काश्मिरी उद्योजिका परसातून बगिचा फुलवत बनली कोट्यावधींच्या फुलशेती उद्योगाची मालकीण

!

0

३८ वर्षौय नसरत जहाआरा काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यातील डाडोरा गावी राहतात. सन२०१० मध्ये संगणक पदवीधर असलेल्या नसरत यांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि या छोटेखानी स्टार्टअपची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित घराच्या मागच्या परसात फुलांची लागवड करुन ती विकण्यास सुरुवात केली.आज त्या केवळ फुल विक्री करत नाहीत तर खो-यात फ्लोरीकल्चरची एक कंपनी यशस्वीपणे चालवितात.

सुरुवात फारच अवघड होती; नुसरत यांच्याकडे गुंतवणुक नव्हती आणि पाठबळ सुध्दा नव्हते.आपल्या छोट्या उद्योगात जमापुंजी खर्ची करत त्यांनी सुरुवात केली. “ काश्मीरमध्ये सौंदर्याचे वरदान असताना एखाद्या महिलेने जर शेतीच्या क्षेत्रात फुलशेतीचा उद्योग करायचे म्हटले तर तिला कमी समजले जाते आणि कुणी तुम्हाला मदत करत नाही,अगदी सरकारसुध्दा नाही” त्यांनी सांगितले.

असे असले तरी, ज्यावेळी नसरत यांच्या काश्मिरी फुलांना चांगली मागणी मिळू लागली, त्यांनी मागे वळायचे नाही असा निर्णय घेतला. त्यांच्या विक्रेत्यांना बँकेतून कर्ज घेऊन उधारी देत नसरत यांनी मागे न पाहता जोरदारपणे सुरुवात केली.आज त्यांच्या मालकीचे तीन बगिचे आणि एक दुकान आहे. त्यांची कंपनी 'पेटलस् ऍण्ड फर्न्स' मध्ये अलिकडेच वीस जणांना रोजगार मिळाला आणि त्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटीच्या घरात आहे.

नसरत काश्मिरी अत्तरांचा व्यवसाय करतात, काश्मिर इसेन्स हा व्यक्तिगत काळजी आणि घरगुती वस्तुंचा ब्रांड त्यांनी हिमालयीन ऍग्रो फार्म्स या कंपनीच्या माध्यमातून सुरु केला आहे. काश्मिर ईसेन्स मध्ये परंपरागत काश्मिरी केशर, बदाम, चेरी, आक्रोड, ऑलिव्ह,ऍप्रिकॉट यांची विक्री स्थानिकांना खास करून महिलांना रोजगार मिळवून देत केली जाते.

“आमच्या हस्तउत्पादीत वस्तू आणि घरगुती पदार्थांची श्रेणी खूप मोठी आहे, त्यात शरीराला मालीश करण्याच्या मलमांपासून साबण आणि जॅम पासून हर्बल चहापर्यंत सारे काही आहे. सा-या पदार्थांची निर्मिती स्थानिक उपलब्ध गोष्टींपासून केली जाते जी इथल्या जंगलात मिळतात किंवा स्थानिक त्यांची लागवड करून मिळवतात. फळे, फुले, औषधी वनस्पती आणि तेल यांची निर्मिती परंपरेनुसार आयुर्वेदिक पध्दतीने किंवा जुन्या जाणत्या पध्दतीने अशी केली जाते की, त्यातील सत्व ९०टक्क्यांपर्यत टिकून राहते.” नसरत सांगतात.

सौजन्य : थिंक चेंज इंडीया