इंग्लंडमध्ये जन्मलेल्या 'अॅनी फेरर' करत आहे भारतातल्या दुष्काळी भागातल्या लोकांची सेवा

इंग्लंडमध्ये  जन्मलेल्या 'अॅनी फेरर' करत आहे भारतातल्या दुष्काळी भागातल्या लोकांची सेवा

Tuesday May 17, 2016,

5 min Read

इंग्लंडमध्ये जन्मलेल्या अॅनी फेरर यांनी मुंबई मध्ये येऊन पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. विन्सेंट फेरर यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर हे दोघे पती-पत्नी आंध्रप्रदेशच्या अनंतपुरम या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात जाऊन स्थायिक झाले. त्यांचे उद्दीष्ट एकच होते, भारतातल्या गरीब गरजू लोकांची सेवा करणे. याच उद्देशाने त्यांनी १९६९ मध्ये रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टची (RDT) स्थापना केली.

अॅनी फेरर या गेल्या चार दशकापासून जास्त काळ अनंतपुरम जिल्यात समाजसेवा करत आहे. तिथली स्थानिक भाषाही त्यांनी आत्मसात केली आहे. आपल्या संस्थेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी त्या सातत्याने झटत आहे. महिला सबलीकरण आणि मुलांच्या विकासाचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे गरीब आणि गरजूंना मदत करणे, कर्तव्यापेक्षा अधिक कार्य करणे, कार्य सर्वोत्तम असण्याचे ध्येय आणि जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त गरिबांपर्यंत पोहोचणे.

अॅनी फेरर, सामाजिक कार्यकर्त्या

अॅनी फेरर, सामाजिक कार्यकर्त्या


रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या स्थापनेपासूनच आंध्रप्रदेश आणि आत्ताचे विभाजित झालेले तेलंगणा इथल्या सहा जिल्ह्यात अनंतपुरम, कुर्नुल, गुंटूर, प्रकाशम, महबुबनगर आणि नलगोंडा या जिल्ह्यातल्या ३,२९१ गावातल्या भटक्या विमुक्त, अनुसूचित जातीजमाती, विकलांग तसेच दुर्बल घटकातील लोकांचा विकास यावर या संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. २०१० साली नल्लमाला वनक्षेत्रातील २५८ गावात १०,२८१ कुटुंबातील ३९,०८४ सदस्यांना रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत संपूर्ण विकास कार्यक्रमात सामील केले आहे. जेणेकरून त्यांना आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून सन्मानाचे आयुष्य जगता येईल.

गावातील समुदाय विकास समितींना जागरूकता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा तसेच त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संवेदनशील आणि सशक्त बनवले जाते.

image


रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा :

सर्वोत्तम आरोग्य सेवा : रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टने तीन सामान्य रुग्णालय आणि एक संक्रमक रोग रुग्णालय स्थापन केले आहे. ग्रामीण चिकित्सालयाची संख्या १७ आहे. या रुग्णालयात १०५ डॉक्टर आणि आवश्यकतेनुसार घरगुती सेवा पुरवणारे १५ डॉक्टर आहेत. रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जवळजवळ प्रत्येक गावात स्थानिक महिलांसाठी आरोग्यविषयक काम करणाऱ्या कार्यकर्त्याना सामुदायिक प्रशिक्षण दिले आहे. सुरक्षित प्रसूती प्रकल्पाचे ध्येय हे प्रसुतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर सेवा पुरवणे, ज्यामध्ये बाळंतीण बाईची संपूर्ण काळजी घेतली जाते. अशा प्रकारच्या आरोग्यसेवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जातात. सामान्य आरोग्य कार्यकर्त्यांपासून आपत्कालीन सेवा प्रदान करणाऱ्या नर्स, स्टाफ नर्स आणि डॉक्टरपर्यंत रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या रुग्णालयात दरवर्षी १३,३३० पेक्षा अधिक प्रसूती केल्या जातात.


image


एचआयव्हीबाधित महिलेपासून बाळाला बाधा होऊ नये म्हणून अॅनी फेरर यांनी ‘ प्रिवेन्शन ऑफ मदर टू चाईल्ड ट्रान्समिशन ऑफ एचआयव्ही’ ही योजना हाती घेतली आहे. रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारे पुरवल्या जाणाऱ्या आरोग्यसेवामध्ये महिला आणि मुलींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. महिलांशी संबंधित आवश्यक आरोग्य मार्गदर्शन, पौष्टिक आहार तसेच महिलांसाठी असलेल्या महिला कौटुंबिक अत्याचार किंवा मानसिक छळाला बळी पडू नये म्हणून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते. बाहेरगावातून आलेल्या, वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडलेल्या गरीब महिलांसाठी मार्गदर्शन, आरोग्यसेवा आणि मदत करण्यासाठी समुपदेशन केंद्र कार्यरत आहे.

