चीनच्या ग्रीन टी संस्कृतीपासून प्रेरणा घेत दोन मित्रांनी सुरु केलं ‘Healthy World’ स्टार्ट अप

0

आरोग्यदायी उत्पादनांबद्दल श्रीजीत आणि पुरु यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. आरोग्यदायी उत्पादनांची मागणी ‘गरज’ आहे म्हणून नाही तर ‘पाहिजे’ आहे म्हणून वाढली आहे. आरोग्याविषयी लोकांमध्ये वाढलेली जागरुकता, वाढलेलं उत्पन्न आणि नवीन सरकारी मार्गदर्शक या सगळ्यांमुळे पोषक खाद्यपदार्थांबद्दल मागणी वाढली आहे.

२५ नोव्हेंबर २०१५

मेड इन चायना हे लेबल पाहिलं की स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तु डोळ्यासमोर येतात पण श्रीजीत मुलाइल आणि पुरू गुप्ता यांना ‘हेल्दीवर्ल्ड’ स्टार्टअप सुरू करण्यासाठी हाच मंत्र एक प्रेरणा ठरलाय. तर हेल्दीवर्ल्डच्या आरोग्यदायी खाद्यपदार्थ ब्रँड म्हणजे ट्रू एलिमेंट्स ( True Elements)साठीही ते फायद्याचं ठरलंय. देशाच्या विविध भागातून ट्रू एलिमेंट्सचे कच्चे पदार्थ मिळवले जातात. चायनीज ग्रीन टीची कल्पना सगळ्यांनाच आवडली.

या कंपनीची स्वत:ची ३० पेक्षाही जास्त उत्पादनं आहेत. यामध्ये नाश्त्यासाठी सिरीयल्स, चहा, खाद्यपदार्थ आणि काही आरोग्यदायी उत्पादनांचा समावेश आहे. हेल्दीवर्ल्डतर्फे ३००० पेक्षाही जास्त उत्पादनांचा प्रसार केला जातो आणि ग्राहकांमध्ये पोषक आहाराबदद्ल जागरुकता निर्माण केली जाते.


हेल्दीवर्ल्डची टीम
हेल्दीवर्ल्डची टीम

आहाराची योग्य काळजी घेतली तर अनेक आजार लवकर बरे होऊ शकतात, हेच जाणून त्यांनी काही पोषक खाद्यपदार्थ तयार केले. आरोग्यविषयक उपाययोजना आणि त्यांची प्रात्यक्षिकं यामुळे पोषक पदार्थांची मागणी वाढल्याचंही त्यांना आढळलं. त्यामुळे त्यांनी दिल्लीत आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या विक्रीसाखळी सुरु केली.

पण ग्राहकांशी चांगले जोडले गेलेले संबंध हे त्यांचं बलस्थान असल्याचं लवकरच त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी हेल्दीवर्ल्ड २०१४ हे त्यांचं इ-कॉमर्स व्यासपीठ सुरु केलं आणि त्याचबरोबर २०१५ मध्ये त्यांनी ट्रू एलिमेंट्सही सुरु केलं.

यामुळे लोकांना आरोग्यदायी अन्न ओळखण्यासाठी मदत व्हायला लागली. तसंच ते पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याचाही सोय झाली. योग्य आणि पोषक आहारामुळे अनेक आजार दूर ठेवले जाऊ शकतात किंवा त्यांचे होणारे परिणाम कमी होऊ शकतात असंही पुरु सांगतात.

________________________________________

हेही वाचा – तुमचं खाणं आरोग्यदायी बनवण्यासाठी दोन बहिणींची ‘योगा-बार्स’ मोहीम

http://marathi.yourstory.com/read/e8a7ffc857/yoga-snacks-in-the-bar-potoba-pleased-dokobahi-cool-

________________________________________

हेल्दीफूड हे एप्रिल २०१५ पासून म्हणजेच स्थापनेपासूनच एमेझॉन आणि जवळपास सर्वच ऑनलाईन किराणा दुकानांचे महत्त्वाचे वितरक बनले, असं पुरु यांनी सांगितलं. त्यांची ऑफलाईन कार्यालयं फक्त पुणे आणि मुंबईतच आहेत. या दोन्ही शहरांत महत्त्वाच्या दुकानांमध्ये वितरण वाढवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये हेल्दीवर्ल्डनॉला त्यांच्या गुंतवणकदारांकडून १ लाख ५० हजार डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. त्यावेळेस ते त्यांच्या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून दर महिना ३ ते ४ लाख रुपयांचा व्यवसाय करत होते आणि आता मार्च २०१६ पर्यंत ते त्यांचा व्यवसाय एक कोटींपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गावर आहेत. तसंच येत्या काही महिन्यांत ए सीरीज काढण्याच्याही विचारात असल्याचं पुरु यांनी सांगितलं.

आता ग्राहकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित व्यासपीठ बनविण्यावर कंपनीचं काम सुरु आहे. आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर अमेरिकेत आरोग्यदायी आहाराची बाजारपेठ विशेषत: अन्नधआन्य किंवा उर्जा देणाऱ्या आणि पोषक पदार्थांची बाजारपेठ २०१६ पर्यंत ८.३ अब्जापर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

त्यांचे राईट बाईट आणि नेचर्स व्हॅल्यू हे ब्रँड्सही लोकप्रिय होत आहेत. २००५-२००६मध्ये ही संकल्पना भारतात कोणालाही माहित नव्हती तेव्हा त्यांचे हे ब्रँड्स सुरू झाले होते. तंदुरुस्तीसाठीच्या साधनांची भारतातील बाजारपेठ वेगानं वाढत आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीच्या साधनांच्या शोधात असतात.

Website : healthyworld.in


लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद- सचिन जोशी