स्टार्टअपसाठी उशिराने भारताला आली आहे जाग, विलंबासाठी मी देखील जबाबदार : राष्ट्रपती.

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्टार्टअप’ अभियानाच्या प्रारंभीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे की, भारताला यावर उशिरा जाग आली आहे, या विलंबासाठी आपण स्वत:देखील जबाबदार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की ते स्वत:ही यापूर्वी प्रशासनात राहिले आहेत.

सिलिकॉन व्हँलीच्या काही सीईओंच्या शिष्टमंडळाशी बोलताना मुखर्जी म्हणाले की, भारताला पुढच्या दहा ते पंधरा वर्षांत दहाटक्के दराने विकासाचा वेग ठेवता आला पाहिजे त्यातून गरिबी आणि आरोग्याबाबतच्या समस्यांचे निराकरण करता येऊ शकेल. ‘स्टार्टअप’ अभियानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “ आपल्यापैकी काही लोकांनी योग्यच सांगितले आहे की, ते नवे उद्योजक आत्मविश्वासाची जाणिव करतात, आणि हे करू इच्छितात. हे सरकारचे काम आहे की उद्यमिता वाढण्यासाठी वातावरण तयार केले पाहिजे. आम्ही खूपच वेळ घालवला आहे,पण आम्ही निर्णय घेतला आहे, जागे झालो आहोत.” ‘स्टार्टअप’ अभियानाचा उद्देश तळागाळापर्यंत उद्योजकतेला चालना देणे हा आहे.

लघुउद्योगांना चालना देण्याबाबत वातावरण निर्मिती करण्यास होत असललेल्या विलंबाबाबत मुखर्जी म्हणाले की, “ मी कुणाला जबाबदार ठरवू शकत नाही, मला जबाबदारी घ्यावी लागेल कारण मी ब-याच काळापर्यंत प्रशासनात होतो”

ते मागच्या काळातील सरकारमध्ये वित्तमंत्री राहिले होते, या उपक्रमासाठी त्यांनी मोदीजींचे कौतुक केले.राष्ट्रपती म्हणाले की भारताला पुढच्या दहा-पंधरा वर्षांत दहा टक्के दराने विकास केला पाहिजे,जेणेकरून देशाला गरीबीच्यारेषेपलिकडे घेउन जाता आले पाहिजे आणि शिक्षण, आरोग्य, पायभूत सुविधा आणि रोजगारसारख्या मुलभूत गरजा पूर्ण करता आल्या पाहिजेत. ‘द इंडस आंत्रप्रेनर्स’च्या नामांकनाखाली सीईओंच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली आणि सांगितले की त्यांनी भारतात शिक्षण घेतले पण सिलीकॉन व्हँलीत गेल्यावर अमेरिकी सरकारच्या धोरणांमुळे चांगले काम करू शकले.

त्यांनी मागणी केली की भारतात गुंतवणूकीच्या क्षेत्रात लालफितशाही कमी केली पाहिजे आणि त्यांचे स्वागत केले पाहिजे कारण ते देशात स्टार्टअप कंपन्यात भांडवली गुंतवणूक करु शकतील.

त्यांच्याशी सहमती व्यक्त करताना मुखर्जी यांनी भारतीय अनेक नोबेल विजेत्यांचे उदाहरण दिले आणि सांगितले की भारतात प्रतिभेची कोणतीही टंचाई नाही.

बैठकीत उपस्थित इन्वेंट कँपिटलचे कार्यकारी व्यवस्थापक कंवल रेखी म्हणाले की, “आमच्यापैकी बहुतेकांची पार्श्वभूमी व्यवसायाची नाही पण सिलीकॉन व्हँलीत आम्हा भारतीयांना उद्योजक म्हणून ओळखले जाते”

अनुवाद : किशोर आपटे.