'केअर अॅट माय होम' : पुन्हा दवाखान्याची पायरी नको

0

भारतात ‘होम केअर इंडस्ट्री’चे मूल्य जवळपास २ ते ४ दशलक्ष डॉलर आहे. दरवर्षी त्यात २५ टक्क्यांनी वाढही सुरूच आहे. एका अंदाजित आकडेवारीनुसार २०२५ पर्यंत २० टक्के लोकसंख्याही ज्येष्ठ नागरिकांची असणार आहे. त्यातही ६५ वर्षांवरील लोकांचे प्रमाण ७० टक्के असेल. आयुष्याचा गोरज मुहूर्त म्हटल्यावर, सायंकाळ म्हटल्यावर एकदातरी या वयोगटाला दीर्घकालिन आरोग्यसेवेची गरज भासतेच. भासेलच. अशात आपल्याकडे ‘होम केअर इंडस्ट्री’ विस्कळितच आहे. जेष्ठ नागरिकांसह हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी परतलेल्यांना त्यांच्याच घरी दर्जेदार, अत्युत्कृष्ट आणि ठोस अशी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्यांची यापूर्वी कधीही नव्हती एवढी गरज सध्या आहे... आणि पुढे ती आणखीच वाढणार आहे.

ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘केअर ॲअॅट माय होम’ उपक्रमाची स्थापना सप्टेंबर २०१३ मध्ये करण्यात आली. रुग्णांना घरीच आवश्यक त्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रात ‘केअर ॲअॅट माय होम’ने मोठ्या हिंमतीने एक अत्यंत दमदार पाउल टाकलेले आहे. विशेष म्हणजे ते रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांच्या कसोटीवर विश्वासार्ह ठरते आहे. ‘इन्चार्जर’ म्हणून सेवा उपलब्ध करून देणे... काहीशा अशा स्वरूपात ‘केअर अॅट माय होम’ने कामाला सुरवात केली. ‘केअर ॲअॅट होम’चे हे एक आगळे ‘होम केअर मॉडेल’ आहे. उदाहरणार्थ रुग्णसेवेलाच पुढल्या काळासाठी रुग्णालयातून रुग्णाच्या थेट घरी नेणे. म्हणजे रुग्ण चार दिवस हॉस्पिटलमध्ये ॲअॅडमिट आहे. आता त्याच्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची खरं तर गरज नाही, पण तरीही काही गोष्टी अजून राहिलेल्या आहेत आणि त्या रुग्णासाठी त्याच्या घरी कुणी करू शकत नाही म्हणून त्याला रुग्णालयातच ठेवावे लागत आहे. अशा परिस्थितीत उर्वरित सेवा रुग्णाला रुग्णाच्या घरी उपलब्ध करून देण्याचे काम ‘केअर ॲअॅट माय होम’ने केलेले आहे. रुग्णाला परत रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी करणे, हे ‘केअर ॲअॅट माय होम’चे मुख्य उद्दिष्ट आहे. फिजिओथेरेपी, स्पिच थेरेपीसह नर्सिंगची गरज ‘केअर ॲअॅट माय होम’कडून नेमकेपणाने भागवली जाते.

घरीच राहात असलेले रुग्ण, मोठा आजार वा मोठ्या शस्त्रक्रियेनंतर दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण आणि दैनंदिन जीवनात आरोग्यविषयक समस्यांचा सामना करणारे ज्येष्ठ नागरिक हे ‘केअर अॅट माय होम’चे लाभार्थी ग्राहक आहेत. गेल्या दहा महिन्यांतच ‘केअर अॅट माय होम’ने शंभराहून जास्त रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

वेगळा प्रयत्न

सध्या वैद्यकीय सल्ला देणे वगैरे गोष्टींकडे ‘होम केअर’ सुविधांमध्ये अजिबातच लक्ष दिले जात नाही. ‘केअर ॲअॅट माय होम’ आपल्या ‘इंचार्जर’ पद्धतीद्वारे ही उणीव भरून काढते. सेवा अधिक परिणामकारकरित्या देता यावी म्हणून दवाखान्यांतून डिस्चार्ज होण्याच्या मार्गावर असलेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णांशी संवाद साधण्याचाही ‘केअर अॅट माय होम’चा प्रयत्न सध्या चाललेला आहे.

उपचार आणि शस्त्रक्रियेवरच वैद्यकीय तसेच एकुणातील आरोग्य क्षेत्राचा विशेष भर असतो. जगात सगळीकडे हीच परिस्थिती आहे. शस्त्रक्रिया झाली, उपचार झाले पुढे काय? त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. वास्तविक रुग्णाला यानंतरही आयुष्याचा वा परिस्थितीचा सामना करणे जड जात असते. घरी गेल्यानंतर पुढेही काही दिवस त्याला पूरक वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. रुग्णालयातून सुटी दिल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडले जाणेच रुग्णाच्या नेमकेपणाने दुरुस्त होण्यातली मोठी अडचण आहे. ‘केअर ॲअॅट माय होम’ हीच अडचण नेमकेपणाने दूर करण्याचे कार्य करीत आहे.

