‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार जनतेशी संवाद

0

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. मुख्यमंत्र्याशी थेट संवाद साधणारा ‘संकल्प शाश्वत शेतीचा’ या विषयावरील हा पहिला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिनीवर नंतर प्रसारित करण्यात येईल. 


या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारता येणार आहेत. जनतेने विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तर देतील. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर असावेत, वैयक्तिक नसावेत, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी दि. 3 एप्रिल, 2017 पर्यंत av.dgipr@maharashtra.gov.in या ई-मेलवर किंवा 8291528952 या मोबाईल क्रमांक तसेच व्हॉट्स अॅपवर पाठविता येतील. - महान्युज