जागतिक जलदिनाच्या निमित्ताने बिसलेरी आणि डब्बेवाल्यानी केला पाण्यासाठी लोकजागर!

जागतिक जलदिनाच्या निमित्ताने बिसलेरी आणि डब्बेवाल्यानी केला पाण्यासाठी लोकजागर!

Saturday May 13, 2017,

3 min Read

मुंबईतील डब्बेवाल्यांच्या मदतीने जागतिक जल दिनाचे औचित्य साधून बिसलेरी इंटर नॅशनल प्रा लि ने पाणी वाचवा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून मुंबईच्या डब्बेवाल्यांनी चर्चगेट रेल्वेस्थानका बाहेर लोकजागर केला. त्यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना पाण्याचे महत्व आणि त्यांच्या जपणूकीबाबतची गरज याची माहिती दिली. होळीच्या निमित्ताने देखील कोरडी होळी साजरी करण्याचा आदर्श घालून देत बिसलेरी आणि डबेवाला यांनी लोकांना पाण्याचा अपव्यय कसा टाळता येतो ते दाखवून दिले होते. डब्बेवाल्यांनी त्यांच्या जेवणाच्या डब्ब्यासोबतच पाण्याच्या बाटल्याचें वाटप केले, बिसलेरीच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या नाक्यांवर जावून लोकांना पाण्याच्या बचतीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला.


image


पराग बंगाली, बिसलेरी इंटरनॅशनल प्रा लि चे संचालक आहेत, ते म्हणाले की, “पाणी हा मौल्यवान स्त्रोत आहे आणि सा-यांना त्याच्या मुल्याची जाणिव असायला हवी. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने जमेल तेवढे पाणी वाचविले पाहिजे, जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आम्ही हाच संदेश लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे.”

गेली अनेक वर्ष बिसलेरीचा हा प्रयत्न आहे की प्रत्येकाला चांगले आणि शुध्द पिण्याचे पाणी मिळावे, हा तोच ब्रान्ड आहे ज्याने सर्वात प्रथम भारतात शुध्द पिण्याचे पाणी बाटलीत देण्याची संकल्पना आणली. आणि त्याला देशात प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच बिसलेरीचा आता हा प्रयत्न आहे की निसर्गाने दिलेल्या साधनांना आपण जपून वापरले पाहिजे आणि त्यांचा योग्य वापर झाला पाहिजे. त्याच्या या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी उपक्रमात त्यांनी रेन वाॅटर हार्वेस्टींग, किंवा छोटी बंधारे आणि छतावरचे पाणी जमा करण्याच्या उपक्रमांची माहिती देण्यास सुरूवात केली आहे.

image


बिसलेरीने जलसंधारण प्रकल्प देखील हाती घेतला आहे त्याला 'प्रकल्प नयी उम्मीद' असे नाव देण्यात आले आहे. भारतात प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी पडते मात्र त्यातील ९५ टक्के पाणी वाहून पुन्हा समुद्रात जाते. केवळ पाच टक्के पाणी वापरासाठी साठवले जाते. या नैसर्गिक स्त्रोताच्या नासाडीबाबत वेळीच जागृती झाली पाहिजे. आमच्या उदासिनतेचा परिणाम दिसू लागला असून जमिनीच्या खाली असलेल्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. तसेच पावसाचे प्रमाण कमी होत जात असून अखेरीच्या दिवसांत अनेक गावाना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे.

बिसलेरी त्याकरिता चेक डॅम बांधून साठवण केलेल्या पाण्याचा वापर करण्याची संकल्पना राबवित आहे. हा छोटा बंधार असतो जो लहानश्या नाला किंवा ओढ्यावर बांधला जातो. हंगामात त्यात पाणी साठवले जाते आणि अडविलेले पाणी झिरपून आजूबाजूच्या जमिनीत पाण्याची पातळी वाढते. पावसाळ्यानंतरही या साठवण केलेलया पाण्याचा वापर करता येतो. त्यामुळे वर्षभर शेतीला किंवा नित्याच्या वापराला या पाण्याचा उपयोग करून शेतीचे पर्यायाने शतेक-यांचे उत्पन्न वाढविता येते. मोठ्या धरणांपेक्षा लहान बंधारे कमी खर्चात होतात आणि त्यातून पाण्याचा चांगला वापर करता येतो. त्यामुळे त्यांचा लोकांना तातडीने चांगला वापर करता येतो आणि त्यांच्या रोजच्या जीवनाला त्याचा हातभार लागतो. त्यातून नैसर्गिक जलस्त्रोतांचे देखील संवर्धन केले जाते. सन २००१ मध्ये बिसलेरीने पहिला बंधारा कच्छ मध्ये बारा या गावी बांधला. त्यानंतर गुजरात पश्चिम भारत आणि मध्य भारतात त्यानी सुमारे ५० लहान बंधारे बांधले आहेत. त्यातून ७० गावे आणि आठ हजार कुटूंबाच्या पाण्याची सोय निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी अकरा हजार लिटर पाणी उपलब्ध करता आले आणि तीन हजार एकर शेतीला पाणी पाजताना बाजूच्या विहीरी आणि तलावांच्या पाण्याची पातळी देखील सुधारण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतक-यांच्या वार्षिक उत्पन्नात ५० हजार रूपयाची किमान वाढ झाली आहे.