एकभुक्त राहून ‘स्किप ए मील’ च्या द्वारे हजारो गरिबांना अन्न अर्पण करण्याचा यज्ञ !

0

अर्पण रॉय च्या आई-वडिलांचा नेहमीच हा प्रयत्न होता की त्याने आपला वाढदिवस गरीब आणि वंचित मुलांबरोबर साजरा करावा. हे करण्याच्या मागे त्यांचा सरळ साधा उद्देश होता की , त्यांना त्यांच्या मुलाला समाजाची सत्य परिस्थिती अवगत करुन द्यायची होती, तसेच अनेकांच्या जीवनातले कटू वास्तवही त्याच्या निदर्शनास आणून द्यायचे होते जर अर्पणला आपल्या आयुष्यात वंचितांसाठी काही करण्याची संधी मिळालीच तर त्यांच्यासाठी तो निशितच यशस्वीपणे कार्य करू शकेन. अर्पणच बालपण उडीसाच्या ग्रामीण भागात व्यतित झालं, जिथे त्याने उपासमारीने त्रस्त असलेल्या कालाहंडी सारख्या भागात राहणाऱ्या लोकांच जीवन अगदी जवळून बघितलं जे बऱ्याचवेळा फक्त आंब्याच्या कोयीवर आपला उदरनिर्वाह करत असे.


वर्ष २०१२ मध्ये महाराष्ट्राच्या टाटा इंस्टीटयूट ऑफ सोशल साईंसेस (TISS) च्या तुळजापुर कैंपस मध्ये अभ्यासाच्या वेळेस अर्पणच लक्ष्य दररोज जेवणाच्या मेस मध्ये वाया गेलेल्या जास्त अन्नावर असायचं. अर्पण म्हणायचे, “मी नेहमी पेपर मध्ये बातम्या वाचायचो की महाराष्ट्रात दरवर्षी ३ ते ४ हजार मुले उपासमारी आणि कुपोषणाचे बळी पडत आहे, आणि आपल्या कॉलेमध्ये आपल्या नजरे समोर अन्न वाया जात आहे ही गोष्ट मला मनातल्या मनात खात होती. आम्ही पुढाकार घेऊन अन्न वाया घालवणाऱ्या विद्यार्थ्यांना वेसण घालण्यासाठी आणि वाया घालण्याचा प्रमाण कमी होण्याच्या उदेशाने आपल्यातलेच काही विद्यार्थी स्वयंसेवकांचा रुपात तैनात केले .” पण त्यांचे सगळे प्रयत्न विफल ठरले. अन्नाची नासाडी होतच होती. हे सगळे बघून अर्पण खूप संतप्त झाला. पण लवकरच त्याच्या डोक्यात एक विचार चमकला.

एका वेळेसच जेवण सोडायचं (Skip A Meal)

अर्पणच्या आई-वडिलांनी लहानपणी त्याना एक शिकवण दिली की तुमच्या जवळ जे काही आहे त्याचातले थोडे फार तरी अशा लोकांना जरुर द्या की ज्यांना त्याची गरज तुमच्यापेक्षा अधिक आहे आणि ह्याच शिकवणीने त्यांच्या डोक्यात हा विचार आला. अर्पण आणि त्यांच्या काही स्वयंसेवक मित्रांनी त्याच क्षणाला निर्णय घेतला की आपण एक वेळेसच्या अन्नाचा त्याग करून ते अन्न कॉलेज आणि जवळपासच्या परिसरातल्या गरीब आणि उपाशी लोकांना वाटायचं.जेव्हा अर्पण ह्या विषयावर शोध करत होता की आपल्याला कोणत्या लोकांवर लक्ष केंद्रित करायचं आहे तेव्हाच “स्कीप ए मील’’ची टीम अशा सत्याला सामोरी गेली की ज्यामुळे खंबीरपणे पुढे जाण्यासाठी त्यांना बळ मिळाले.अर्पण सांगतात की,”निरीक्षणाच्या दरम्यान त्यांनी एका अनाथालयाला भेट दिली,तिथे राहणाऱ्या मुलांना जे अन्न मिळत होते ते बघून हे थक्क झाले.तिथल्या मुलांना जेवणात कोरडी पोळी आणि हिरवी मिरची वाटून पातळ पाणी द्यायचे. हेच जेवण ती मुलं संपूर्ण वर्षभर करीत असे.