‘केअर ॲअॅट माय होम’ने जगभरातील विविध ‘होम केअर मॉडेल्स’चा सहा महिने सलग अभ्यास केला. पैकी एका मॉडेलनुसार अपेक्षित इकोसिस्टिम आणि संक्रमणरोधी उपाययोजनांमुळे मोठ्या जोखमीच्या प्रकरणांत रुग्णाचे दुसऱ्यांदा दवाखान्यात दाखल होणे २० टक्क्यांनी कमी झालेले आहे. याच मॉडेलचा स्वीकार करून काही विकसनशिल देशांनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळलेले आहे.

दोघांचा दुग्धशर्करायोग

डॉ. युवराज सिंह आणि प्रणव शिर्के हे ‘केअर ॲअॅट माय’चे अर्ध्वयू आहेत. डॉ. युवराज सिंह हे फिजिओथेरेपिस्ट आहेत. तर प्रणव शिर्के यांनी ‘इंजिनिअरिंग’ आणि ‘मॅनेजमेंट’ केलेले आहे. दोघांचे एकत्र येणे म्हणजे उत्तम आरोग्यसेवेसाठी जणू दुग्धशर्करायोग ठरलेला आहे.

डॉ. सिंह सांगतात, ‘‘आमच्याकडे तरुण आणि प्रतिभावंत केअर मॅनेजर्स, फिजिओथेरेपिस्ट, स्पिच थेरेपिस्ट आणि हेल्थ अटेंडन्टस्‌ची मिळून एक मजबूत टीम आहे. ‘होम केअर’शी निगडित सगळ्यांच्या गरजांचे आणि गोष्टींचे आवश्यक ते प्रशिक्षण या सगळ्यांनी घेतलेले आहे.’’

या व्यवसायातील अनुभव शेअर करताना डॉ. सिंह म्हणतात, ‘‘या व्यवसायाला ग्लॅमर तसे नाहीच. तणाव भरपूर आहे. अनिश्चितता आहे. थोडक्यात फार थोडे लोक यात रमतील वा रमू शकतील, अशा प्रकारची ही सेवा आहे. सतत नवे काहीतरी करणे यात गरजेचे आहे. पण एकुणात हे काम मला तरी रोमहर्षक असेच वाटते.’’

शिर्के सांगतात, ‘‘तुमच्यात कमालीचा संयम या क्षेत्रासाठी असायला हवा. धैर्यही अर्थात असायलाच हवे. एकदम काही सगळे घडत नाही. थोडा वेळ जावाच लागतो. पुन्हा आम्ही जे काही ठरवतो ते सगळे शक्य व्हायलाच हवे, असा अट्टाहासही उपयोगाचा नाही. सहसंस्थापक म्हणून या कामातला आपला उत्साह टिकवून ठेवणे वाटले तेवढे सोपे नव्हते. प्रेरणेची पातळी सतत वर आणि वरच राखणे थोडे अवघड होते, पण नंतर पुढे सगळे अंगवळणी पडले.’’

कदम कदम बढाये जा…

‘केअर ॲअॅट माय होम’ लवकरच मुंबईतील एखाद्या हॉस्पिटलशी संलग्न होण्याची अपेक्षा बाळगून आहे. एका नव्या ‘मोबाईल अॅट’च्या माध्यमातून जगभरातील रुग्णांच्या पुनर्वसनाच्या आवश्यकतेबद्दलही ‘केअर अॅट माय होम’कडून जनजागृती केली जाणार आहे.

असहायतेतून शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलींना चरितार्थाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून ‘केअर ॲअॅट माय होम’ प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देते. सामान्यत: या मुली सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील असतात. फार कमी संधी त्यांच्यासमोर असतात. पर्यायही नसतात. तीन महिन्यांत त्यांना मानव शरीर रचना, स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, रुग्णाची काळजी आणि संवाद कौशल्य याबाबत प्रशिक्षित केले जाते. आरोग्य परिचारिका म्हणून काम करण्यासाठी याद्वारे त्या सक्षम होतात. २० जणींची कारकीर्द घडवण्यात या उपक्रमाला यश आलेले आहे. आता उपक्रमाची तिसरी बॅच सुरू आहे. शिवाय ६० वर्षांवरील लोकांचे आरोग्य, फिटनेस आणि व्यायाम यासंदर्भातले कार्यक्रमही ‘केअर ॲअॅट माय होम’तर्फे आयोजिले गेले आहेत.

