देशासाठी लढत देत ज्यांनी स्वस्तातील विमान प्रवास देण्यासाठी धडपड केली!

0

एक  यशस्वी भारतीय लष्करी सैनिक, उद्योजक आणि एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन गोपीनाथ हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. लष्करी सेवेतील दैदिप्यमान इतिहासानंतर त्यांनी आघाडीच्या ‘एअर डेक्कन’ या खाजगी हेलिकॉप्टर सेवेत काम करण्यास सुरूवात केली, जी भारतातील कमी खर्चाची हवाई वाहतूक सेवा होती.  २००७ मध्ये एअर डेक्कन  किंगफिशर एअर लाइन्सने ताब्यात घेतली ज्यात देशातील ६९ शहरांना जोडण्यात आले. त्यांच्या अनेक प्रकल्पात १९९६ मध्ये एअर डेक्कन ही देशात आणि श्रीलंकेत सर्वात कमी खर्चात प्रवास देणारी कंपनी होती.


Source: Indiatimes
Source: Indiatimes

गोपीनाथ हे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील गोरूर या दुर्गम गावातील ‘गोरूर रामस्वामी अय्यंगार यांच्या आठ मुलांपैकी दुसरे अपत्य होते. गोपीनाथ यांचे वडील शाळा शिक्षक होते, घरगुती शिकवण्याही ते घेत असत, त्यांनीच गोपीनाथ यांना स्वत: शिक्षण दिले. १९६२ मध्ये गोपीनाथ यांनी सैनिक शाळेतील प्रवेश परिक्षा विजापूर मधून उत्तिर्ण केली. शाळेत असतानाच त्यांच्या एनडीए येथील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलात नियुक्ती मिळाली आणि तेथेच त्यांनी कॅप्टन या पदापर्यंत मजल मारली. लष्कराच्या सेवेत त्यांनी आठ वर्षे काढली त्यात त्यांनी १९७१च्या युध्दात बांगलादेशमुक्ती युध्दात काम केले, मात्र कोणत्याही कामाचा जसा शेवट असतो तसे त्यांनी लवकरच सेवा निवृत्ती घेतली. वयाच्या २८व्या वर्षी त्यानी अत्याधुनिक शेतीची सुरूवात केली, त्यांच्या या कार्यासाठी त्याना १९९६मध्ये रोलेक्स लाॅरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९९७मध्ये त्यांनी डेक्कन एव्हीऐशनची सह स्थापना केली, जी खाजगी हेलिकॉप्टर सेवा होती. गोपीनाथ यांनी नंतर एअर डेक्कनची सुरूवात केली जी कमी खर्चातील विमानसेवा म्हणून नंतर किंगफिशर एअरलाइन्स मध्ये २००७मध्ये विलीन झाली. २००९मध्ये त्यांनी डेक्कन ३६० ची सुरूवात केली, जी वाहतूक उड्डाण व्यायसायिक सेवा  होती, आणि जुलै२०१३मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने ही सेवा बंद करण्याचे आदेशित केले कारण काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मे २००६मध्ये   कॅप्टन गोपीनाथ यांना फ्रेंच सरकारच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, ‘चेव्हेलियर डे ला लिजन दि ’ऑनर’. त्यांनी ‘सिम्पली फ्लाय: ए डेक्कन ओडिसी, कॉलिन्स बिझनेस हे पुस्तक लिहून २०१०मध्ये प्रसिध्द केले होते. एअर डेक्कन बंगळूरू स्थित कंपनीने भारतीयांच्या आवाक्यातील विमान सेवा मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली. विशेष करून दूरच्या प्रवासात लोकांना काही दिवस ट्रेनने प्रवास करावा लागत असे. त्यांच्या चलतीच्या काळात एकदा त्यांच्या जवळ ४३ विमाने होती, ज्यांच्या रोज ३५० उड्डान सेवा होत्या ज्या ६१ शहरात जात होत्या ज्यातून ते बाजारातील २२ टक्के प्रवासी हिस्सा निर्वहन करत होते, असे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. असे असले तरी कंपनीला २००७ मध्ये मोठ्या नुकसानीचा फटका बसला, त्यामुळे जेंव्हा उद्योगपती विजय मल्ल्या यांनी या व्यवसायात पदार्पण केले आणि एअर डेक्कनमध्ये गुंतवणूक केली.


Capt. Gopinath with Vijay Mallya, Source: Indiatimes
Capt. Gopinath with Vijay Mallya, Source: Indiatimes

प्रत्येक मधयमवर्गियाना  प्रत्यक्षात विमानसेवाचा अनुभव मिळावा  या हेतूने पहिल्यांदा विमान प्रवास करू इच्छिणा-साठी  कमीत कमी एक रूपया असे स्वस्तातील विमान भाडे आकारण्यात आले होते,  असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये गोपिनाथ यांनी लोकसभा निवडणुका लढविण्याचा प्रयत्न केला जो यशस्वी होऊ शकला नाही.