आरक्षणाला नकार देणाऱ्या आत्मसन्मान आणि मानवी धाडसाची कहाणी!

0

‘माझ्या पालकांनी मला शिकवले आहे की, मानवतेपेक्षा मोलाचे काहीच नाही. मी पाहिले आहे की, गरीब आणि गरजू लोक किती खडतर जीवन जगतात आणि जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करताना त्यांना आरक्षणाचा उपयोग होतो. त्याचवेळी मी श्रीमंतांची मुलेही पाहते, ज्यांची स्थिती चांगली असते तरी त्यांचे पालक आरक्षणाचा फायदा घेतात. मला संधीसाधू व्हायचे नाही, मला जातीयवादी व्हायचे नाही. मला बोलायचे वेगळे आणि वागायचे वेगळे असे आवडत नाही.’ दिंगचेंगफा बोरुआ यांनी सरकारी नोकरी मिळवताना आरक्षणाला नकार दिला. ही त्यांची कहाणी आहे.


ज्यावेळी २०१३ मध्ये दिंगचेंगफा बोरुआ या २६ वर्षांच्या होत्या, त्यानी आसाम लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. त्यात त्या यशस्वी झाल्या. कोलकाता येथे इंडियन इन्स्टीट्यूट मध्ये मास क्मुयनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली, मात्र नंतर उद्योजक होण्यासाठी ती नोकरी सोडली. काही महिन्यांनंतर त्यानी ज्यावेळी प्राथमिक परिक्षा दिली होती, त्यांना फारच थोड्या अपेक्षा होत्या. मात्र जुलै २०१४मध्ये त्यांनी ५० हजार विदयार्थ्यांसोबत एपीएससीची परिक्षा दिली, त्यातून केवळ ९० जणांना उत्तिर्ण म्हणून अंतिम यादीत घेण्यात आले.

दिंगचेंगफा या शैक्षणिकदृष्ट्या हुशार विद्यार्थीनी होत्या, त्यांचा चांगला नाव लौकीक होता. त्या ‘अहोम’ या मागास समाजात जन्मल्या आहेत, ज्यांना राज्यात २७टक्के आरक्षण राज्य सरकारी नोकरीत आहे. पण दिंगचेंगफा यांनी सर्वसाधारण गटातून अर्ज केला, जे करणे त्यांच्यासाठी कठीण होते. त्यांचा परिक्षेत अव्वल क्रमांक आला नाही, किंवा विशेष गुण मिळवू शकल्या नाहीत. मात्र त्यांनी जे केले त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केली, जी आपण आपले जीवन जगताना दुर्लक्षीत करत असतो. बंगळुरू मध्ये विद्यापीठाच्या परिक्षेत आठव्या आलेल्या दिंगचेंगफा यांनी त्यांचे आरक्षण नाकारले जे तुमच्या पैकी अनेकांना प्रेरणादायी वाटेल. अगदी त्यांनी ज्यावेळी संकेतस्थळावर लिहिले की, ‘ मी स्पर्धात्मक परिक्षेसाठी माझा आरक्षणाचा हक्क नाकारला, आणि याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की त्यांचा फोन न थांबता खणखणत होता. दिंगचेंगफा यांनी बहुतांश अभ्यास दिल्लीत केला मात्र त्यांच्या गृहराज्यात परत जाण्यापूर्वी त्या काम मात्र बेंगलूरू मध्ये करत होत्या. त्यांच्या आई निवृत्त प्राध्यापिका आहेत, ज्या सध्या एका सेवाभावी संस्थेसोबत दुर्गम भागातील शिवसागर जिल्ह्यात काम करतात. त्यांचे वडील लहानसा बांधकाम व्यवसाय करतात. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी कला-प्रस्तुतीचे काम करतात तर लहान भाऊ ऑटोमोबाईल संशोधक दिलीप छाब्रीया यांच्या सोबत गुवाहाटी मध्ये काम करतो.

दिंगचेंगफा, सध्या २८ वर्षांच्या आहेत, त्यांनी त्यांच्या आरक्षण नाकारण्याच्या निर्णयामागे कोणत्या प्रेरणा होत्या याबाबत सांगताना म्हटले की, त्यांनी व्यवस्थेबाबत नाके मुरडणा-यांना सकारात्मक पध्दतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्या म्हणाल्या की, मी सहजपणे बंगळुरूत माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, की मी आसाम लोकसेवा आयोगाची परिक्षा देत आहे, आणि माझी जात मागास असून मी आरक्षणातून परिक्षा न देण्याचे ठरविले आहे. मी त्यावेळी असा विचारच केला नाही की ही खूप मोठी गोष्ट आहे ज्या पध्दतीने मी जगण्याचे ठरविले आहे. माझ्या मैत्रिणीने माझी ही गोष्ट माध्यमांना सांगण्याचा सल्ला दिला. मी त्यानुसार पत्रही लिहिले मात्र ते कुणालाच पाठविले नाही, कारण माझी स्वत:ची खात्री होत नव्हती, पण मला ते पत्र पाठवून दे म्हणून सातत्याने मैत्रिणीने फोन केले. ज्यावेळी माझी कहाणी ऑनलाइन गेली, माझ्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला.लोकांना माझ्याबाबत जास्त जाणून घ्यावेसे वाटत होते. मला मात्र हे सारे अनपेक्षित होते.”