या क्षेत्रात १,५५३ पौष्टिक आहार केंद्र आहे, ज्यामार्फत चार वर्षाच्या मुलांपर्यंत ३०,००० हून अधिक बालकांना पौष्टिक आहार पुरवला जातो. साल २०१४-२०१५मध्ये ७,३८,०००हून अधिक बाह्यरुग्णांनी तर ५६,०००हून अधिक रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट रुग्णालयाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या अन्त्तर्गत रुग्णसेवेचा लाभ घेतला आहे.

image


सामाजिक शिक्षण प्रणाली

रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट २,८०१ गावातील ३,०२८ वाढीव शाळेसाठी स्वतंत्र व्यवस्थापन आणि निरीक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समुदाय विकास समितीच्या सदस्यांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध केल्या जातात. ज्यामध्ये खालील प्रकारच्या सेवेचा समावेश आहे.

मागास, भटक्या विमुक्त जमातीतल्या मुलांसाठी अतिरिक्त कोचिंग, १६,००० शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी सायकली दिल्या गेल्या, जेणेकरून करून त्यांना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. शाळेत जाण्यासाठी वह्या-पुस्तक, गणवेश तसेच आवश्यक सेवा पुरवल्या जातात.

उत्तम शैक्षणिक सुविधा : २००४ -२०१५ मध्ये विशेष योग्यताप्राप्त २,५६६ विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये १,१४५ मुलींचा समावेश आहे. शैक्षणिक विशेष शिष्यवृत्ती योजनेमार्फत महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर मेडिकल, इंजिनिअरिंग यासारख्या विषयांच्या शिक्षणासाठी नामांकीत केले जाते. साल २०१४-१५ मध्ये एकूण ४७,३६१ विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शिक्षणासाठी निधी देण्यात आला.

image


ग्रामीण मुलांच्या विकासासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याविषयाची एन फेरर पुरेपूर काळजी घेतात. इथल्या हॉकी अकादमीतून ६० हून अधिक ग्रामीण विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. रफा नडाल फाऊंन्डेशनच्या सहयोगाने १०४ मुले आणि ६८ मुलींना टेनिस, कॉम्पुटर आणि इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे.

युवा विकास

रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या ‘प्रोफेशनल स्कूल फॉर फॉरेन लॅग्वेज’ बाजारातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्याच्या हेतूने मुलामुलींना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन तसेच स्पॅनिश भाषेंचे प्रशिक्षण दिले जाते. रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे स्वयंसेवक परदेशात्तून येऊन या भाषेचे ज्ञान देतात. मुलांच्या विकासासाठी कॉम्पुटर प्रयोगशाळा सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ९८ टक्केपेक्षा जास्त विद्यार्थांना शहरी भागात चांगल्या वेतनाच्या नोकऱ्या मिळतात.

विशेष मुलांची काळजी

अपंग मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, ज्यामार्फत त्यांचे पुनर्वसन केले जाते. या व्यतिरिक्त मानसिक विकलांग मुलांना राहण्याची सुविधा, शिक्षण आणि आरोग्यसुविधा उपलब्ध केली जाते. त्याचबरोबर विकलांग सहायता, सामान्य चिकित्सेबरोबरच गरीब अपंग मुलांचे पुनर्वसन संस्थेमार्फत केले जाते. अनाथ, शारिरीक शोषण आणि एचआयव्हीबाधित मुलांसाठी विशेष केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत १२०० पेक्षा अधिक अपंग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केले जात आहे.

ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी १९८२मध्ये एन फेरर यांनी विशिष्ट महिला मंडळाची स्थापना केली. ज्यामाध्यामातून गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आरोग्यसेवा आणि मार्गदर्शन केंद्र स्थापन केले. ग्रामीण महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन केले.

पुरस्कार आणि प्रकाशन

अॅनी फेरर यांना त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. मानवतावादी सेवेसाठी भारतातल्या स्पॅनिश दूतावासद्वारे सन्मानित करण्यात आले. डॉ. पिन्नामानेनी, श्रीमती सीतादेवी फांऊडेशन, विजयवाडा ग्राम पुरस्कार, ग्रामविकासासाठी आंध्रप्रदेश प्रदेश सरकारद्वारे उगादी पुरस्कार, महिला आणि बालकल्याण क्षेत्रात भरीव योगदानासाठी २०१५ चा जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. एन व विन्सेंट फेरर यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित पुस्तक ‘ एक्सेप्ट ए मिरॅकल अॅन्ड लाॅटस ऑफ हाई वर्कचं प्रकाशन करण्यात आलं आहे.

सौजन्य : जमनालाल बजाज फाऊंडेशन

वेबसाईट : http://www.jamnalalbajajfoundation.org/

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी चार दशकांपासून घेतलाय भारताला स्वच्छ करण्याचा वसा 

दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव

दशरथ मांझी...पहाडाला हरवणारा माणूस !


    Share on
    close