रुग्णाच्या, वृद्धांच्या घरगुती काळजीसंदर्भात ‘केअर अॅट माय होम’चा दृष्टिकोन समग्र (सर्व प्रकारे निगा) आहेच, त्यासह कल्याणाधिष्ठितही आहे. लोकांना लवकरात लवकर आणि संपूर्णपणे बरे होण्यात मदत करणे, हा हेतू या सेवेमागे आहे. इथं ‘संपूर्णपणे’ या शब्दाला ‘केअर अॅट माय होम’च्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. प्रत्येक प्रकरणातून एक नवी प्रेरणा ‘केअर अॅट माय होम’ला मिळते. डॉ. सिंह यांच्यासाठी त्यांचे एक मित्र असेच प्रेरणेचा स्त्रोत ठरले. या मित्राचे वडील मरण पावलेले होते. तत्पूर्वी आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्यानंतर त्यांच्याकडून घास गिळला जात नव्हता. पुढे ‘फिडिंग ट्यूब’वर त्यांना अवलंबून राहावे लागले. डॉ. सिंह सांगतात, ‘‘घरी अशा रुग्णाला जेवू घालताना किमान तापमान ४५ डिग्री असावे, हे कुणीही त्यांना सांगितलेले नव्हते. दुसरे म्हणजे त्यांना बिछान्यावर झोपवून जेवू घातले जात होते. आता यामुळ्य फुफ्फुसात इन्फेक्शनची शक्यता बळावतेच.’’ डॉ. सिंह जरा रागातच बोलतात, ‘‘अशा प्रकारे डिस्चार्जनंतरच्या काळजी वाहण्याची कुठलीही प्रक्रिया उपलब्ध नसल्याने त्यांचे जगणे दुरापास्त झाले आणि पुढे तेही राहिले नाहीत, पण मित्राने सांगितलेला हा अनुभव माझ्या दृष्टीने उपयोगात आला. त्याच्या वडिलांना तेव्हा जे मिळाले नाही, ते मी आज इतरांच्या वडिलांसाठी उपलब्ध करून देतो आहे. ’’

शस्त्रक्रिया तर यशस्वी झाली, पण घरात नेमकी काळजी न घेतल्यामुळे रुग्णाची परिस्थिती पूर्ववत बिकट बनली वा पूर्वीपेक्षाही बिकट बनली. काही प्रसंगांतून रुग्णाला मृत्यूही ओढवला, हे सगळे शिर्केंसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनले. म्हणजे शिर्के यांच्या दृष्टीने भविष्यात असे घडू नये म्हणून काय काय काळजी घ्यायला हवी, ते शिकवणारे ठरले.

सुरवातीची आव्हाने…

‘भांडवल’ ही डॉ. सिंह यांच्या दृष्टीने सुरवातीची सगळ्यात मोठी समस्या होती. स्वत:चा खर्च भागवण्यासाठी फिजिओथेरेपिस्ट म्हणून पार्टटाइम जॉबही ते करत. एक चांगली नोकरी सोडून ‘केअर ॲअॅट माय होम’ त्यांनी सुरू केलेली होती. विशेष म्हणजे तेव्हा त्यांच्या घरात बाळ येऊ घातलेले होते. हिंमत तर मोठीच केली होती, पण किंमत येईल तेव्हा खरे, अशी सगळीच अनिश्चितता होती. बरं हेल्थकेअर क्षेत्रात पडायचे तर त्यासाठी काय काय करावे लागते, याची विशिष्ट अशी माहिती कुठेही एकत्रित स्वरूपात मिळत नाही.

डॉ. सिंह सांगतात, ‘‘केअर अॅट माय होम’ आणि ‘प्रॅक्टिस’मुळे लाडाची लेक अनिशाच्या कोडकौतुकासाठी थोडी उसंतही मिळणे अवघड झालेले होते.’’ दुसरीकडे शिर्के सांगतात, ‘‘धोरणे आखण्यासाठी बाहेर राहून आतले बघायचे आणि आतले बघून आडाखे बांधायचे आणि मग त्यावरून धोरणे लागू करायची वरून त्याचवेळेला लहानसहान गोष्टींवर लक्ष द्यायचे. एकाचवेळेला ही दोन कामे म्हणजे तसे रंजक आव्हान होते.’’

डॉ. सिंह सांगतात, ‘‘हेल्थ केअरसारख्या नव्या क्षेत्रात पडण्यासाठी मी एक चांगल्या पगाराची नोकरी सोडली. याहून मोठी जोखिम काय असू शकते? तसे पाहता हेल्थ केअर हा माझ्यासाठीही नवाच विषय आहे. हेल्थ केअर, इकोसिस्टिम या सगळ्यांबद्दल मला खुप काही जाणून घ्यायचे आहे आणि आपल्यासाठी एक रस्ता निवडायचा आहे. आजारपणानंतर, शस्त्रक्रियेनंतर आणि वार्धक्यातले लोकांचे जगणे सुकर, सुलभ करायचे आहे. आपले जे काय हाल होताहेत, होतील ते होवोत, पण ही एक आगळा आनंदानुभव देणारी सेवा आहे. सगळ्यांच्या नशिबी ती नसतेच. जेव्हा-जेव्हा म्हणून ही सेवा मी केलेली आहे, तेव्हा-तेव्हा मला जो काही आनंदानुभव आला तो शब्दांत बांधलाच जाऊ शकत नाही.’’

Related Stories