जंगलबुकच्या मोगलीकडून प्रेरणा घेतलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘निखिल मोगली’ची प्रत्यक्ष कथा; वाघांच्या संवर्धनासाठी कार्यरत!

जंगलबुकच्या मोगलीकडून प्रेरणा घेतलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘निखिल मोगली’ची प्रत्यक्ष कथा; वाघांच्या संवर्धनासाठी कार्यरत!

Monday May 23, 2016,

3 min Read

आपण सा-यांनीच कधीतरी जंगलबुक आणि मोगलीची गोष्ट वाचली असेल किंवा आता पडद्यावर पाहिली देखील असेल. अबालवृध्दांना त्यातील कथानक आणि विशेषत: मोगलीच्या बाबतीत कुतूहल असेल नाही का? पण हा मोगली कुणा मुलाचा आदर्श असेल किंवा प्रेरणास्त्रोत असेल असे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. महाराष्ट्रातील पेंच अभयारण्यात असलेल्या निखिल सरयाम या मुळच्या गोंड आदिवासी समाजातील तरूणाला मोगलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जंगलाच्या संवर्धनासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आणि तो सध्या पेंच अभयारण्यात टायगर सफारी बघायला येणा-यांना जंगलाबाबत जागृती करण्याचे आणि माहिती देण्याचे काम करतो आहे. त्याने आजपर्यंत गेल्या दोन वर्षांत ३८ हजार पर्यटकांशी समक्ष संपर्क करून जंगलाच्या आणि वाघांच्या संवर्धनासाठी जागृती केली आहे. यूअर स्टोरीच्या वांचकांना या ख-याखु-या मोगलीची माहिती करून देताना आम्हाला म्हणूनच आनंद होत आहे.

image


अगदी बालपणापासून निखिल याचे वाघावर प्रेम आहे. मोगलीच्या कथा त्यानेही अनेकदा ऐकल्या आणि त्याच्या मनात मोगली हिंस्त्र प्राण्यांशी कसा संवाद साधत असेल असा प्रश्न येत असे. त्याने तसा प्रयत्न अनेकदा करूनही पाहिला पण जंगलांतल्या प्राण्यांसोबत मोगलीसारखे आपल्याला राहता येणार नाही याची त्याला खात्री पटली. त्यानंतर त्याने स्थानिक सेवाभावी संस्था सातपुडा फाऊंडेशन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या वाघांच्या बचावाच्या मोहिमेत सहभागी झाला.

सन २०१३च्या त्या काळात पेंच अभयारण्यात अनेक पर्यटक येत आणि कोणत्याही योग्य माहितीशिवाय जंगलात फिरत असत. क्षेत्र अधिकारी असलेल्या श्रीनिवास रेड्डी यांच्यासाठी ही गोष्ट कठीण काम होती की जंगलात येणा-या पर्यटकांना काही माहिती कशी देता येईल. त्यावेळी वनविभागाच्या माध्यमातून त्यांना निखिल सापडला ज्याला त्यांनी ही जबाबदारी सोपवली. त्यानंतर निखिलच्या आवडीचे काम सिल्लारी येथे ऑगस्ट २०१३मध्ये सुरू झाले. अनेक पर्यटक केवळ जंगलात हिंडायला येतात आणि त्यांना माहिती केंद्रात जाण्याची काहीच गरज वाटत नाही. निखिल समोर हेच मोठे आव्हान होते की मजा मस्तीच्या हेतूने आलेल्या पर्यटकांना माहिती केंद्रात नेऊन माहिती देणे. ‘टायगर टेल’ या माहिती केंद्रात जाणे पर्यटकांना आधी श्रीनिवास यांनी सक्तीचे केले होते. आणि जंगलात वावारताना काय करावे आणि काय करू नये यांची माहिती तेथे दिली जात असे” निखिल सांगतो.

image


त्यानंतर खरेतर निखिलची कसोटी लागत असे की तेथे आलेल्या पर्यटकांना ते कसे आपल्या संभाषणाने जिंकून घेतात. लहान मुलांना काय सांगावे मोठ्यांना काय सांगावे कुणाच्या कोणत्या प्रश्नांना काय उत्तरे द्यावी याची जाणीव हळुहळू त्यांना होत गेली. त्यामुळे गेल्या दोन वर्षात त्यांनी ३८ हजार पेक्षा जास्त पर्यटकांशी संवाद साधल्याचे ते सांगतात. एसएफ फाऊंडेशनचे किशोर रिठे हे त्याचे सहायक आहेत.

ज्या पर्यटकांना निसर्गाची माहिती हवी असते अशा हौशी पर्यटकांना ते निसर्ग सफारीलाही घेऊन जातात. प्रत्येक संध्याकाळी वेगवेगळ्या पर्यटकांच्या चमू समोर ते वाघांच्या गोष्टी सांगतात. आणि वाघाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आनंदही देतात, लहानग्या पर्यटकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या पध्दतीमुळे त्यांची ओळख आता निखिल मोगली अशी होऊ लागली आहे.

image


त्यांच्या या कामगिरीबाबत तेथे येणा-या पर्यटकांनी अनेक शेरे लिहून ठेवले आहेत, अगदी माजी एपीसिसीएफ (वाईल्डलाईफ) एस एस मिश्रा यांनी देखील तेथे भेट दिल्यानंतर निखिलचे कौतुक लिहून ठेवले आहे. त्याचे जंगलावरचे प्रेम आणि ते पर्यटकांना व्यक्त करण्याचे कसब वाखाणण्यासारखे असल्याचा अभिप्राय त्यांनी दिला आहे. सातपुडा फाऊंडेशनने या ठिकाणी पर्यटकांना माहितीसाठी काही पुस्तके आणि वाईल्ड लाईफशी संबधित वस्तूंच्या खरेदीची सुविधा दिली आहे जी महाराष्ट्रातील इतर कुठल्याही व्याघ्र सफारी मध्ये नाही. हे सारे असले तरी निखिल याला त्याच्या जीवशास्त्राच्या स्नातक पदवीसाठी अभ्यास करण्यासाठी देखील सातपुडा फाऊंडेशन मदत करते. त्यांच्या कुटुंबातून अशा प्रकारचा स्नातक होणारे ते पहिले वहिले व्यक्ती ठरणार आहेत. तेंव्हा आपण जरूर पेंच व्याघ्र सफारीला भेट द्या आणि या त्यानिमित्ताने या ख-याखु-या मोगलीला देखील भेटायला मिळेल याची खात्री बाळगा. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑटोरिक्षाचालकाच्या मुलाची युपीएससीच्या परीक्षेत गगनभरारी,जालन्याच्या अन्सार शेखची यशोगाथा

कोट्यवधी रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडून उद्योजक बनणारे 'हॅलोकरी'चे राजू भूपती

लोकहित आणि पर्यावरण संरक्षणासाठी बहुमोल योगदान देणारे पुरुषोत्तम रेड्डी 

    Share on
    close