शकते, जे आमच्याकडे नाही. फरहान आपल्या आव्हानांबाबत सांगतात. अनेक आव्हान आहेत, "आम्हाला वाटत होते की, साहित्यिकांचे अनेक गट बनतील, मात्र असे होऊ शकले नाही. डाॅक्युमेंट्री सर्कलचे ज्या प्रकारे यशस्वी कार्यक्रम होत आहे, प्रवास सुरु आहे. अनेक काम अर्धवट आहेत, पूर्ण करायचे आहेत."

लेखक : एफ. एम. सलीम

अनुवाद : किशोर आपटे