पत्रकारिता का सोडली याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, “ ज्यावेळी मी लहान होते मला समाजाशी जोडल्या गेलेल्या व्यवसायात काम करावे असे वाटत होते. मला पी साईनाथ आणि त्यांचे लेखन भावले. त्याने मी प्रभावित झाले आणि पत्रकार होण्याचे ठरविले. मी सामाजिक विषयावर लिहू इच्छित होते. मला वाटले की शेती किंवा शेतकरी यावर कुणीच लिहीत नाही. म्हणून मी शेतीविषयक नियतकालिकात काम सुरु केले. काही महिने काम केले, पण त्यात मन रमले नाही. कारण तश्या काही वार्तांकनाची मौज मला मिळाली नाही. २०१० आणि २०१३च्या दरम्यान मी वृत्त संस्थेसोबत काम केले, तसेच आघाडीच्या वाहिनीसाठी देखील, मात्र ज्या प्रकारच्या वार्ताकनासाठी मी काम करत होते, मला वाटत नाही की ती माझी पत्रकारिता असेल. मी २०१३मध्ये आसामला परत जाण्यासाठी तयारी केली, आणि उद्योग करायचे ठरविले. मला माझ्या लोकांना जास्त रोजगार द्यायचे होते.”

आसाम लोकसेवा आयोगाच्या परिक्षेबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, “मी कधीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा विचार केला नाही, पण ज्यावेळी मी आसाम लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहिली, मला अर्ज करावा असे वाटले. युपीएससी प्रमाणे ही परिक्षा दरवर्षी होत नाही ती चार पाच वर्षातून एकदा होते. त्यामुळे स्पर्धा देखील तीव्र होती. मला प्राथमिक परिक्षेची तयारी करायला केवळ दोन महिने होते. जेंव्हा मी स्पष्ट केले की, मला मुख्य परिक्षेसाठी कठोर मेहनत करावी लागेल, मी दोन विषय निवडले जे मानस शास्त्र आणि राज्यशास्त्र हे होते. मला मानस शास्त्राची आवड होती, मात्र राज्यशास्त्र कच्चे होते. पुढचे पाच महिने मी कठोर अभ्यासात घालविले. मी मुख्यपरिक्षेसाठी दुस-या श्रेणीत निवडले गेले.”

त्यानंतर आरक्षणाला नकार देण्याच्या मुख्य विषयाबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, “ अर्ज भरतानाच मी साधारण गटातून तो भरला. मुलाखतीच्या वेळी निवड समितीला मी इतर मागास वर्गिय असल्याचे समजले, ज्यांना २७ टक्के आरक्षण आहे. मी त्यांना काहीच सांगितले नाही मात्र माझ्या आडनावावरून त्यांनीच हे ओळखले. मी अहोम समाजातील आहे, तरीही मी साधारण गटातून का अर्ज केला हे त्यांना जाणून घ्यायचे होते. मी त्यांना गुणवत्तेवर नोकरी हवी आहे असे कारण सांगितले. मी कठोर परिश्रम घेईन आणि चांगले गुण मिळवून दाखवेन असे सांगितल्याने निवड समितीचे सदस्य प्रभावित झाले.” आरक्षणाबाबत आपले मत मांडताना त्या म्हणतात की, “ यावर बोलण्याची माझी योग्यता आहे की नाही माहित नाही पण, मी दोन्ही बाजू पाहिल्या आहेत. मी गरीब लोक खडतर जीवन कसे जगतात ते पाहते आणि आरक्षणातून त्यांना कसा विकास करता येतो हे देखील पाहते. त्याचवेळी मी श्रीमंताची मुले पाहते ज्यांची परिस्थिती  चांगली असताना ते जातीच्या आधारे आरक्षणाचा फायदा घेतात.

“माझा त्याला विरोध नाहीच, पण मला वाटते की, तुम्ही गुणवत्ता असताना असे करता त्यावेळी कुणा गरीब गरजू करिता का ते सोडून देवू नये ज्याला त्याची तुमच्यापेक्षा जास्त गरज आहे. ही व्यक्तिगत बाब आहे, सारेच असे करतील असे नाही किंवा सा-यांना माझे मत पटेल असेही नाही”. त्यांनी सांगितले.


