"मी आशेची राजदूत आहे, बळी नाही!"

ती बळी नाही, तर जगण्याचे बळ आहे. आपल्या आयुष्यानं दिलेला धोका पचवून पोलादासारखी कणखर झालेली हिम्मत म्हणजे प्रज्ञा. तिच्यावर झालेला अॅसिडहल्ला तिला कुरूप करू शकला नाही, तिचं जीवन बदलू शकला नाही, तिला नामोहरम करू शकला नाही, तिच्या जीवनाचा ताबा घेऊ शकला नाही. तर रणरागिणी प्रज्ञानच त्या क्षणाचा पराभव केला आणि त्या संकटापासून इतरांना वाचवण्य़ासाठी हातात धैर्याचं शस्त्र घेऊन त्याच्या वाटेत उभी राहिली. अशा प्रेरक शक्ती असलेल्या प्रज्ञाचं हे कथन... तिच्याच शब्दांत.

"मी आशेची राजदूत आहे, बळी नाही!"

Monday August 17, 2015,

5 min Read

प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येतो, जो सगळं काही बदलून टाकतो, आपलं जीवन घडवतो किंवा आपल्याला पूर्णपणे उध्वस्त करून टाकतो. आपल्या जीवनात अशा क्षणांना प्रतिसाद देणारे पुष्कळ लोक मी पाहिलेले आहेत. जीवघेण्या आजारातून वाचलेले लोक जीवनावर प्रेम करतात, तर ज्यांनी आपले प्रियजन गमावलेले असतात असे लोक जगण्याच्या सगळ्या आशा सोडून देण्याची शक्यता असते. मी अशाही लोकांचा आदर केला आहे, ज्यांनी त्यांच्याकडे जे आहे त्याला जराही महत्त्व न देता त्याची उपेक्षा केली किंवा दुर्लक्ष केलं.

क्षण हा क्षण असतो. तो प्रत्यक्षात किती मोठा असतो याने काही फरक पडत नाही. क्षणाचे महत्त्व हे त्या त्या व्यक्तीनुसार ठरतं, समाज ते ठरवू शकत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की या अशा तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगणारी ही तत्वज्ञ कोण आहे, तिची गोष्ट काय आहे ? माझी कहाणी तर निराळी आहे.

पीडितांना आशेचा किरण दाखवणारी 'राजदूत '  प्रज्ञा

पीडितांना आशेचा किरण दाखवणारी 'राजदूत ' प्रज्ञा


माझ्या जीवनाला कलाटणी देऊ शकतील अशा पुष्कळ घटना मी पाहिल्या आहेत, अर्थात खरी घटना घडेपर्यंतच्या. किशोरवयीन असताना मी एकदा लोकलनं प्रवास करत होते. त्यावेळी माझ्या नाकाला दगड लागला आणि माझं नाक फुटलं. या घटनेमुळं माझं जीवन बदलून गेलं असतं. किंवा करीअर मध्ये पॅशन शोधणं, आणि मी ओळखत असलेल्या एका छानशा मुलासोबत लग्न करणं – या सगळ्या घटना एखाद्या मुलीचं जीवन बदलून टाकणा-या अशाच आहेत. पण मला इथं हे सांगायचं आहे, की या घटनांपैकी कोणत्याही घटनेची तुलना त्या दुर्दैवी दिवसाशी होऊ शकणार नाही. तो दिवसही तसाच होता आणि ती घटनाही तशीच होती. त्या दिवशी एक अनोळखी व्यक्ती अचानक माझ्यासमोर आली आणि सूड घ्यायला यावं तसं त्या व्यक्तीनं माझ्यावर अॅसिड फेकलं.

माझ्या विद्रूप झालेल्या चेह-यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या सतत केलेल्या शस्त्रक्रियांमुळं, असह्य वेदना आणि मानसिक संताप सहन करत राहिल्यामुळं माझ्यात जगण्याचं धाडस आलं, असं मी म्हणू शकते. पण, फक्त याच कारणामुळे मला शांती लाभली असं मला खरंच वाटत नाही. ती शांती आणि ते जगण्याचं बळ मला माझ्या आतून मिळालं; देवानं मला नंतर दिलेल्या अमूल्य अशा भेटीतून मिळालं. त्या अमूल्य भेटी म्हणजे माझ्या दोन मुली. ही अमानुष घटना घडल्यानंतर पुढे जेव्हा मी दोन मुलींना जन्म दिला, त्या दोन घटनांनी आणि पर्यायानं माझ्या आई होण्याच्या आनंदानं मला कायमचं बदलून टाकलं. माझ्यात जगण्याची आशा निर्माण झाली आणि एक चैतन्य जागृत झालं.

