'रु.२०' डॉक्टरांच्या अंत्यविधीसाठी जेंव्हा हजारो लोक उपस्थित राहतात!

'रु.२०' डॉक्टरांच्या अंत्यविधीसाठी जेंव्हा हजारो लोक उपस्थित राहतात!

Thursday November 24, 2016,

2 min Read

कोइम्बतूरच्या रस्त्यांवर गर्दीचा महापूर होता, ज्यावेळी डॉ व्ही. बालसुब्रमण्यम यांचा रविवारी अंत्यविधी पार पडला. ते डॉ.२० रु. या संबोधनानेच सर्वपरिचित होते. ६८वर्षांचे डॉक्टर त्यामुळेच दिन-दु:खीतांचे मसीहाच होते. त्यांनी कधीही त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाला रु २०पेक्षा जास्त पैसे मागितले नाहीत.

शहराच्या सिध्दपुदूर भागात डॉक्टर बालसुब्रमण्यम यांचा दवाखाना होता, राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या नोकरीतून सेवा निवृत्त झाल्यावर त्यांनी हा दवाखाना सुरू केला होता. सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे येणा-या रुग्णाला केवळ दोन रुपये आकारण्यास सुरुवात केली, ही रक्कम नंतर सुधारित करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या चिकित्सा तपासणीचा दर १० रुपयांवरुन २० रुपये असा केला. ते त्यांच्या रुग्णाला गरज असेल तर गोळ्या आणि इंजेक्शन देखील देत असत मात्र त्यासाठी वेगळे शुल्क कधीच घेत नसत. दररोज १५०-२०० रुग्णांना तपासून डॉ बालसुब्रमण्यम त्यांना शहरातील चांगल्या आणि किफायतशीर सेवा देणा-या डॉक्टरांकडे जाण्याची शिफारस देत असत.

image


मागील वर्षी एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की, “मला या पैश्याचा उपयोग केवळ इमारतीच्या भाडेखर्चासाठी होतो, आणि माझ्या व्यक्तिगत कारणांसाठी मी खर्च करतो. माझ्या जवळ सहकारी किंवा परिचारीका नसल्याने मला जास्त शुल्क आकारण्याची गरज नाही.”

गेल्या रविवारी लाखो लोक जमा झाले आणि त्यांच्या दिव्यात्म्याच्या शांतीसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. “ तो सोन्यासारखा माणूस होता, त्याच्या मृत्यूने आमचे अपार नुकसान झाले आहे”. अरूण त्यांचे एक नेहमीचे रुग्ण सांगत होते. “ त्यांच्या सारखा माणूस दुसरा कुणी नाही आणि होवू शकणार नाही. आज अनेक डॉक्टर केवळ पैसा कमविताना दिसतात, पण त्यांना त्याबाबत कसलीच अभिलाषा नव्हती.” 

    Share on
    close