या १०६ वर्षांच्या आंध्रप्रदेशमधील मस्तानअम्मा यांना भेटा; भारतातील सर्वात ज्येष्ठ ‘यू ट्यूबर’ !

0

सध्याच्या काळात इंटरनेट हे महत्वाचे व्यासपीठ झाले आहे, त्यातून अनेक विद्वानांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना यू ट्यूब सारख्या माध्यमातून व्हिडीओच्या मार्फत सादरीकरणाची संधी मिळाली आहे. गॅझेट रिव्ह्यूज्, पाक कला वर्ग, विनोद, आणि नानाविध कलाविष्कारांना यू ट्यूबच्या माध्यमातून मंच मिळाला आहे. आंध्रप्रदेशातील १०६ वर्षांच्या मस्तानअम्मा सध्या इंटरनेटवर लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या सर्वात जेष्ठ यू ट्यूबर ठरल्या असल्याचे बोलले जात आहे.


Image source: YouTube
Image source: YouTube

या बाबतच्या वृत्ता नुसार मस्तानअम्मा यांचा यू ट्यूब वर राबता असतो, ज्याचे संयोजन त्यांचा नातू करतो. जेथे त्या पाक कला साकारताना दिसतात, त्यात त्या लोकप्रिय आंध्र प्रदेशातील वैविध्यपूर्ण स्वादांच्या व्यंजनाची कृती समजावून देतात. त्यांची वाहिनी ‘कंट्री फूडस’चे सध्या अडिच लाख दर्शक आहेत.

आंध्र प्रदेशातील मुळच्या क्रिष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील, मस्तानअम्मा यांना मुळातच त्यांच्या स्वत:च्या पाककृती करून पाहण्याची हौस आहे. सारे काही त्याच करणार, कुणाची मदत नाही, नव्या पिढीची किंवा कुटूंबातील कुणाचीही. सा-यांना त्या पारंपारिक भारतीय आज्जी सारख्या वागणूक देण्यासाठी प्रसिध्द आहेत, जे येतील ते पोटभर खावूनच जाणार! त्यांचा पहिला फॅन आहे त्यांचा नातू, के लक्ष्मण, ज्यांना ही यू ट्यूबवर वाहिनी सुरू करण्याची कल्पना सूचली. जेंव्हा त्यांनी स्वत:साठी आणि मित्रांसाठी एकदा जेवण बनविले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “ एका भुकेल्या रात्री माझे मित्र आणि मी आमच्यासाठी जेवण बनविले, आणि आम्हाला यू ट्यूब चॅनेल सूरु कण्याची कल्पना सूचली. त्यातून लोकांना पाहून जेवण बनवण्याची कला शिकता यावी. आमचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला तोही आश्चर्यकारकपणे, त्या नंतर मी ही वाहिनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातून लोकांना पारंपारिक पाककृती कशा कराव्या ते समजावे आणि त्यांनी ताजे पदार्थ स्वत: तयार करून खावे, यासाठी मी माझ्या आज्जीची मदत घेतली. तिला काहीच समजत नव्हते ज्यावेळी आम्ही याचे चित्रीकरण केले, पण ज्यावेळी तिला हे सारे समजले तिला खूप आनंद झाला.”

ही महिला एग डोसा आणि सीफूड करण्यात पारंगत आहे, आणि त्या अभिमानाने सांगतात की गावात त्यांच्या हातचे पदार्थ खायला सा-यांना आवडते. यातून हेच पहायला मिळते की कोणत्याही चांगल्या गोष्टी सुरू करण्याची वेळ नसते, मग त्या कितीही नाविन्यपूर्ण आणि चमत्कृतीपूर्ण का असेनात. (थिंक चेंज इंडिया)