माझ्या स्वप्नात, मी माझा पुर्वीचा चेहरा आरशात पाहते – आरशात माझ्या चेह-यावरची मुरमं आणि ऊनामुळं काळवंडलेला चेहरा बघून मी घाबरले. ही मुरमं निघून जावीत आणि चेहरा उजळ व्हावा म्हणून मी चेह-यावर किती प्रयोग करायची! पण आता मी सौंदर्यप्रसाधनांसोबत झगडत नाही. मी आता साधी दिसावी म्हणून झगडते.... आयब्रो शिवाय, हेअरलाईन न वापरता ... मी कशी दिसू शकते ? लोक सर्रास नेहमी मला न्याहाळण्यासाठी मागे वळून माझ्याकडं पाहत बसतात. मुलं घाबरून ओरडतात. काही मुलं त्यांच्या आयांना विचारतात, की या बाईला काय झालय म्हणून. काही मला पाहण्यासाठी माझ्या मागे मागे येतात, काही मला टाळतात. माझ्या शेजारी राहणारी एक लहानगी एकदा म्हणाली की, "माझ्याकडं पाहिलं की तिला तिरस्कार वाटतो. ती म्हणाली की तिला माझा चेहरा, माझे डोळे, माझे हात आवडत नाहीत...ती म्हणाली मी “घाणेरडी आहे.” जर तुम्ही मला विचारलं, की माझ्या आयुष्याला खरा अर्थ देणारा क्षण कोणता; माझं उत्तर वरच्या पैकी काहीही नसेल. मी अभिमानानं हे कबूल करेन की, जेव्हा माझ्या आयुष्याचा ताबा मी घेतला तो क्षण माझ्या आयुष्याला खरा अर्थ देणारा क्षण आहे. जसा मी आत्मविश्वास आणि धैर्य मिळवलं, त्यानंतर मला वाटतं की माझ्या बाबतीत माझ्या संमतीशिवाय जे काही घडतं, आणि जे बदलणं माझ्या शक्तीपलिकडलं असतं, असं काहीही माझं आयुष्य ठरवू शकत नाही. माझी शांती म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटना स्वीकारणं, आणि त्या नष्ट होऊ देणं, त्यानंतर त्यांच्या जागी मी माझ्यासाठी घडवत असलेल्या नव्या घटनांना जागा देणं हे होय.

ही जाणीव माझ्या चेह-यावर तुफान वेगानं आदळली आणि रक्त जसं धमन्यांमध्ये सरसर सरसर पसरतं, त्याप्रमाणे माझ्या नसानसांमधून ती रक्तासारखी पसरत गेली. होय, मी माझ्या आयुष्यात खूप काही भोगलय, आणि हो, हे असं का याची मला काही कल्पना नाही, पण असं असलं तरी काय ? या घटना, हा हल्ला, त्याचे परिणाम आणि जे जे काही नंतर घडलं ते सगळं माझ्या हातात कधीच नव्हतं, त्याबाबत मला काहीही करता आलं नसतं किंवा मला काहीही बदलता आलं नसतं, पण आता जे काही मी करते, तो माझा निर्णय असतो, खरोखर तो एक नरक आहे, वाटतो त्याहून खूपच कठीण... पण त्याची माझ्याशी गाठ आहे, माझं काळीज सुद्धा पोलादासारखं कठीण आहे, पिघळून जाणारं नाही. हो, पण मला शूर काळजाची अजिबातच म्हणू नका, कारण काहीही दयामाया नसलेल्या बिनकाळजाच्या माणसांनी माझं आयुष्य उद्धस्त करण्याचा प्रयत्न केला. निष्फळ प्रयत्न...

मला दयेची गरज नाही, मला आधाराची गरज आहे. मी कदाचित माझ्या आयुष्यातली काही मौल्यवान वर्षं, माझं आरोग्य मी वाया घालवलं असेनही, पण मी माझी ओळख, माझं व्यक्तिमत्व आणि माझी स्वप्नं मुळीच गमावलेली नाहीत. ना मी; लढत रहा, असं म्हणणारं आत्मबळ गमावलय, ना स्वत:च्या प्रिय व्यक्तींना जवळ राखणारं माझं प्रेम. आजीवन फाऊंडेशनच्या संदर्भात माझी कर्तव्यपूर्ती आणि मी दिलेलं योगदान या गोष्टीचा मला अभिमान आहे. “ मी बळी नाही, मी आशेची राजदूत आहे!”

"आता, या क्षणाला, ज्यांना माझ्या मदतीची गरज आहे अशांसाठी मला लढायचं आहे.” लोकांमध्ये दोन दृष्टीकोण असतात, काहीं लोक जीवनाकडं जुगारासारखे पाहतात, तर दुस-या प्रकारचे लोक जीवन म्हणजे उपकार असल्यासारखे जगतात. आणि मी नेहमी पेला अर्धा भरला आहे असं बघायला शिकलेली आहे, याची मीच जिवंत पुरावा आहे. जे माझ्या बाबतीत घडले, ती मी नव्हे, हा चेहरा म्हणजे मी नव्हे, मी म्हणजे मी ज्याने बनले आहे ती आहे. मी गोड शेवट असलेली कथा आहे.