 दिंगचेंगफा बोरुआ
 दिंगचेंगफा बोरुआ

त्या म्हणाल्या की, “ कदाचित हे माझ्या सभोवती असलेल्या परिस्थिती, विचार किंवा व्यक्ती यांच्यापासून मी शिकले असेन. माझ्या पालकांनी मला मानवतेपेक्षा जास्त मौल्यवान काहीच नाही हेच शिकवले, माझ्या मित्रांना मी वेगळी वाटते, पण मी वेगळ्या प्रकारे विचार करते. ज्यावेळी मी दिल्लीत असताना घरी जायला सायंकाळी सात वाजता मेट्रो पकडली, महिलांची बोगी रिकामी होती. दुस-या बाजूला साधारण बोगीत गर्दी होती, आणि पुरुष संपूर्ण वेळ उभ्याने प्रवास करताना दिसत होते. मला कसेतरीच वाटले. पुरुष देखील आमच्या सारखेच कठोर परिश्रम करतात, त्यांना वेगळी व्यवस्था का नसावी? मला समानतेवर विश्वास आहे. त्यामुळे अनेकदा मी उभ्याने प्रवास करते आणि माझा पाठिंबा दर्शवते. मागच्या तीन वर्षात मी एक गोष्ट शिकले, मी संधी साधू नाही, किंवा जातीवादी कट्टर विचार करत नाही. मी माणुसकीवर विश्वास ठेवते असे सांगत खोटारडेपणाचे वर्तन करू शकत नाही. मला वाटते की तुमची जात, धर्म, किंवा पार्श्वभुमी काही असो, त्याने काही फरक पडत नाही. फक्त काय बदलते या सा-या गोष्टी तुम्ही वेगळ्या रितीने हाताळू शकता ते वर्तन बदलते. मला समजले की काही लोकांना ते उत्तर-पूर्वेतून आल्याने नाकारले जाते. मी वेगवेगळ्या शहरात राहिले, आणि मित्र परिवाराशी चर्चा करून याबाबत त्यांची मते जाणून घेतली. मला वाटते की तुम्ही इतरांच्या भेदभावाबाबत भिती बाळगून असाल, कारण तुम्ही उत्तर-पूर्वेतून आला आहात, तुम्ही केवळ प्रश्नाचा बाऊ करत आहात. जर तुम्ही सक्षम असाल तर त्या विरोधात आवाज उठवा. जग बदलण्याच्या अपेक्षा करु नका, तुम्ही सा-यांना बदलू शकणार नाही. तुम्हाला स्वत:मध्ये बदल करता येतो.” असे त्या म्हणाल्या.

तुम्ही सध्याच्या नोकरीने खुश आहात का? अशी विचारणा केली असता त्या म्हणतात की, “अर्थातच, परंतू माझ्या मित्रांपैकी काहीजण मस्करी करतात की सरकारी नोकरीतील लोक आळशी आणि कामचुकार असतात. पण ते खरे नाही, हे मला आता समजले आहे. माझ्या सहायक आयुक्त आणि कार्यकारी दंडाधिकारी या पदावर पोहोचताना मला खूप काही अनुभव आले. अनेकदा मला सतत काम करावे लागते आणि सुटी देखील मिळत नाही. मी काही तक्रार करत नाही, मला आंगणवाड्यातून महत्वाची माहिती मिळते आणि जबाबदा-या तसेच स्थानिकांचे प्रश्नही समजतात. काहीवेळा मला चांगले अनुभव येतात तर काही वेळा कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते. ज्यावेळी लोक निदर्शने करतात, आम्हाला तेथे जावे लागते आणि समस्या सोडवाव्या लागतात. रोजची आव्हाने वेगळी असतात. मला लोकांचे काम करायला आवडते. त्यांच्या चेह-यावर हास्य पाहून समाधान मिळते.


 दिंगचेंगफा बोरुआ आपल्या पालकांसमवेत
 दिंगचेंगफा बोरुआ आपल्या पालकांसमवेत

मी ज्यावेळी लहान होते, मी खूपच हळवी होते, काही वाईट चुकीचे झाले की, निराश होत असे आता मला वाटते की मी सर्वानाच काही सुधारू शकत नाही. जे शक्य आहे ते मला केले पाहिजे, मी इतरांना बदलू शकत नाही. मी व्यवस्थेवर तक्रारी करणे बंद केले आहे, कारण आता मी व्यवस्थेचा भाग झाले आहे. ती बदलण्यासाठी मला स्वत:मध्ये बदल करावे लागतील.” असे त्या आत्मविश्वासाने सांगतात.