‘हार्ले’ च्या महिला मोटर सायकल स्वारची भारत परिक्रमा 

0

भारतामधील हार्ले ओनर्स ग्रुपच्या महिला पहिल्या वहिल्या अधिकृत मोटर सायकल स्वार कर्नाटकच्या दांडेली येथून निघाल्या आहेत. पन्नास जणींच्या या चमूत पुण्यापासून अहमदाबाद पर्यंतच्या महिला सहभागी आहेत.

या कार्यक्रमात भरगच्च अशा कार्यशाळा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  या स्वारी बाबत बोलताना एलओएच च्या संचालिका सुनिता कुंजीर म्हणाल्या की, “ तुम्ही मोटर सायकल स्वार म्हणून या किंवा प्रवासी म्हणून एलओएच ची बांधिलकी महिला म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देण्याची असेल, जी हार्ले-डेवीसन आणि मोटर सायकलींग म्हणून स्मरणात राहील. असे असले तरी यातील सदस्यांना इतरही अनेक व्यासपीठांवर एकत्र येण्याची संधी आहे, आम्ही पहिली अधिकृत यात्रा सुरू केली आहे, आणि नव्याने मैत्रीच्या अपेक्षा करतो आहोत ”.


चालकांना व्यग्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातील धाडस वाढावे म्हणून हार्ले डेविसनच्या पासपोर्ट टू फ्रिडम च्या या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. हा संभाषणयुक्त कार्यक्रम आहे. ज्यात बायकर्सना प्रोत्साहन देताना त्यांचा आत्मविश्वास वाढवितानाच त्यांच्यातील सूप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न आहे जे त्यांना ज्ञात नाहीत.

एलओएच च्या या कार्यक्रमात सर्वात महत्वाचे काय असेल तर हा कार्यक्रम केवळ लिंगभेदाच्या भावना नष्ट करण्यासाठी नसून वयाच्या बंधनाना देखील झुगारून देणारा आहे. उदाहरण म्हणून सुनिता या ४० वर्षांच्या आहेत ज्यांना दोन मुले आहेत. पल्लवी सिंग संचालिका मार्केटिंग विभाग हार्ले डेविसन इंडिया यांनी सांगितले की, “ मोटरसायकल मध्ये महिला स्वारांची संख्या झपाटयाने वाढते आहे, मी स्वत: मोटर सायकल-स्वार म्हणून थरार अनुभवते जो एलओएच मुळे मला अनुभवता येतो, हे उत्कंठावर्धक आहे की, मोठ्या प्रमाणात महिला परंपरा बाजूला सारत मोटर सायकलवरून रस्त्यांवरून स्वारी करत जात आहेत.”