ऐन दुष्काळातही ग्रामीण भागातील शेतकरी झाले 'सेल्फरिलायन्ट'

0

यंदाच्या वर्षी मे महिन्यात देशातील ३३० दशलक्ष लोकांना प्रचंड पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा लागल्या आहेत. देशात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या बरोबरीने अनेक सेवाभावी संस्था व्यक्ती आणि कॉर्पोरेट जगतातील आघाडीच्या समजल्या जाणा-या रिलायन्स उद्योग समुहासारख्यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. ‘साथी हाथ बटाना. . . . या धर्तीवर देशातील विशेषत: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रिलायन्स फाऊंडेशन कश्या प्रकारे दुष्काळाशी दोन हात करताना लोकांच्या मदतीने या संकटाचा मुकाबला करत आहे त्याची प्रेरणादायी आणि उदबोधक माहिती देण्यासाठी यूअर स्टोरीने या दुष्काळी भागातील फाऊंडेशनच्या कामाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सलग तिस-या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागासह विदर्भातील काही भागात यंदा दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी तर नाहीच पण लोकांना पिण्याचे पाणीसुध्दा मिळेनासे झाले आहे. अशावेळी रिलायन्स फाऊंडेशनच्या काही भागातील कामांमुळे तेथील लोकांना शेती आणि पिण्याचे मुबलक पाणी मिळाले आहे हे सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? होय परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यात रिलायन्स फाऊंडेशन ने ५१ गावांत २२०० बंधारे बांधले आहेत, ज्यातून ५४०० कुटुंबातील २३ हजार लोकांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पिकांना पाणी मिळालं आहे तसेच पिण्याचे पाणी सुध्दा मिळाले आहे. हे सारे शक्य झाले ते सामाजिक जलसंवर्धन कार्यक्रमांतून! ७७ लघु पाटबंधा-याच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या पिकाला हवे तितके पाणी देताना दिसतात आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची परवड थांबली आहे.

 यवतमाळ येथील नांझा येथे ५० हजार दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा करण्यात आला. त्यातून शंभर एकर जागेला सिंचनाचा लाभ झाला आहे.बिलोरी येथेही अशाच प्रकारे ३० हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात आला त्यातून ६० एकर शेतीला पाणी देण्यात आले. रिलायन्स फाऊंडेशनच्या चमूने यासाठी पाण्याचा निचरा होण्याच्या जागांवर लहान लहान बंधारे घालून पाणि वाहून जाताना अडविले त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठेही वाढले आणि वाहून जाणारे पाणी थांबविण्यात यश आले. पाण्याचा यथायोग्य वापर कसा करावा यासाठीही फाउंडेशनने लोकांमध्ये जागृती अभियान घेतले.

यवतमाळ आणि परभणी नंतर फाऊंडेशनने आता बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागात कामे सुरू केली आहेत. तेथे माणसांना पाणी देण्यासाठी दोहा आणि जनावरांना पाणी देण्यासाठी बुडकी उभारण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून सहा गावातील ८८० ० लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. या शिवाय २५ पाणतळ्यांच्या माध्यमातून २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात कोरेगावांतील लोकांना पाण्यासाठी रोज १०-१२ किमी पायी जावे लागत होते. रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने तेथे पाच हजार लिटरच्या पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे तेथील महिला ज्योती बनसोडे यांनी महिला आता खूप आनंदी असल्याचे सांगितले. रिलायन्स फाऊंडेशनला त्यासाठी त्यांनी धन्यवाद दिले.

मराठवाड्यात पाच गावांना जाणवलाच नाही दुष्काळ!

जलसंवर्धन आणि जलसंधारणाच्या कामांच्या माध्यामातून मराठवाड्यात रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सुपकल्हास, ढेबेवाडी, लिंबेवाडी, पांडरगाव आणि गुंजेगाव या पाच गांवात सहा हजार गावक-यांना दुष्काळाची झळ जाणवू दिली नाही. जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून येथे २८लाख दशलक्ष घनमीटर पाण्याचे संवर्धन करण्यात आले आहे. ५० टक्केपेक्षा कमी पाऊस सलग चौथ्या वर्षी झाल्याने या भागातील ब-याच गावांना यंदा भीषण पाणीटंचाई जाणवते आहे. याशिवाय पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी संकटांत आहेत. जमिनीवर वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी आर एफच्या चमूने लहान लहान बांध घातले अणि पाणी अडवले आणि जमिनीत मुरवले. त्यातून विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झालीच शिवाय अतिरिक्त पाण्याचे साठे तयार झाले ज्यातून शेतीला दोन वेळेचे पाणी देण्यात आले. त्यामुळे सारा मराठवाडा भीषण दुष्काळाचा सामना करत असताना या पाच गावात त्याचा मागमुसही नाही! पांडरगावला तर पाणीसमृध्द गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे दुष्काळातही शेतकरी दुधाचा व्यवसाय करत आहेत. लहू जाधव या शेतक-याने सांगितले की डिसेंबर महिना गेला की आटणारे बोरवेल आणि हातपंप आता बारा महिने पाणी देताना दिसतात हे सारे रिलायन्स फाऊंडेशनच्या कामांमुळेच शक्य आहे.

दुष्काळाच्या प्रश्नाला शाश्वत सिंचनाच्या जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून गेली काही वर्षे मूर्त रुप देताना कोणताही गाजावाजा न करता रिलायन्स फाऊंडेशनने देशाच्या जनतेच्या हितासाठी असली बांधिलकी जपली आहे. लोकांना ऐन दुष्कळात मुबलक पाणी देताना जे काम सरकारने कले नाही ते फाऊंडेशन करते आहे मात्र त्याचे श्रेय घेण्याचा कोणताही अट्टाहास त्यांना करायचा नाही हे तर त्यांच्या केलेल्या प्रामाणिक कामांच्या दहापटीने मोलाचे आहे असेच म्हणावे लागेल नाही का?

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

'जलदिंडी' करतेय नदी संवर्धनाचा जागर

दुष्काळग्रस्त उत्तर महाराष्ट्रात शिरपूर पॅटर्नची जलक्रांती करणारे आधुनिक भगिरथ : सुरेश खानापूरकर

अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !