नोक-या सोडून स्थापन केली 'अल्टीट्युड सिंड्रोम' कंपनी, दोन ध्येयवेड्या तरूणांची कथा

नोक-या सोडून स्थापन केली 'अल्टीट्युड सिंड्रोम' कंपनी, दोन ध्येयवेड्या तरूणांची कथा

Thursday October 22, 2015,

5 min Read

‘अल्टीट्युड सिंड्रोम’ या अडव्हेंचर ट्रॅव्हल कंपनीला या वर्षीच्या सुरूवातीलाच दोन उत्साही ट्रेकर्सनी लाँच केले होते. आपले हे उद्दीष्ट गाठण्यासाठी त्यांनी आपल्या कॉर्पोरेट नोकरीवर पाणी सोडले होते. त्यांना स्वत: ज्या प्रकारच्या ट्रेकिंगचा अनुभव घेतला होता तो ट्रेकिंगचा अनुभव इतर लोकांना मिळावा हा त्यांचा प्रयत्न आहे.

आपल्या या व्यवसायासाठी सुरूवातीची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांची नजर अनुभवी आणि नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या ट्रेकर्सचा शोध घेत होती. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ‘अल्टीट्युड सिंड्रोम’ कंपनीने उत्तराखंडमध्ये सहा ट्रेक्स आयोजित केले. तसेच भूतान, उत्तराखंड आणि नेपाळमध्ये पुढील सात ट्रेक्स प्रस्तावित आहेत.


नावामुळेच सारे काही सुरू झाले


एक ट्रेकर, ब्लॉगर आणि ‘प्रॉमेटीस’ या प्रशिक्षण देणा-या कंपनीचे सह-संस्थापक असलेले साजीश जीपी आपल्या छोट्याशा कार्यालयात काम करत बसले होते. त्याच दरम्यान अचानक त्यांच्या डोक्यात ‘अल्टीट्युड सिंड्रोम’ हे नाव वीजेसारखे चमकले. ते म्हणतात, “ ट्रेकिंग आणि अडव्हेंचर ट्रॅव्हलच्या क्षेत्रात काही करावे याबाबत जो पर्यंत मी विचार करत होतो, तो पर्यंत त्याबाबतीत मी गंभीर नव्हतो. पण त्या संध्याकाळी जेव्हा मला हे नाव सूचले, तेव्हा मला वाटले की याच नावासोबत मला काही तरी करायचे आहे आणि याच नावासोबत मला माझ्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे.” साजीश यांनी त्याच वेळी ते नाव ऑनलाईन चेक केले आणि आणि त्यांना धक्काच बसला. कारण हे डोमेन नाव त्यांच्यासाठी उपलब्ध होते. त्यांनी हे नाव त्वरित बूक करून टाकले आणि त्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही.

आपल्या ‘अल्टीटुयड सिंड्रोम’ कंपनीसाठी हवा असलेला उत्साही भागीदार साजीश यांना आपल्या जुन्या महाविद्यालयातील मित्र आणि ट्रॅकिंगचाच सहकारी असलेला, प्रॉमिटस कंपनीचे सह-संस्थापक रणदीप हरी यांच्या रूपाने भेटला. रणदीप यांनी सुद्धा आपली कॉर्पोरेट कंपनीची नोकरी सोडून साजीश यांच्यासोबत अनेक वेळा संधी घेत ट्रॅकिंग केले होते. या ट्रॅकिंगचा त्यांना अनुभवही छान मिळाला होता. ज्या लोकांनी त्यांच्या सोबत ट्रॅकिंग केले होते, ते लोक ‘आपण आता पुन्हा एकत्र कधी ट्रॅकिंगला जायचे असे’ विचारत होते. या गोष्टीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. रणदीप सांगतात, “ म्हणूनच जेव्हा साजीश हा विचार घेऊन पुढे आला तेव्हा मी तात्काळ सहभागी झालो. मी याला एक संधीच्या रूपात पाहिले. कारण मी माझी आवडती गोष्ट करत नोकरी करू शकतो असा हा व्यवसायाचा प्रकार होता.”

