मेडीनफाय – वैद्यकीय क्षेत्राची अस्सल आणि विश्वसनीय माहिती पुरविणारे व्यासपीठ आता नव्या वळणावर...

मेडीनफाय – वैद्यकीय क्षेत्राची अस्सल आणि विश्वसनीय माहिती पुरविणारे व्यासपीठ आता नव्या वळणावर...

Thursday December 03, 2015,

3 min Read

डॉक्टर्स आणि रुग्णालयांसाठीचे एक खास व्यासपीठ असलेल्या मेडीनफाय (Medinfi) ने नुकतेच एन्जल राऊंडच्या माध्यमातून दोन कोटी रुपये उभे केले. यामधील गुंतवणूकदारांमध्ये राम कुमार ककानी (प्राध्यापक, एक्सएलआरआय), प्रदीप जे जयसिंह (अध्यक्ष, हेल्थस्टार्ट), सुनील टी व्ही (सहसंस्थापक, आयव्हीएफए), विजय घाटगे (सीओओ, गोजावास), हेमंत कौल (माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स) आणि गुरमीत चहल (एसव्हीपी आणि हेड-हेल्थकेअर, एसचीएल टेक्नॉलॉजीज) हे प्रमुख गुंतवणूकदार होते.

image


आयओएस ऍप (iOS app) सुरु करण्यासाठी आणि येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये भारतातील दहा शहरांमध्ये विस्तार करण्यासाठी, या निधीचा वापर करण्याची मेडीनफायची इच्छा आहे.

मेडीनफायचे संस्थापक रवी शंकर मिश्रा यांच्या मते, “ आमच्या वापरकर्त्यांपर्यंत नेहमीच खरी आणि विश्वासनीय माहिती पोहचवण्याचा आमचा निर्धार असतो. या निधीमुळे आता आम्हाला अनेक शहरांमधील आमची कंटेट ऑपरेशन्स अधिक मजबूत करणे शक्य होणार आहे आणि त्याचबरोबर या शहरांतील ऍन्ड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांची संख्याही वाढविता येणार आहे.”

२०२४ मध्ये रवी शंकर मिश्रा यांनी स्थापन केलेले मेडीनफाय हे सध्या बंगळुरु, दिल्ली (एनसीआर) आणि मुंबईमध्ये कार्यरत असून, त्यांच्याकडे पाच हजारांहून अधिक डॉक्टर्स, रुग्णालये आणि दवाखान्यांची माहिती आहे. मुख्य म्हणजे ही सर्व माहिती योग्य ती शहानिशा करुन लक्षपूर्वक गोळा केली आहे. याद्वारे वापरकर्त्यांना ३००० हून अधिक दवाखाने आणि डॉक्टर्स यांच्यासंबंधी प्रतिमा, त्यांचा एकूण अनुभव आणि इतर सविस्तर माहितीचे पुनरावलोकन करणेही शक्य होणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य डॉक्टर किंवा दवाखान्याची निवड करताना निश्चितच मदत होईल.

मेडीनफायकडे विविध प्रकारच्या तपासणी यंत्रणा आहेत, जेणेकरुन त्यांच्या वापरकर्त्यांना मिळणारी माहिती ही योग्य ती पडताळणी करुन मिळविलेली आणि अस्सलच असेल. जरी वापरकर्ते मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि रुग्णालयांना फोन करु शकत असले, तरी मेडीनफाय डॉक्टर किंवा रुग्णालयाशी महसूला संबंधी कोणताही करार किंवा भागीदारी नाही आणि त्यायोगे ते डॉक्टरची वेळ घेऊन देत नाहीत.

युवरस्टोरीचे मत

आरोग्य सेवा आणि शिक्षण ही दोन अशी क्षेत्र आहेत ज्यामध्ये ई कॉमर्स स्वरुपात फारशी काही उलथापालथ झालेली नाही,मग ती उत्पादन आधारीत असो किंवा सेवा आधारीत (कॅब, हायपरलोकल, इतर). पण आता मात्र आरोग्य सेवा क्षेत्रातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होत आहे. व्यस्त वेळापत्रक आणि ऑफलाईन अपाॅईंटमेंट बुकींग करण्यामधील कटकटी, यामुळे शहरी भागातील नागरीक प्रॅक्टो, लायब्रेट आणि मेडीनफायसारख्या अनेक व्यासपीठांचा वापर करताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांत, अनेक स्टार्टअप्स या डॉक्टर-अपाॅईंटमेंट सिकिंग स्पेसमध्ये (डॉक्टरांच्या वेळा घेण्याच्या क्षेत्रात) उडी घेताना दिसत आहेत आणि त्यापैकी अनेकांनी सीड राऊंडच्या माध्यमातून निधी उभारला आहे. लायब्रेट (Lybrate), डॉक्टरसी (DoctorC),डॉकट्री (doctree), हेल्पिंगडॉक्टर (HelpingDoctor) आणि डॉकसजेस्ट (DocSuggest) यांच्यासारख्यांनी मिळून चार मिलीयन (दशलक्ष) डॉलर्सचे सीड फंडींग जमविले आहे.

मेडीनफाय हे कंटेट ऍप्रोचचे (अर्थात संबंधित माहिती पुरुवणारी सेवा) अनुसरण करते आणि अपोईंटमेंट बुकींग प्रक्रियेचा यामध्ये समावेश नाही आणि हेच कंपनीचे वेगळेपण आहे. या राऊंडमुळे मेडीनफायला आता वेगवेगळ्या शहरांमध्ये विस्तारणे शक्य होणार आहे. ऑनलाईन हेल्थकेअर (आरोग्य सेवा) सध्या एका उत्कंठापूर्ण काळातून जात आहे आणि येत्या काही महिन्यात ती कशाप्रकारे वाढते ते पहाणे रंजक ठरणार आहे.

लेखक – जय वर्धन

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन