नाझीर अहमद, रिक्षाचालक ज्यांनी गणेश मूर्ती आणण्यासाठी भाविकांना विनामुल्य सेवा दिली आहे!

0

इस्लामचा पाईक, नाझिर अका नानाजी यांनी धार्मिक सौहार्दाचा नवा वस्तुपाठ घालून देत गणेश मुर्तीच्या आगमनासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते मोफत रिक्षा सेवा देत आहेत.

“नाम अनेक है पर भगवान एक है सरजी,” असे हे रिक्षाचालक त्य़ांच्या प्रवाश्यांना सांगतात जे त्यांचा रिक्षाचा व्यवसाय जवळच्या बाजारपेठ परिसरात करतात. सफेद धोतर परिधान करून आणि हातात गणेश मुर्ती घेवून हे प्रवासी मागील सिटवर बसलेले असतात. सोबत पुजाविधीची सामुग्री असते, या रिक्षात ते आनंदाने बसतात आणि रिक्षाचालकाला मनापासून धन्यवाद देतात. अशाप्रकारचे दृश्य गणपतीच्या आगमनप्रसंगी अनेकदा पहायला मिळते आणि ती रिक्षा असते नाझिर अहमद एम कुरेशी अका नानाजी यांची!

इस्लामचे पाईक असलेले ‘नानाजी’ यांनी सामाजिक सौहार्दाची नवी व्याख्या आचरणात आणली आहे, त्यांनी गणेशमुर्ती घेवून येणा-यांना मोफत रिक्षासेवा गेल्या दोन वर्षापासून देऊ केली आहे. त्यांचे फोटो काढले जात आहेत आणि मुलाखत घेतली जात आहे हे समजल्यानंतर त्यापासून दूर जात त्यांनी सांगितले की, “ हा सण साजरा करण्याची ही माझी पध्दत आहे, मला वाटत नाही की, मी खूप मोठे काही करतो आहे. मला प्रसिध्दीसाठी हे काही नको आहे. त्यामुळे मला प्रसिध्दी देवू नका” असे नानाजी म्हणाले.

आपल्याच मार्गाने कर्नाटक मधील धारवाड येथे ४०वर्षांच्या या व्यक्तीचा रिक्षाचालवून उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय आहे. येथे नानाजी त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. हैद्राबाद मध्ये ते लहानाचे मोठे झाले तेच मुळी सय्यद हुसैन तवाकली यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांनी नेहमी धार्मिक सौहार्दाची शिकवण दिली. तवाकली यांना गरजूंना मदत करण्यात विश्वास होता, त्याचा प्रभाव नानाजी यांच्या मनावर झाला. ज्यावेळी ते त्यांच्या लग्नानंतर हैद्राबाद येथून धारवाड येथे गेले, त्यावेळी या नितीमुल्यांना देखील त्यांनी सोबत नेले आणि आचरणात आणले.


मिटर डाऊन !

धारवाडमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी जाताना रिक्षा मिटरने चालविली जात नाही त्याचा फायदा घेत अनेक रिक्षाचालक वाटेल त्या किमती सणासुदीला सांगतात. हा खर्च टाळण्यासाठी बरेच लोक ‘शेअर रिक्षा’चा पर्याय निवडतात आणि भाडे विभागून देतात. शहरातील लोक ऐरवी बस किंवा टेंम्पोचा वापर सर्रास पणे प्रवासासाठी करतात.

त्यामुळेच नानाजींच्या या रिक्षाची फेरी स्वस्त असते, खूपच आग्रह झाला तर ते दहा रूपये घेतात. त्यांच्या नेहमीच्या प्रवाश्यांबाबत ते सांगतात की, “ माझा भर त्यावर असतो की त्यांना मदत करवी जे रोज माझ्या रिक्षातून येतात. मी त्यांना रोज भेटतो आणि धारवाडमध्ये काही रिक्षाचालक त्यांना वाटेल तेवढे भाडे सांगतात. त्यामुळे त्यांना अनेकदा वाहनाची वाट पहात उन्हात देखील उभे रहावे लागते. त्यावेळी त्यांना चालत जाण्याचे बळ नसते आणि उन्हात उभे राहण्याचा धीर नसतो.”


नानाजींचा दिवस सुरू होतो सकाळी सात वाजता आणि ते त्यांच्या पायावर सायंकाळी सातपर्यंत उभे राहतात. त्यांच्या बहुतांश प्रवाश्यांकडे स्पिड डायल मध्ये त्यांचा क्रमांक असतो. “ जरी ती लहान मुले असली, किंवा ज्येष्ट लोक असले, मी सा-यांना घेवून जातो आणि आणतो.”

नानाजी म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीला दिवसातून दोनदा भोजन, रहायला घर आणि खर्चासाठी थोडे पैसे असले की झाले त्यानंतर त्याने इतरांना मदत करण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या या कामात त्यांच्या कुटूंबियांच्या सहभागाबाबत बोलताना ते म्हणाले की, “ मी दर्जेदार शिक्षणावर नेहमी विश्वास ठेवतो. आम्ही नशिबवान आहोत कारण सरकारच्या सर्वाना सक्तिचे शिक्षण या योजनेखाली माझ्या दोन मुलांना धारवाडच्या चांगल्या शाळेत मोफत शिक्षण मिळत आहे. माझी मुलगी जी खूप हुशार आहे, तिने उर्दू शाळेत प्रवेश घेतला आहे आणि ती इंग्रजी देखील शिकते. आमच्या समाजात, स्त्रिया याच ख-या भक्कम आधारस्तंभ असतात त्यामुळा आम्ही तिला उर्दू शिकवत आहोत आणि आमच्या श्रध्दा ज्या आहेत त्या तिला सुरूवातीपासून देण्याचा प्रयत्न करतो आहोत.”

प्रत्येक सणात सहभाग

गणपती बाप्पांच्या आगमनापासून २१दिवस धारवाड मध्ये घरोघरी नानाजी त्यांच्या सेवा मनापासून देत असतात. केवळ याच वेळी असे नाही तर नेहमीच ते अशा सेवा देतात. जसे की, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस.  नानाजी शाळेच्या मुलांना प्राधान्य देतात  ज्यांना शाळेला जायची घाई असते.

लोकांच्या सेवेमध्ये त्यांना एका प्रकारे मानसिक समाधान मिळते, ज्यावेळी ते गरजू लोकांना मदत करतात असे ते सांगतात. धारवाड मध्ये त्यामुळेच नानाजींच्या या कामाने बरेच लोक त्यांना धन्यवाद देतात, मात्र त्यांच्या सोबत काम करणारे रिक्षाचालक मात्र त्यामुळे त्यांच्यावर काहीसे नाखूश असतात.

“ या भागातील बाकीचे रिक्षाचालक मला मारायला येतात, ज्यावेळी मी माझी रिक्षा त्यांच्या स्टॅण्डजवळ लावायला येतो. त्यामुळे मला तेथे अनेकदा भाडे घेवू दिले जात नाही मात्र मला माझे ग्राहक रस्त्याने जाताना भेटतात.”

धर्माच्या पलिकडे जावून गरजूना मदत करणारे नानाजी हे आमच्या देशाच्या धार्मिक अनेकतेमध्ये असलेल्या एकतेचे प्रतिक आहेत, जे आम्ही एक आहोत हा संदेश आपल्या कृतीमधून देतात जी दिसायला साधी सरळ मात्र त्यातून खूप मोठा आदर्श ते निर्माण करतात नाही का?!

लेखिका - श्रुथी मोहन