image


'पैसा वसूल' प्रस्ताव – एक मजेदार, जीवन बदलणारा अनुभव


आपल्या सौंदर्याने चटक लावणा-या आकर्षक आणि भव्य पर्वताकडे जास्तीत जास्त लोकांना नेऊन त्यांना आगळा अनुभव देणे या कंपनीच्या लक्षावरच अल्टीट्युड सिंड्रोम कंपनीचे व्यवसाय मॉडेल आधारित आहे असे साजीश यांना वाटते. आपल्या यादीत केवळ एक भेट दिल्याचे ठिकाण या नात्याने त्या ठिकाणाची नोंद करणे हा ट्रेकिंगचा अर्थ नाही हे कंपनीचे कार्यप्रवृत्त करणारे तत्त्वज्ञान सांगते. या तत्त्वज्ञानाच्या आधारे कंपनीला आपले लक्ष गाठायचे आहे.


त्यांच्या काही विशेष गोष्टी...


खराब हवामान आणि अननुभवी ट्रेकर्सना देखील लांब प्रवास मार्ग संधी देतात: रणदीप सांगतात, “ हळूहळू चालणा-या व्यक्तीला देखील ट्रेकचा आनंद मिळावा आणि त्याने आपले लक्ष गाठावे याकडे आम्ही आमचे लक्ष केंद्रीत केले. आपण एका विशिष्ट वयोगटातील नाहीत किंवा मग इतर लोकांसारखे आपण शारीरिक दृष्टीने फिट नाही आहोत म्हणून आम्ही ट्रेक करू शकत नाही असा अनेकांचा दृष्टीकोन आहे. खरे तर ट्रेक हा जंगलात किंवा वनराईत चालण्याचा प्रकार आहे आणि त्यांनी ठरवले तर ते ट्रेकिंग करू शकतात याची जाणीव आम्ही त्यांना करून देऊ इच्छितो.”

छोट्या आकाराचे गट : साजीश सांगतात, “ आमचा अनुभव सांगतो, की जास्त करुन ट्रेकिंगसाठी १२ ही संख्या आदर्श संख्या आहे. तथापि, आम्ही ट्रेकिंगसाठी यात कमीत कमी आणखी ५ लोकांना जोडून हा गट १५ लोकांचा बनवतो. गटाचा आकार जर छोटा असेल, तर ट्रॅकिंगची मजा जास्त घेता येते असे कंपनीचे म्हणणे आहे. ( कल्पना करा जर टॉयलेट टेंट समोर २० ते ३० लोक रांगेत उभे असतील तर कसे वाटेल ?) आणि कमी संख्येमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम देखील कमी प्रमाणात होतो.

सांस्कृतिक अनुभव: बहुतेक करून ट्रेकिंगच्या योजना या उत्सवांच्या काळात बनवल्या जातात, किंवा मग आपल्या गटाला स्थानिक लोकांजवळ जाऊन त्यांना समजून घेण्याची संधी मिळेल अशा पद्धतीने ट्रेकिंगची व्यवस्था केली जाते.

सहकारी कर्मचारी गटांची निवड ( गाईड, हमाल, स्वयंपाकी इत्यादी): ‘अल्टीट्युड सिंड्रोम’ने हिमालयातील विविध क्षेत्रांमधील सहकारी गटांसोबत करार केले आहेत. आता कंपनी जगभरातील नव्या स्थानांचा शोध घेण्यासाठी रणनिती करार करण्याच्या कामाला देखील लागलेली आहे.

