या महिला आयआरएस अधिका-याला भेटा, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत अव्वल कामगिरी केली!

0

बंगळुरूपासून सुमारे शंभर किमी दूरवर कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील केंबोडी गावच्या नंदिनी के आर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात या आय आर एस अधिका-यांने उल्लेखनिय यश संपादन केले आहे. योगायोगाने नंदिनी या दक्षिणेच्या राज्यातून येणा-या दुस-या महिला ठरल्या आहेत ज्यांनी यूपीएससी मध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे, या पूर्वी २००१मध्ये विजयलक्ष्मी बिद्री यांनी असे यश मिळवले होते.


नंदिनी ज्या सध्या भारतीय महसूल सेवेत आहेत, प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयात काम करतात. त्या म्हणाल्या, “ २०१४मध्ये सर्वप्रथम युपीएससीच्या परिक्षेला बसले, आणि २०१५मध्ये आयआरएस श्रेणीत माझी निवड झाली. मी त्यासाठी फरिदाबाद येथे प्रशिक्षणासाठी गेले होते.”

बंगळूरू येथील एमएस रामय्या तंत्रशिक्षण संस्था येथून नागरी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या नंदिनी या त्यांच्या वर्गातील सुवर्णपदक विजेत्या होत्या. त्यांनी कन्नड माध्यमातून थिमय्या विद्यालय कोलार येथून शिक्षण पूर्ण केले आणि महाविद्यालय पूर्वकालीन शिक्षण दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील मोडाबिद्री येथील अल्वा महाविद्यालयातून घेतले. पदवी शिक्षणानंतर त्यांनी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातही दोन वर्ष सहायक अभियंता म्हणून काम केले.

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “ मला आयएएस मध्ये जायचे होते आणि आयएफएस मध्ये नाही. जसे की मला भारतात राहून लोकांची सेवा करायची आहे. जे आव्हानात्मक आहे, ज्यात मला नवे शिकण्याची संधी आहे आणि लोकसेवा देखील घडणार आहे”.

तीन भावंडात सर्वात मोठ्या असलेल्या त्यांनी नेहमी कठोर परिश्रम घेतले असे त्यांचे वडील म्हणाले. “ मला माझ्या मुलीच्या यशा बाबत खात्रीच होती, कारण ज्या समर्पण भावनेने ती मेहनत घेत होती ते पाहताना बालपणापासून मी हे अनुभवले आहे.” रमेश सहायक शाळा शिक्षक जे सरकारी हायस्कूल मध्ये आहेत ते म्हणाले की, “ स्थानिक शाळेतून तिच्या आईने शिक्षिकेची नोकरी सोडली ती केवळ मुलांचे संगोपन-शिक्षण नीट करता यावे यासाठीच, तिच्या त्यागाचे आज फळ मिळाले आहे ज्यामुळे कुटूंबात यश आले आहे.”

नंदिनी यांच्या खालोखाल अनमोल शेर सिंग बेदी आणि गोपाळकृष्ण रौनकी यांना दुस-या आणि तिस-या क्रमांकाची श्रेणी यूपीएससी परिक्षेत मिळाली आहे. एकूण १,०९९ जणाची शिफारस नियुक्तीसाठी झाली होती, ज्यातील केवळ १७२ जण त्यात यश मिळवू शकले आहेत असे याबाबतच्या वृतात म्हटले आहे.