अर्पण सांगतात की,”कॅन्सर,एड्स, आणि टीबी सारख्या आजारांनी जेवढे लोक मरत नसतील तेवढे उपासमारीमुळे मरतात. संपूर्ण भारतात दरवर्षी २५ हजारांहून अधिक लोक उपासमारीने बळी पडतात आणि दररोज जवळ-जवळ ५३ मिलियन लोक उपाशी पोटी राहायला विवश होतात. १८ जून २०१२ला पहिल्यांदा ‘स्कीप ए मिल’’ च्या टीम ने अन्नत्याग केला आणि गरजू लोकांमध्ये ते वाटले. वर्तमानात TISS तुळजापूरचे ३०० विद्यार्थी दर शनिवारी अन्नत्याग करून ते गरजूंना वाटतात.

गती संपादन केली

अर्पण सांगतात की त्यांचा विचार कधीच ‘स्कीप ए मिल’ ला सेवाभावी संस्थेत [NGO]परिवर्तीत करायचा नव्हता. त्यांना विद्यार्थ्यांद्वारे संचालित होणाऱ्या ह्या संघटनेला देशाच्या इतर कॉलेज मध्ये पण विस्तारित होतांना बघण्याची इच्छा होती. अर्पण म्हणतात की, "आम्हाला आमच्या विचारसरणीला गती प्राप्त करून एक देशव्यापी आंदोलनाच्या रुपात प्रसार होताना बघायचे आहे. कारण मला विश्वास आहे की तरुणांकडे क्षमतेची काहीच कमी नाही. याच्या व्यतिरिक्त माझे असे मत आहे की तरुणांना पैशाच्या रुपात मदत करायला प्रेरित करण्यापेक्षा दुसऱ्यांबरोबर आपले अन्न वाटण्यासाठी प्रोत्साहित करणे अधिक चांगले.

सध्या चेन्नई च्या मद्रास मेडिकल कॉलेज आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेज च्या विद्यार्ध्यानी त्यांच्या या उपक्रमात त्यांना साथ देवून आपल्या भागातल्या बेघर आणि उपाशी लोकांना ह्या प्रकारे अन्नदान केले. अर्पण म्हणतात,’’ भारतातल्या सगळ्या निवासी कॉलेजने ‘एक कॉलेज एक क्षेत्र’ ह्या आधारावर या विचारसरणीचे अवलंबन केले तर खूप कमी वेळात विद्यार्थी सरकारच्या उपासमारी बंदच्या योजनेला पाठीमागे टाकण्यात यशस्वी होतील. कारण आपल्या देशात महाविद्यालायांची संख्या जास्त आहे’’. फक्त विरोध करणाऱ्यांबद्दल अर्पण म्हणतात की,’’ निंदा नालस्ती करणाऱ्याना हे मान्य नाही की फक्त आठवड्यातून एकदाच अन्नदान केल्याने उपासमारी दूर होईल पण रस्त्यावर उपाशी पोटी राहणाऱ्यांना स्वच्छ पाण्याचा एक थेंब आणि एक वेळेसच जेवण म्हणजे एक मेजवानीच. काही नाहीतर काही नेहमी चांगलेच होते. मी नेहमी बघत आलो आहे की फक्त कॉलेजच नाही तर हॉटेल आणि लग्न समारंभामध्ये पण उरलेलं अन्न खूप मोठ्या प्रमाणात फेकून देतात. जर आपल्या सारख्या विचारांचे लोक पुढे आले तर ते आजूबाजूच्या परिसरातल्या गरीब लोकांमध्ये ह्या अन्नाच वाटप करून उपासमार आणि अन्नाचं नुकसान ह्या दोन्ही गोष्टीनां आळा बसायला सहयोग करू शकतील’’.