वैविध्य असलेला मल्टीकोर्स भोजन प्रकार ( बहुतेक ट्रेकमध्ये अंतर्भूत ) :

मल्टीकोर्स भोजन प्रकार अल्टीट्युड सिंड्रोमच्या किंमतीवर प्रभाव पाडतात याच्याशी संस्थापक सहमत आहेत, परंतु कंपनीच्या ट्रेकिंग टूरच्या किंमती या इतर टूर ऑपरेटर्सच्या किंमतींपेक्षा एक टक्के इतक्या शुल्लक प्रमाणात जास्त आहेत. परंतु त्या बदल्यात ट्रेकिंग हा प्रकार लोकांना अतिशय सुंदर असे अनुभव देतो असे संस्थापकांना वाटते. साजीश सांगतात, “ उपलब्ध पर्याय एक तर अत्यंत महाग आहेत किंवा मग काटकसरीचे. आम्ही या दोन्हींच्या मधला पर्याय देतो. या द्वारे २५ ते ३० वर्षांच्या व्यावसायिकांना एक आरामदायक आणि अत्यंत खराखुरा अनुभव मिळेल असा हा पर्याय असतो.”

image


प्रचाराची मोहिम


आत्ताच्या घडीला ‘अल्टीट्युड सिंड्रोम’ ही कंपनी आपली वेबसाईट आणि फेसबूक पेजच्या माध्यमातून आपले मार्केटिंग करत आहे. शिवाय मौखिक प्रचारावर देखील कंपनीचा व्यवसाय आधारित आहे. या सोबतच पुन्हा पुन्हा येणा-या ग्राहकांकडूनही कंपनीला चांगला व्यवसाय मिळतो.


रोडमॅप


साजीश आणि रणदीप दोघेही आपल्या परदेशातील स्थळांवर आपल्या या मॉडेलची प्रतिकृती तयार करण्याचे काम करत आहेत. तथापि, सध्या त्यांची नजर हिमालयावर आहे. ही कंपनी भारत आणि भारताबाहेरील विविध ठिकाणांवर आपली टीम बांधणी आणि नेटवर्क तयार करण्याचे काम करत आहे. याबरोबर जास्तीत जास्त सांस्कृतिक अनुभव जमवण्याचीही ही कंपनी योजना तयार करत आहे. उदाहरणार्थ – उत्तराखंडातील दयारा बुग्यालमध्ये एक योगा ट्रेक आयोजित करण्याची कंपनीची ऑफर आहे. तथापि, आपल्या व्यवसायाने एका निश्चित मर्यादेच्या पलिकडे जाऊ नये याबाबत ते अधिक सावध आहेत. साजीश म्हणतात, “ सध्या आमचा व्यवसाय मर्यादित स्वरूपाचा आहे.व्यक्तीगत काळजी आणि ग्राहकांसाठीची अनुकुलता हा आमचा ‘पैसा वसूल’ प्रस्ताव आहे आणि जर आम्ही अतिशय कमी काळात मोठा विस्तार केला तर आमचा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल.”


निधी: जपून पावले उचलणे महत्त्वाचे


अल्टीट्युड सिंड्रोम कंपनी सध्यस्थितीत आपल्या स्वत:च्या निधीवर आणि सोबत कुटुंब तसेच मित्रांच्या सहकार्याने होणा-या वित्तपुरवठ्यावर चालते आहे. काही गुंतवणूकदार हे भविष्यातील मोफत कराच्या वचनावर सहभागी झाले आहेत. तर काही गुंतवणूकदार कंपनीचा दृष्टीकोन आवडल्याने या कंपनीचे भागीदार बनू पहात आहे.

भविष्यातील निधी गोळा करण्याच्या योजनेबाबत बोलताना रणदीप सांगतात, “ आम्ही याबाबत विचार करू. आमच्या जवळ निधी असावा म्हणून आम्ही निधी गोळा करत नाही आहोत. जर आम्हाला बाहेरच्या निधीची आवश्यकता भासली तर आम्ही असा गुंतवणूकदार शोधू ज्याला प्रवासात रूची असेल. आत्तापर्यंत आम्ही या उद्योगातील बारकावे शिकत शिकत पुढे जात आहोत. आणि आम्ही नेमके कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी कमीतकमी आणखी एक वर्ष तरी वाट पहावी लागणार आहे. ” साजीश चेह-यावर स्मित आणून सांगतात की, आम्ही योग्य दिशेने जात आहोत, हे नक्की.