करियरबाबतीत मार्गदर्शन करणारे ʻएम्पावर फ्युचर्सʼ

करियरबाबतीत मार्गदर्शन करणारे ʻएम्पावर फ्युचर्सʼ

Saturday December 19, 2015,

2 min Read

वयाच्या अठराव्या वर्षी अरस्तू झाकिया यांनी ʻद डिफरन्सʼ नावाची एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. ही संस्था लोकांना विचार करण्यास भाग पाडत असून, महाविद्यालयीन तरुणांना प्रामुख्याने धर्म, लिंग आणि नागरिकत्वाबाबत होणाऱ्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर सामाजिक कार्य करण्यास प्रोत्साहित करत आहे. गेल्या पाच वर्षांत ही संस्था अहमदाबाद आणि दिल्ली येथील जवळपास सहा हजार तरुणांपर्यंत पोहोचली आहे. अहमदाबादमध्ये अरस्तू हे आरती नायर यांच्याशी संपर्कात आले. अहमदाबाद विद्यापीठातून आरती यांनी वाणिज्य शाखेतील पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी कॅंब्रिज रिसर्च एण्ड डाटा अॅनालिटिक्स येथे संशोधनाचे कार्यदेखील केले आहे. २०११ साली जवळपास आठ जणांनी एकत्रित येऊन ʻएम्पावर फ्युचर्सʼची स्थापना केली. भारतीय तरुणांना शैक्षणिक आणि कारकिर्द घडवण्याबाबतचा निर्णय घेण्यासंबंधी सक्षम बनविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

image


अरस्तू आणि आरती हे नाविण्यपूर्ण व्यवसायाच्या रुपरेषेचे केंद्र असलेल्या वेंचर स्टुडियोच्या संपर्कात आले. तेथे त्यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळाला आणि त्या कार्यक्रमानंतर त्यांना त्यांच्या कल्पनांवर काम करणे सोपे गेले. याबाबत बोलताना अरस्तू सांगतात की, ʻआम्ही आमचे पहिले उत्पादन Kgurus.com ऑगस्ट २०१२ साली सुरू केले.ʼ Kgurus म्हणजे नॉलेज गुरू, ज्यामुळे तरुणांना आपली कारकिर्द घडविण्यास मदत होत होती. या व्यासपीठावर अनेक यशस्वी लोकांच्या कथा प्रकाशित करण्यात आल्या होत्या. ʻआम्ही भलेही ऑगस्ट महिन्यात आमचे संकेतस्थळ सुरू केले असेल, तरीही त्याला दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आहे. तसेच जवळपास तीन हजार नवे लोक त्याला दरमहिन्याकाठी भेट देतात. आतापर्यंत आम्ही व्यवस्थापन, अभियांत्रिकी, मानवता, कला शास्त्र, माध्यम, संस्कृती आणि इतर क्षेत्रातील जवळपास १०० पेक्षा अधिक यशस्वी कथा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.ʼ, असे अरस्तू सांगतात. एम्पावर फ्युचरचे २७ कॅम्पस एम्बॅसेडर आणि आंतरवासिता आहेत.

एम्पावर फ्युचर्स ही CollegeBol.com नावाचे एक व्यासपीठ तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. याद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना महाविद्यालये शोधण्यास मदत होणार आहे. या क्षेत्रात त्यांनी अनेक कामे केली आहेत. त्यांच्या MeraCareerGuideने तरुणांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली असून, गेल्या तीन वर्षांपासून ते अविरतपणे हे कार्य करत आहेत. याशिवाय YourNextLeap हे त्यांचे एक उत्पादन असून, त्याचे मुख्य लक्ष्य रोजगार संबंधीचे संकेतस्थळ बनण्याचे आहे. एम्पावर फ्युचर्स, यांची लक्ष्य मोठी आहेत. मात्र KGurus आणि इतर कार्यक्रम ही त्यांच्या उपजिविकेची प्राथमिक साधने राहणार आहेत. जोपर्यंत CollegeBolच्या भोवताली मोठे वलय निर्माण होत नाही, तोपर्यंत ते KGurus आणि इतर कार्यक्रमांवर अवलंबून राहणार आहेत.

लेखक - जुबिन मेहता

अनुवाद - रंजिता परब