शिक्षण आणि सशक्तीकरण

अर्पण सांगतात की,’’ज्या अनाथालयात ‘’स्कीप ए मिल’’ची टीम जाते तिथले मुल खूप आतुरतेने आमची वाट बघत असतात. या व्यतिरिक्त ह्या टीम ने मुलांना योग्य ते शिक्षण देण्यास प्रारंभ केलेला आहे. अर्पण म्हणतात,’’आम्हाला हे सत्य माहित आहे की या मुलांना शिक्षणा व्यतिरिक्त अजून खूप काही पाहिजे आहे. त्यांना चांगल्या भविष्यासाठी खूप मेहनतीची गरज आहे.आम्ही प्रारंभी इंग्रजीच शिक्षण देणाऱ्या एका संस्थेशी मिळून शिक्षण आणि योजनेच्या क्षेत्रात पाउल टाकले. आम्ही सगळ्यांनीच कामाला सुरवात केली पण लवकरच आम्हाला जाणवलं की मुलांना फक्त इंग्रजीचंच ज्ञान पुरेसं नाही. मग आम्ही त्याचबरोबर चित्रकला, क्राफ्ट, हस्तशिल्प इ .कलांचा पण त्यात सहभाग केला.


अर्पण आणि त्यांच्या टीमने बघितले की, ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या मुलांना ज्ञान अवगत करायला खूप त्रास होत आहे. हा अभ्यासक्रम मुलांना गृहीत धरून नव्हता तयार केला.ते म्हणतात,’’ तो फक्त शहरातल्या मुलांना गृहीत धरून तयार केला आहे. आता आम्ही ग्रामीण क्षेत्रातल्या मुलांना एक एकांगी अभ्यासक्रम विकसित करण्याच्या क्रमात आहोत.” फक्त एवढेच नाही तर ही टीम मुलांच्या सर्वांगीण विकास आणि बेघरांसाठी रोजगार ह्या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे.अर्पण म्हणतात,’’आम्ही ह्या बेघर लोकांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याखेरीज त्यांना रोजगार सुद्धा मिळून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आमचं लक्ष जेवणापुरतं मर्यादित नसून त्यांना सशक्त बनविणे हे ध्येय आहे.

मजबुतीने पुढचे पाऊल

अर्पणने आपला पदवीचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि त्यांच्या द्वारे सुरु केलेला हा उपक्रम निरंतर पुढे जात आहे. ते म्हणतात की त्यांच्या सारखी मानसिकता असलेल्या लोकांमुळे प्रत्येक येणाऱ्या वर्षात त्यांचा उपक्रम अधिक यशस्वी होत आहे. ते नेहमी आपल्या बरोबर जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या समोर अनेक संकटं येतात पण त्यांना पूर्ण विश्वास आहे की त्यांचे हे अभियान सतत प्रगतीशील पाऊल टाकेल.

आता जेव्हा दुसरे कॉलेज पण ह्या अभियानाचा भाग बनलेले आहे तेव्हा ‘स्कीप ए मील’ दर आठवड्यात १३०० लोकांना अन्नदान करत आहे. वर्ष २०१२ मध्ये पहिल्यांदा सुरु केलेले हे अभियान देशातल्या तीन प्रदेशांमध्ये ५३ हजारांपेक्षा जास्त लोकांचे पोट भरविण्यात यशस्वी झाले आहे. एका बाजूला पूर्ण जग वयस्कर होत आहे तिथे भारताची सरासरी वयोमर्यादा फक्त २८ वर्ष आहे. येणाऱ्या नवीन काळात आम्ही जगाला कामगार उपलब्ध करून देत आहोत. आमचा पूर्ण विश्वास आहे की ही नवीन पिढी नवीन विचारांनी पुढे येऊन आपल्या आसपासच्या अधिकांश समस्यांचं समाधान मांडण्यात यशस्वी होईल.


अंतत: अर्पण म्हणतात, “मला मोठे स्वप्न बघायला आवडतात. म्हाताऱ्या अपंग,बेघर, अनाथ मुलांसाठी एक केंद्र निर्माण करण्याची माझी इच्छा आहे, माझे स्वप्न आहे की देशातल्या प्रत्येक श्रेणीत राहणाऱ्या मुलांना भारताच्या बाहेर दुसऱ्या देशामधले सर्वश्रेष्ठ शिक्षण संस्थामध्ये अभ्यास करण्याची संधी मिळाली पाहिजे.’’


लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किरण ठाकरे